दक्षिण कोरिया आता युक्रेनला करणार शस्त्र पुरवठा?

0
दक्षिण
डनिट्स्क प्रदेशातील प्रशिक्षण मैदानावर लष्करी सरावात भाग घेताना युक्रेनियन सैनिक (रॉयटर्स)

युक्रेनचे संरक्षणमंत्री रुस्तम उमरोव्ह यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ शस्त्रास्त्रांची मदत मागण्यासाठी या आठवड्यात दक्षिण कोरियाला भेट देत आहेत.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, युक्रेन रशियाबरोबरच्या युद्धात आपल्यासाठी शस्त्रास्त्र पुरवठादारांचा शोध घेत आहे.
युक्रेनमधील संघर्षावर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी शिष्टमंडळाने दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिन वॉन-सिक यांची आधीच भेट घेतली असल्याचे, वृत्त दक्षिण कोरियाच्या एका वृत्तसंस्थेने बुधवारी वृत्त दिले. मात्र या वृत्ताचा स्रोत कोण याबद्दल कोणताही उल्लेख केला नाही.
ओळखीच्या स्रोताचा हवाला देत, युक्रेनचे एक शिष्टमंडळ शस्त्रास्त्रांच्या मदतीची विनंती करण्यासाठी दक्षिण कोरियाला भेट देणार असल्याचे वृत्त साउथ चायना मॉर्निंग पोस्टने या आठवड्यात दिले.
तर या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने योनहाप वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हे शिष्टमंडळ बुधवारी लवकरात लवकर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांना भेटणे अपेक्षित होते.
यावर प्रतिक्रिया विचारली असता, यूनच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा देण्यास नकार दिला.
दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही मंगळवारी नियमित पत्रकार परिषदेत युक्रेनचे शिष्टमंडळ सेऊलमध्ये पोहोचले आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
ऑक्टोबरमध्ये दक्षिण कोरियाचा ब्रॉडकास्टर केबीएसला दिलेल्या मुलाखतीत युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले होते की, कीव तोफखाना आणि हवाई संरक्षण प्रणालींसह शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यासाठी सेऊलला तपशीलवार विनंती अर्ज पाठवणार आहे.
युक्रेनच्या प्रसारमाध्यमांनी, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि पोलंडच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत या आठवड्यात झालेल्या उमरोव्ह परिषदेच्या व्हिडिओचा हवाला देत सांगितले की, सहभागींनी युक्रेनच्या तातडीच्या संरक्षण गरजांची तपासणी पूर्ण केली आहे.
पायाभूत सुविधांवरील रशियाच्या तीव्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आणि अधिक तोफखाना दारूगोळ्याच्या पार्श्वभूमीवर उमरोव्हने प्रगत हवाई संरक्षण प्रणालींच्या गरजेवर भर दिला, असे वृत्तात म्हटले आहे.
आघाडीचा शस्त्रास्त्र उत्पादक म्हणून उदयाला आलेल्या दक्षिण कोरियावर युक्रेनला प्राणघातक शस्त्रे पुरवण्यासाठी काही पाश्चिमात्य देशांचा आणि कीवचा दबाव आहे, परंतु त्याने आतापर्यंत प्राणघातक नसलेल्या मदतीवर लक्ष केंद्रित केले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला  उत्तर कोरियाने रशियाला मदत केल्याच्या प्रत्युत्तरात सेऊल युक्रेनला शस्त्रे पाठवेल का? असा प्रश्न दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चो ताई-युल यांना विचारण्यात आला होता. सर्व संभाव्य परिस्थितीचा विचार करण्यात येत आहे आणि सेऊल रशियातील उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या सहभागाबद्दृल आणि त्या बदल्यात प्योंगयांगला मॉस्कोकडून काय मिळाले यावर लक्ष ठेवत असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

 

टीम भारतशक्ती

(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleNATO Reaffirms Support To Ukraine Days After Russian Missile Attack
Next articleTeam Trump Weighs Direct Talks With North Korea

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here