अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन सोमवारी सेऊल दौऱ्यावर असतानाच उत्तर कोरियाने मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला. यामुळे प्रादेशिक सुरक्षा सहकार्याला चालना देण्याची निकड परत एकदा अधोरेखित झाली.
दक्षिण कोरियाच्या लष्कराच्या म्हणण्यानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारच्या सुमारास (0300 जी. एम. टी.) सोडण्यात आलेले हे क्षेपणास्त्र समुद्रात कोसळण्यापूर्वी अकराशे किलोमीटर (690 मैल) पूर्वेकडे गेले होते.
या घटनेच्या काही तासांनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ब्लिंकन यांनी प्योंगयांगच्या वाढत्या चिथावणीखोर कृत्यांचा प्रतिकार करण्यासाठी अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्यातील संबंध मजबूत करण्याच्या महत्त्वावर भर दिला. पुढील धोके रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय म्हणून real time क्षेपणास्त्र माहितीची देवाणघेवाण आणि त्रिपक्षीय लष्करी सराव यासारख्या उपक्रमांकडे त्यांनी लक्ष वेधले.
ते म्हणाले, “आजची घटना ही आपल्या सर्वांसाठी केवळ एक इशारा आहे की आपण सहयोगाने कार्य करणे किती महत्वाचे आहे.”
मॉस्कोशी प्योंगयांगचे संबंध अधिक दृढ होत आहेत याकडेही ब्लिंकन यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, “वॉशिंग्टनला असे वाटते की युक्रेन युद्धाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात रशियाचा उत्तर कोरियाबरोबर अंतराळ आणि उपग्रह तंत्रज्ञान सामायिक करण्याचा हेतू आहे, ज्यामध्ये हजारांहून अधिक उत्तर कोरियाचे सैनिक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत.
आशियाई शेजारी देशांमधील संबंधांबाबत अनेकदा त्रास देणाऱ्या ऐतिहासिक समस्या असूनही, या महिन्यात पदावरून पायउतार होणारे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरिया तसेच जपान यांच्यातील त्रिपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने प्रगती केली.
मात्र दक्षिण कोरियातील राजकीय उलथापालथी आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित पुनरागमनामुळे हे प्रयत्न यानंतर टिकवून ठेवता येतील की नाही यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दक्षिण कोरियाच्या खासदारांनी गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी आणि त्यांच्या 3 डिसेंबरला देशात मार्शल लॉ लागू करण्याच्या घोषणेने संपूर्ण देश खळबळ उडाली. त्यामुळे त्यांना कर्तव्यांमधून निलंबित करण्यासाठी तिथे मतदान केले गेले. यून यांच्या महाभियोगाच्या खटल्याची सुनावणी घटनात्मक न्यायालयात सुरू आहे.
जर यून यांना कायमस्वरूपी अध्यक्षपदावरून हटवले गेले तर तिथे राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक घेतली जाईल आणि ती स्पर्धा जिंकण्याची शक्यता असलेल्या उदारमतवाद्यांनी टोकियोशी भागीदारी करण्याच्या यून यांच्या प्रयत्नांवर टीका केली आहे.
सोमवारी हंगामी अध्यक्ष चोई सांग-मोक यांची भेट घेणाऱ्या ब्लिंकन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वॉशिंग्टनला यूनच् यांच्या कृतींबद्दल “गंभीर चिंता” वाटत आहे, परंतु देशाच्या संस्थांवर आणि लोकशाहीच्या लवचिकतेवर आमचा विश्वास आहे.
प्योंगयांगने आतापर्यंत कमीतकमी सात कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. 5 नोव्हेंबरनंतर सोमवारी करण्यात आलेले हे पहिलेच प्रक्षेपण होते.
कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र सोडले गेले हे लगेच स्पष्ट झाले नाही, परंतु गेल्या वर्षी उत्तर कोरियाच्या मध्यवर्ती पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या (आयआरबीएम) चाचण्यांनी एक नवीन घन-इंधन रचना जगाला दाखवून दिली. या चाचण्यांमध्ये कथितपणे हायपरसॉनिक ग्लाइड वाहन होते-क्षेपणास्त्र संरक्षण टाळण्यासाठी मध्य-उड्डाण चालविण्यास सक्षम असलेले वॉरहेड होते.
सर्व श्रेणीतील क्षेपणास्त्रांचे घन-इंधन तंत्रज्ञानात रूपांतर करणे ही प्योंगयांगची महत्वाकांक्षा आहे. घन-इंधन क्षेपणास्त्रांचे लक्षणीय धोरणात्मक फायदे आहेत, त्यांना प्रक्षेपणाच्या ताबडतोब आधी इंधन भरण्याची आवश्यकता नसते, ज्यामुळे ते तैनात करणे जलद होते.
याव्यतिरिक्त, ते हाताळण्यासाठी अधिक सुरक्षित आहेत, कमी logistic support असला तरी त्यांना चालतो आणि त्यांचा शोध घेणेही कठीण आहे, ज्यामुळे द्रव-इंधन प्रणालींच्या तुलनेत त्यांची टिकाव क्षमता वाढते.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)



























