राष्ट्रपती पुतिन नौदलाच्या कार्यक्रमात असताना, युक्रेनचा सेंट पीटर्सबर्गवर हल्ला

0

रशियन अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, रविवारी युक्रेनियन ड्रोनने सेंट पीटर्सबर्गवर हल्ला केल्यामुळे विमानतळ 5 तासांसाठी बंद करण्यात आले होते. त्याचवेळी राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन नौदल दिनाच्या समारंभात सहभागी झाले होते, जरी सुरक्षेच्या भितीमुळे नौदल परेड आधीच रद्द करण्यात आली होती.

सेंट पीटर्सबर्गमध्ये सामान्यतः ‘नौदल दिवसाची’ परेड मोठ्या प्रमाणावार होते, ज्यामध्ये नेवा नदीवर युद्धनौका आणि लष्करी जहाजांची फौटिला दाखवली जाते आणि राष्ट्राध्यक्ष पुतिनही त्यात सहभागी होतात.

गेल्यावर्षी, रशियाने युक्रेनच्या या शहरातील परेडवर हल्ल्या करण्याची योजना असल्याचा संशय घेतला असल्याचे, राज्य वाहिनीकडून सांगण्यात आले.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी रविवारी पुष्टी केली की, या वर्षीची परेड सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.

नौदल समारंभ

रविवारी, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन शहरातील ऐतिहासिक नौदल मुख्यालयावर पेट्रोलिंग बोटीने पोहोचले, जिथून त्यांनी प्रशांत आणि आर्कटिक महासागर तसेच बाल्टिक आणि कास्पियन समुद्रांतील 150 पेक्षा जास्त जहाजे आणि 15,000 लष्करी कर्मचाऱ्यांचे सराव पाहिले.

“आज आपण हा सण कामाच्या वातावरणात साजरा करत आहोत, आपण बेड्याच्या लढाऊ तयारीचे परीक्षण करत आहोत,” असे पुतिन यांनी एका व्हिडिओ संबोधनात सांगितले.

रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “रविवारी हवाई संरक्षण युनिट्सनी एकूण 291 युक्रेनियन फिक्स्ड-विंग ड्रोन पाडले, जे 9 मे रोजी रशियाच्या विजय दिनाच्या परेडपूर्वी, 7 मे रोजीच्या हल्ल्यात पाडण्यात आलेल्या 524 ड्रोनपेक्षा कमी आहेत.”

लेनिनग्राद प्रदेशाचे राज्यपाल- अलेक्झांडर ड्रॉझडेंको यांनी सांगितले की, “या भागात 10 पेक्षा जास्त ड्रोन खाली केले गेले, आणि पडणाऱ्या तुकड्यांमुळे एक महिला जखमी झाली. रविवारी 0840 GMT वाजता ड्रॉझडेंको यांनी सांगितले की हल्ला नाकाम करण्यात आला.”

सेंट पीटर्सबर्गचे पुलकोवो विमानतळ हल्ल्यादरम्यान बंद होते, ज्यामुळे 57 उड्डाणे उशीर झाली आणि 22 उड्डाणे इतर विमानतळांवर वळवण्यात आली, असे एका निवेदनात सांगितले गेले. काही तासांनंतर रविवारी पुलकोवो विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले.

रशियन ब्लॉगर अलेक्झांडर युनाशेव, जे पेस्कोव्हसोबत जाणाऱ्या अधिकृत पत्रकार संघाचा भाग आहेत, त्यांना पेस्कोव्हने सांगितले की, युक्रेनी ड्रोन हल्ल्यामुळे त्यांचा मॉस्को ते सेंट पीटर्सबर्गचे उड्डाण 2 तास उशीराने झाले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleनैऋत्य पाकिस्तानमधील ‘ऑनर किलिंग’मुळे देशभरात संतापाची लाट
Next articleरशियाच्या कीववरील हवाई हल्ल्यात, एका लहान मुलासह आठजण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here