संयुक्त राष्ट्रांच्या शांतता दलात योगदान देणाऱ्या, राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला प्रारंभ

0

भारतीय लष्कराने 14 ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान, नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्रांच्या शांतता दलात योगदान देणाऱ्या देशांच्या (UNTCC) प्रमुखांची परिषद आयोजित केली आहे. शांतता प्रस्थापनेच्या कार्यात मोलाचा वाटा असलेल्या 32 देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी, या परिषदेत सहभागी झाले आहेत.

या तीन दिवसीय परिषदेआधी, 13 ऑक्टोबर रोजी सहभागी देशांच्या प्रतिनिधीमंडळांचे नवी दिल्लीत आगमन झाले. ही परिषद म्हणजे एक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये ऑपरेशनल आव्हाने, नवीन धोके, आंतरिक कार्यक्षमता, निर्णय घेण्यातील समावेशकता आणि जागतिक शांतता प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची भूमिका या सर्वाचा सविस्तर आढावा घेण्यात येईल.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सातत्यपूर्ण आणि मोठ्या प्रमाणावर योगदान देणारा देश म्हणून, भारत या परिषदेच्या निमित्ताने उच्चस्तरीय व्यासपीठ आयोजित करत आहे, ज्यामध्ये उत्तम कार्यपद्धती ठरवणे, सहकार्य वाढवणे आणि शांतता मोहिमांच्या भविष्यासंदर्भात परस्पर समज निर्माण करणे यावर भर दिला जाणार आहे. हे उपक्रम “वसुधैव कुटुंबकम्” या भारतीय तत्वज्ञानाचे प्रतीक आहेत, असे भारतीय लष्कराच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

उच्चस्तरीय सहभाग

या कार्यक्रमामध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि संयुक्त राष्ट्रांचे शांतता मोहिमांचे अवर-सचिव जीन-पियरे लॅक्रॉआ यांची मार्गदर्शनपर भाषणे होतील. मुख्य अधिवेशनांमध्ये विविध देशांचे लष्करप्रमुख आणि प्रतिनिधीमंडळप्रमुख सहभाग घेतील, आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांची कार्यक्षमता आणि समावेशकता यांना बळकटी देण्यासंबंधी चर्चा करतील.

या संमेलनात संरक्षण प्रदर्शने, द्विपक्षीय बैठकांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश आहे, ज्यातून भारताच्या क्षमता वृद्धी उपक्रमांची आणि जागतिक शांततेसाठी असलेल्या दीर्घकालीन बांधिलकीची झलक मिळणार आहे.

सहभागी राष्ट्रे

या परिषदेत सहभागी झालेल्या 32 देशांमध्ये- अल्जीरिया, आर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्राझील, बुरुंडी, कंबोडिया, इजिप्त, इथियोपिया, फिजी, फ्रान्स, घाना, इटली, कझाकस्तान, केनिया, किर्गिझस्तान, मादागास्कर, मलेशिया, मंगोलिया, मोरोक्को, नेपाळ, नायजेरिया, पोलंड, रवांडा, श्रीलंका, सेनेगल, टांझानिया, थायलंड, युगांडा, उरुग्वे आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.

शांतता प्रस्थापनात भारताचे नेतृत्व

UNTCC प्रमुखांची ही परिषद अशावेळी होत आहे, जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमा अधिकाधिक कठीण आणि विषम स्वरूपाच्या कार्यपरिस्थितींचा सामना करत आहेत. प्रामुख्याने या चर्चांमध्ये पुढील मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे:

  • शांतता दलांमध्ये सहकार्य व एकत्रित कार्यक्षमता वाढवणे
  • स्वदेशी तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून खर्च कार्यक्षमतेत वाढ
  • संयुक्त राष्ट्रांच्या निर्णयप्रक्रियेत सैन्य देणाऱ्या देशांना प्रतिनिधित्व आणि स्वत:ची ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे
  • नागरिक आणि शांतता राखणाऱ्या दलांचे रक्षण यासाठी उत्तम कार्यपद्धती शेअर करणे 

भारताच्या ‘संयुक्त राष्ट्र शांतता रक्षण केंद्राने (CUNPK)’ हे उद्दिष्ट्य साधण्यात अग्रगण्य भूमिका बजावली आहे. यामध्ये, फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित केलेल्या ‘ग्लोबल साउथमधील महिला शांतता सैन्य परिषदेचा’ही समावेश आहे, जी शांतता मोहिमांमध्ये जेंडर सर्वसमावेशकतेसाठी भारताच्या आग्रहाला अधोरेखित करते. 

परिषदेचा अपेक्षित निष्कर्ष

  • द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि संबंध बळकट होणे
  • शांतता मोहिमांच्या चौकटींच्या सुधारणा करण्यासाठी सामायिक दृष्टीकोन विकसित होणे
  • सहभागी राष्ट्रांमध्ये क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षण सहकार्य वाढणे

अधिक सुरक्षित, एकसंध जागतिक शांतता रक्षण संरचनेकडे वाटचाल

UNTCC प्रमुखांची 2025 मधील परिषद, ही केवळ एक राजनैतिक बैठक नसून, प्रमुख लष्करी योगदान देणाऱ्या देशांचा जागतिक शांततेला बळ देण्याचा एकत्रित संकल्प आहे. हे संमेलन भारत, ब्राझील, फ्रान्स, घाना, टांझानिया, उरुग्वे आणि इतर देशांचे केवळ ‘योगदानकर्ते’ म्हणून नव्हे, तर अधिक सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सुलभ जागतिक व्यवस्थेचे ‘निर्माते’ म्हणून त्यांचे महत्त्व अधोरेखित करते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleArmy Taps Civil Helicopters To Sustain Winter Cut-Off Posts
Next articleAUKUS पाणबुडी कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलिया देणार आणखी काही अब्ज डॉलर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here