बायडेन प्रशासनाच्या काळात युरोपियन देशांनी यापूर्वी युक्रेनसाठी अमेरिकन शस्त्रे खरेदी केली होती.
शस्त्र खरेदीबाबत चर्चा
ट्रम्प यांचे युक्रेनियन राजदूत, निवृत्त लेफ्टनंट जनरल कीथ केलॉग यांच्यासह अमेरिकेचे अधिकारी या आठवड्यात म्युनिक सुरक्षा परिषदेदरम्यान युरोपियन मित्रराष्ट्रांशी संभाव्य शस्त्रास्त्र खरेदीवर चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले.
भांडवल खर्च लक्षणीयरित्या न करताही कीवमध्ये अमेरिकेची शस्त्रास्त्रांची मालवाहतूक चालू ठेवण्यासाठी प्रशासन चर्चा करत असलेल्या अनेक कल्पनांपैकी ही एक कल्पना आहे, असे त्यांनी सांगितले. रॉयटर्सला सोमवारी दिलेल्या मुलाखतीत केलॉगने या योजनेला दुजोरा देण्यास नकार दिला. मात्र ते म्हणाले, “अमेरिकेला नेहमीच अमेरिकेत तयार केलेली शस्त्रे विकायला आवडते कारण त्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होते.”
“अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या ते सर्व चाचपणे सुरू आहे,” असं केलॉग म्हणाले, माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पूर्वी मंजूर केलेली मालवाहतूक अजूनही युक्रेनला जाणे सुरू होते.
ते म्हणाले, “पुढील 24 तासांत यापेक्षा वेगळे करण्याची गरज नाही.”
युरोपला प्रयत्न वाढवावे लागतील
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अलीकडच्या काळात म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाला वॉशिंग्टनने युक्रेनमधील युद्धावर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेची परतफेड करायची आहे आणि युरोपला मदत करण्यासाठी आणखी काही करण्याची गरज आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्ज यांनी रविवारी एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला वाटते की येथे एक मूलभूत तत्त्व आहे की युरोपियन लोकांनी पुढे होऊन या संघर्षावर तोडगा काढला पाहिजे.”
वॉशिंग्टनमधील युक्रेनियन दूतावासाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
खरेदीची पद्धत अजूनही अस्पष्ट
युरोपियन देशांना व्यावसायिक करारांद्वारे किंवा थेट अमेरिकन साठ्यातून अमेरिकन शस्त्रे खरेदी करण्यास सांगण्याची अमेरिकेची योजना आहे की नाही हे अजूनही अस्पष्ट आहे.
काही व्यावसायिक करार पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागू शकतात. युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवणे कधी आणि कसे सुरू ठेवायचे यावर ट्रम्प प्रशासनाने अनेक आठवडे चर्चा केली आहे.
ट्रम्प यांची मदत थांबवण्याची धमकी
राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी युक्रेनला दिली जाणारी सर्व मदत बंद करण्याचे वचन दिले होते. मात्र जर या वर्षाच्या अखेरपर्यंत शांतता चर्चा लांबणीवर पडणार तर वॉशिंग्टनने कीव्हला लष्करी पाठिंबा देणे सुरू ठेवले पाहिजे, असा युक्तीवाद त्यांच्या काही सल्लागारांनी पडद्यामागून केला आहे.
बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात युक्रेनला 65 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त सुरक्षा सहाय्य मंजूर केले, ज्यात त्यांच्या प्रशासनाच्या शेवटच्या महिन्यातील काही अब्ज रकमेचा समावेश आहे.
अर्थात राष्ट्रपती व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासह कीवमधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की रशियाशी चर्चा करण्यापूर्वी युक्रेनला अधिक सुरक्षा हमीची आवश्यकता आहे.
संभाव्य पाठबळ
कॉंग्रेसकडून अतिरिक्त निधी मागण्यासाठी पुढे गेल्यास ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधील सत्तेला काही रिपब्लिकनकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
प्रशासन अधिकारी युरोपबरोबर शस्त्रास्त्र खरेदी कराराकडे एक संभाव्य उपाय म्हणून पाहत आहेत, ज्यामुळे वॉशिंग्टनला अमेरिकन करदात्यांचे डॉलर्स खर्च न करता कीव्हला पाठिंबा देता येईल. नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी गेल्या महिन्यात सांगितले की युक्रेनला आवश्यक अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांसाठीच्या खरेदीसाठी युरोप पैसे देईल.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)