काश पटेल बनले भारतीय वंशाचे पहिले FBI प्रमुख, ट्रम्प यांच्याकडून कौतुक

0
भारतीय

गुरुवारी, रिपब्लिकन-नियंत्रित अमेरिकन सिनेटने – काश पटेल यांची FBI च्या संचालकपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. यानिमित्ताने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निष्ठावान समर्थक असलेले आणि FBI चे वारंवार समालोचन करणारे पटेल, यू.एस.च्या सर्वात प्रमुख कायदा अंमलबजावणी संस्थेच्या उच्चपदावर विराजमान झाले. पटेल भारतीय वंशाचे पहिले FBI संचालक ठरले आहेत.

एका स्थलांतरित गुजराती कुटुंबात जन्मलेले, लहानपणापासूनच भारतीय परंपरा आणि हिंदू धर्माचे आचरण करणारे- पटेल, एक भारतीय PIO (Person of Indian Origin)असून, त्यांनी राम मंदिराच्या उभारणीला अनुकूलता दर्शवली होती.

‘FBI संचालक’ ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची नियुक्ती आहे. पटेल हे नेहमीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक राहिले आहेत. एका PIO च्या नियुक्तीमुळे, ट्रम्प यांचे मंत्रिमंडळ सर्वसमावेशक असल्याची पुष्टी झाली आहे.

पटेल यांनी X द्वारे आपले मत व्यक्त करत म्हटले आहे की, “FBI ला खूप जुना वारसा लाभला आहे—’G-Men’ पासून ते 9/11 नंतर आपल्या देशाचे रक्षण करण्यापर्यंतचा.

“अमेरिकन लोकांना एक अशी FBI हवी आहे जी पारदर्शक, जबाबदार आणि न्यायासाठी समर्पित असेल.”

“आमच्या न्याय व्यवस्थेच्या राजकीयीकरणामुळे जनतेचा विश्वास उडाला आहे, पण आता ते संपुष्टात येईल,” असे पटेल म्हणाले.

“FBI चे संचालक म्हणून माझे मिशन स्पष्ट आहे. प्रामाणिक पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना त्यांचे काम करुन देणे आणि FBI वरील विश्वास पुन:प्रस्थापित करणे.”

पटेल यांनी सांगितले की, “ते FBI ला अशी एक संस्था बनवण्यासाठी काम करतील, जिच्याबद्दल अमेरिकन लोकांना अभिमान वाटेल.”


Spread the love
Previous articleSaudi Arabia Approaches Gulf Leaders, Egypt And Jordan For Talks On Friday
Next articleचिनी विद्यापीठांनी ऑफर केले, DeepSeek वर आधारित कोर्सेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here