आधुनिक युद्धक्षमतेच्या प्रदर्शनासह, पश्चिम कमांडचा ‘राम प्रहार’ सराव संपन्न

0

भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने, ‘राम प्रहार‘ या मोठ्या स्तरावरील लढाऊ सज्जता सरावाची सांगता केली. हा सराव, हरिद्वारजवळील झिलमिल तलाव संरक्षित वन परिसरातील दूधाला दयालवाला येथे आयोजित करण्यात आला होता. पश्चिमेकडील युद्धभूमीवर आयोजित या सरावाने, लष्कराची प्रगत गतिशीलता, संयुक्त कारवाईची क्षमता आणि तंत्रज्ञानावर आधारित युद्धावरचा वाढता भर अधोरेखित केला.

संपूर्ण दिवस चाललेल्या या युद्ध कवायतींमध्ये, यांत्रिकीकरण केलेले सैन्य, तोफखाना, लढाऊ विमानन साधने आणि विशेष ऑपरेशन्स युनिट्सनी, यावेळी आधुनिक युद्धभूमीतील डावपेचांचे समन्वयित प्रदर्शन केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हा सराव म्हणजे पश्चिम कमांडने राबविलेल्या परिवर्तन आराखड्याचे आणि या वर्षीच्या सुरुवातीला राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर‘सह काही उच्च-स्तरीय घटनांमधून मिळालेल्या धड्यांचे प्रतिबिंब आहे.”

लष्करी तुकड्यांनी यावेळी, पश्चिम आघाडीवरील संभाव्य धोक्यांची रूपरेषा तयार करुन, त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या जटिल लढाऊ मोहिमा पार पाडल्या, ज्यामध्ये जलद चिलखती हल्ल्यांपासून ते अचूक गोळीबार समन्वय आणि तातडीचे हवाई सामरिक समर्थन यांचा समावेश होता. सेन्सर्स, दळणवळण नेटवर्क आणि रिअल-टाईम डेटा शेअरिंगच्या एकत्रीकरणाला, लष्कराच्या विकसित होत असलेल्या लढाऊ सिद्धांताचा मुख्य घटक म्हणून यावेळी प्रदर्शित करण्यात आले.

लष्करी नियोजक आणि संरक्षण पत्रकारांसह, प्रत्यक्ष युद्धाभ्यास पाहण्यासाठी आणि ऑपरेशनल नियोजनावर सविस्तर माहिती घेण्यासाठी याठिकाणी प्रवेश देण्यात आला. या युद्ध प्रदर्शनांंमधून, केवळ आघाडीवरील लढाऊ कौशल्येच नव्हे, तर अस्थिर युद्धभूमीच्या परिस्थितीत जलद लष्करी हालचाल आणि सातत्यपूर्ण ऑपरेशन्ससाठी आवश्यक असलेले लॉजिस्टिक्स यावरही प्रकाश टाकण्यात आला.

सरावासाठी उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या सरावाचे वर्णन, “आधुनिक सज्जता आणि ऑपरेशनल कार्यकुशलतेच्या भावनेने, राष्ट्राचे संरक्षण करण्याच्या लष्कराच्या दृढनिश्‍चयाचे प्रतीक” असे केले. त्यांनी सांगितले की, “हा सराव बहु-डोमेन ऑपरेशन्स, आंतर-सेवा सहकार्य आणि सुधारित हल्ल्याच्या क्षमतेवर व्यापक लक्ष केंद्रित करतो.”

संरक्षण विश्लेषकांच्या मते, ‘राम प्रहार’ हा पश्चिमेकडील क्षेत्रातील लष्कराच्या सुरू असलेल्या आधुनिकीकरणाचा आणखी एक मापदंड आहे, जो बदलत्या प्रादेशिक सुरक्षा गतिशीलतेच्या पार्श्वभूमीवर त्याची प्रतिबंधात्मक भूमिका मजबूत करतो. पश्चिम कमांड आगामी काळातही, आपल्या नियमित प्रशिक्षण चक्राचा भाग म्हणून, तसेच उच्च-स्तरीय युद्ध सज्जता राखण्यासाठी आणि 21व्या शतकातील युद्धातील उदयोन्मुख धोक्यांसाठी फॉर्मेशन्स तयार करण्याकरिता, असेच एकात्मिक सराव आयोजित करेल अशी अपेक्षा आहे.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleWestern Command Wraps Up Exercise ‘Ram Prahar’, Showcases Modern Battlefield Capabilities
Next articleFrench Navy Debunks Pakistan’s Claims of Rafale Loss During Operation Sindoor, Dubs “Fake News”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here