बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करी कामगिरीत पीएलएचा समावेश?

0
लष्करी

पाकिस्तानी सैन्याने दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावादी बंडखोरांविरुद्ध नव्या लष्करी हल्ल्याची योजना आखली आहे, चीनच्या बेल्ट आणि रोड प्रकल्पाची मुख्य अंमलबजावणी याच भागात सुरू आहे. मात्र या योजनात चीन हा मोठा शेजारी सहभागी होणार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दहशतवादविरोधी संयुक्त सराव

अलिकडच्या काही महिन्यांत बलुचिस्तान येथील आपल्या नागरिकांना लक्ष्य करत झालेल्या प्राणघातक हल्ल्यांनंतर, चीनने त्यांच्या संरक्षणासाठी घेण्यात येत असलेल्या सुरक्षा प्रयत्नांमध्ये आपल्यालाही सहभागी करून घेण्यासाठी पाकिस्तान सरकारवर मोठा दबाव आणला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी पाकिस्तानमध्ये संयुक्त दहशतवादविरोधी सरावाच्या एका योजनेची घोषणा करण्यात आली.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सरकारी आणि लष्करी नेत्यांच्या बैठकीचे नेतृत्व केले ज्यात त्यांनी “सर्वसमावेशक कामगिरी” साठी परवानगी दिली असल्याचे त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

परंतु ही कामगिरी केवळ जमिनीवरील मोहिमांपुरतीच मर्यादित असणार आहे की हवाई दलाचाही त्यात समावेश असू शकतो तसेच फुटीरतावादी हल्ल्यांबाबत चीनच्या अस्वस्थतेमुळे या कामगिरीची योजना आखण्यात आली आहे का याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयआणि लष्कराने या कामगिरीच्या स्वरूपाबद्दल अधिक माहिती देण्याच्या विनंतीला कोणताही  प्रतिसाद दिलेला नाही.

अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवरील या खडकाळ प्रदेशात सैन्याची आधीच मोठी उपस्थिती आहे, जिथे बंडखोर गट अनेक दशकांपासून वेगळ्या मातृभूमीसाठी संघर्ष करत आहेत, जेणेकरून संसाधनांनी समृद्ध असलेल्या प्रांतातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळवता येतील.

बीएलएचा प्रतिकार

दीर्घ काळापासून लष्कराने बंडखोर गटांविरुद्ध गुप्त माहितीच्या आधारे अनेक कारवाया केल्या आहेत. यात सर्वात मोठा गट म्हणजे बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) असून गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानचा अनेक दशकांपासून  मित्र असलेल्या चीनच्या सैन्य आणि नागरिकांवर हल्ले केले आहेत.

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (CPEC) एक भाग म्हणून चीनने बांधलेले ग्वादर बंदर याच प्रदेशात आहे. चीनची जागतिक पोहोच वाढावी या हेतूने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बेल्ट आणि रोड पायाभूत सुविधा उपक्रमातंर्गत   यात 65-अब्ज अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे.

या हल्ल्यांव्यतिरिक्त, बीएलएने गेल्या महिन्यात कराचीच्या दक्षिणेकडील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर झालेला आत्मघाती बॉम्बस्फोट आपणच केल्याचा दावा केला होता ज्यात दोन चिनी अभियंते ठार झाले.

दोन्ही देशांच्या सैन्याने पाकिस्तानमध्ये नोव्हेंबर अखेरपासून ते  डिसेंबरच्या मध्यापर्यंत चालणाऱ्या ‘वॉरियर-8’ या संयुक्त दहशतवादविरोधी सरावाची योजना आखली असल्याचे मंगळवारी चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

“दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष लढाई प्रक्रियेच्या अनुषंगाने बहु-स्तरीय, बहु-शिस्तबद्ध मिश्र संयुक्त प्रशिक्षणाची योजना आखली आहे,” असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

अनुकृती
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleGas Supply From Russia To EU Via Ukraine Steady
Next articleUkraine Hits Targets Deep Inside Russia After U.S. Nod To Use Long Range Weapons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here