म्यानमारमध्ये आलेल्या तीव्र भूकंपानंतर, तेथील बचावकार्याला वेग आला आहे. ‘म्यानमारमधील भूकंपग्रस्त हॉटेलच्या ढिगाऱ्यातून एका महिलेची सुखरुप सुटका करण्यात बचाव पथकाला यश आल्याचे’, अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. या यशामुळे सुमारे 2,000 जणांचा बळी घेणाऱ्या या भीषण भूकंपानंतर, तीन दिवसांनी बचाव कार्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, म्यानमार आणि थायलंडमधील शोध आणि बचाव पथके, जास्तीजास्त लोकांना सुखरुप वाचवता यावे यासाठी दिवस-रात्र एक करुन काम करत आहेत.
चीनी सरकारने फेसबुकवर केलेल्या पोस्टनुसार, ‘मंडाले शहरातील ग्रेट वॉल नामक हॉटेलच्या ढिगाऱ्यातून, या महिलेला बाहेर काढण्यात आले.’
मंडाले शहर हे 7.7 तीव्रतेच्या भूकंपाच्या केंद्राजवळ स्थित आहे, ज्या भूकंपामुळे शुक्रवारी म्यानमारमध्ये मोठा विध्वंस घडवून आणला आणि शेजारी असलेल्या थायलंडमध्येही प्रचंड प्रमाणात नुकसान केले.
निराशाजनक शोध
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये, आपत्कालीन बचाव पथकांनी बेपत्ता असलेल्या 76 लोकांचा शोध घेण्यास सोमवारी पुन्हा सुरुवात केली, जे एका गगनचुंबी इमारतीच्या ढिगाऱ्यात गाढले गेले असल्याची माहिती मिळाली आहे.
सुमारे तीन दिवसांच्या तपासानंतर, शोधकर्मींच्या मनात भीती वाढत होती की, त्यांना अधिक मृतदेह सापडू शकतात, जे थायलंडमधील मृतांची एकूण संख्या मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात, जी गेल्या रविवारपर्यंत 18 होती.
म्यानमारमध्ये, राज्य माध्यमांनी किमान 1,7000 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती दिली. वॉल स्ट्रीट जर्नलने, मृतांची संख्या म्यानमारमध्ये 2,028 वर पोहोचली असल्याची माहिती दिली. दरम्यान, रॉयटर्सने नवीन मृतसंख्येची अद्याप पुष्टी केलेली नाही.
महिला 60 तास ढिगाऱ्याखाली
बचाव कार्यकर्त्यांच्या एका संघाने, म्यानमारमधील मंडाले येथील ग्रेट वॉल हॉटेलच्या ढिगाऱ्यातून, एका महिलेला 60 तासांनंतर बाहेर काढले, असे चीन दूतावासाने त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले, ज्यामध्ये त्या महिलेची स्थिती सध्या स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली. संयुक्त राष्ट्रांनी सांगितले की, ते म्यानमारमधील 23,000 भूकंपग्रस्तांसाठी मदत साहित्य पाठवत आहेत.
“मंडालेतील आमची बचाव पथके, लोकांना वाचवण्यासाठी रात्रं-दिवस प्रयत्न करत आहेत, जेव्हा त्यांना स्वतःलासुद्धा मानसिक धक्क्यांचा सामना करावा लागतो आहे,” असे म्यानमारमधील यूएन शरणार्थी संस्थेच्या प्रतिनिधी, नोरिको ताकागी यांनी सांगितले. “म्यानमारला या प्रचंड विध्वंसातून उभारण्यासाठी जागतिक एकता आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे,” असेही त्या म्हणाल्या.
मदतीचा ओघ
भारत, चीन आणि थायलंड हे म्यानमारचे शेजारी देश आहेत, ज्यांनी मदत साहित्य आणि बचाव पथके पाठवायला सुरुवात केली आहे. याशिवाय मलेशिया, सिंगापूर आणि रशियामधूनही मदतकार्य आणि मदत साहित्य पोहचले आहे.
संयुक्त राज्यांनी “म्यानमार-आधारित मानवीय सहाय्यता संस्थांद्वारे” 20 लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “यूएसएआयडीचा एक आपत्कालीन मदत संघ म्यानमारमध्ये पाठवला जात आहे, ज्यामध्ये ट्रम्प प्रशासनांतर्गत मोठ्या प्रमाणात कपात केली जात आहे.”
2021 मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर, नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आंग सान सू की यांचे सरकार म्यानमारमध्ये निवडून आले. या सरकारला उलथवून टाकल्यानंतर झालेल्या देशव्यापी उठावामुळे म्यानमारमध्ये गृहयुद्ध झाले आणि त्यामुळे तो आधीच अराजकतेचा सामना करत असताना, भूकंपाच्या विध्वंसाने आता अधिक मोठे संकट ओढवले आहे.
एका बंडखोर गटाने सांगितले की, “भूकंपानंतर बंडखोर लष्कर अजूनही तिथल्या गावांवर हवाई हल्ले करत आहेत, त्यामुळे सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांवी मदत कार्यासाठी त्वरित युद्धविरामाची मागणी केली. महत्त्वाच्या पायाभूत सुविधा जसे की– पूल, महामार्ग, विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचे खूप मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे मानवीय प्रयत्नांमध्ये अडचणी येत आहेत, तर आंतरिक संघर्षाने अर्थव्यवस्था बाधित केली आहे, 3.5 दशलक्षाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत आणि आरोग्य व्यवस्थेला मोठे नुकसान झाले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)