झेलेन्स्की नाटोच्या वर्धापन दिनाला उपस्थित, अजेंडा मात्र वेगळाच

0
झेलेन्स्की
अमेरिकन सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन (आर-एलए) 10 जुलै, 2024 रोजी वॉशिंग्टन, यू. एस. मधील कॅपिटल हिल येथे नाटोच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या शिखर परिषदेला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. (केविन मोहट/रॉयटर्स)

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की बुधवारी अमेरिका भेटीवर आले होते. त्यावेळी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील काही कार्यक्रमांना उपस्थिती लावली. याशिवाय युक्रेनला यानंतरच्या काळात देण्यात येणाऱ्या युद्धविषयक मदतीसाठी अमेरिकन खासदार मतदान करणार आहेत. मात्र माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आल्यास मदत देऊ करण्याचा निर्णय धोक्यात येऊ शकतो.

या आठवड्यात नाटो शिखर परिषदेसाठी वॉशिंग्टनमध्ये असलेल्या झेलेन्स्की यांनी सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहाच्या नेत्यांची तसेच संरक्षण, खर्च, मुत्सद्देगिरी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समित्यांच्या सदस्यांची भेट घेतली.

सिनेटच्या गुप्तचर समितीचे अध्यक्ष मार्क वॉर्नर यांनी रॉयटर्सला सांगितले की, “हे एक अत्यंत महत्वाचे मिशन आहे आणि आम्हाला युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे लागेल.”

यावर्षी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांची ही भेट झाली. या निवडणुकीत युक्रेनला मदती देऊ करण्याचे प्रबळ समर्थक असलेले विद्यमान डेमोक्रॅट जो बायडेन हे रिपब्लिकन ट्रम्प यांच्या विरोधात उभे आहेत. ट्रम्प यांनी मात्र युक्रेनला दिलेल्या मदतीच्या रकमेबद्दल शंका व्यक्त केली आहे.

डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन सिनेटर्सच्या गटासोबत भोजन करण्यापूर्वी झेलेन्स्की यांनी सिनेट रिपब्लिकन नेते मिच मॅककॉनेल यांना युक्रेनचे ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान केले. त्यानंतर  रिपब्लिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. पत्रकारांशी बोलताना झेलेन्स्की यांनी सांगितले की त्यांनी जॉन्सन यांना नुकतेच कीव येथे येण्याचे आमंत्रण दिले आहे.

ट्रम्प यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख असणारे जॉन्सन म्हणाले की, “नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी युक्रेनच्या दौऱ्यासाठी वेळ काढणे कठीण होणार आहे. हा असा काळ आहे जिथे सभागृहाची प्रत्येक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणिआपले सहकारी रिपब्लिकन पक्षाचे कमी फरकाने असणारे बहुमत टिकवून ठेवण्याची किंवा त्यात वाढ होण्याची आशा करत आहेत.”

युक्रेनला भेट द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. मात्र निवडणुकीचे वेळापत्रक आमच्यासाठी खूपच व्यस्त असल्याने  जाण्यासाठी वेळ शोधणे कठीण आहे, परंतु आम्हाला नक्कीच आवडेल “, जॉन्सन म्हणाले.

ट्रम्प विरुद्ध बायडेन यांच्यात 27 जून रोजी झालेल्या वादविवादामध्ये  बायडेन यांची असमाधानकारक कामगिरी आणि कमी प्रमाणात नागरिकांकडून मिळालेला सार्वजनिक पाठिंबा यामुळे त्यांच्या मानसिक तंदुरुस्तीबद्दल नवीन शंका उपस्थित झाल्या आहेत. काही मोजक्या कॉंग्रेस डेमोक्रॅट्सनी बायडेन यांना निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

ट्रम्प यांच्या दोन सल्लागारांनी रिपब्लिकन उमेदवाराच्यासमोर युक्रेन रशिया युद्ध संपवण्याची योजना सादर केली होती. जर ट्रम्प 5 नोव्हेंबरची निवडणूक जिंकले तर या योजनेनुसार युक्रेनला हे सांगायचे आहे की जर त्याने शांतता चर्चेसाठी होकार  दिला तरच त्याला अधिक अमेरिकन शस्त्रे मिळतील, असे वृत्त रॉयटर्सने गेल्या महिन्यात दिले होते.

झेलेन्स्की यांनी मंगळवारी एका भाषणात अमेरिकेच्या राजकीय नेत्यांना युक्रेनला मदत करण्यासाठी जबरदस्तीने पुढे जाण्यासाठी अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा न करण्याचे आवाहन केले. याशिवाय अमेरिकन शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवर कमी निर्बंध घाला असेही आवाहन केले.

काँग्रेसमध्ये, ट्रम्प यांच्या किमान डझनभर जवळच्या सहकाऱ्यांनी झेलेन्स्की सरकारला मदत करण्याच्या विरोधात वारंवार मतदान केले आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने आक्रमण केल्यापासून डेमोक्रॅट्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रित केलेल्या रिपब्लिकननी, अमेरिकेने युक्रेनला मंजूर केलेल्या 175 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मदतीला मान्यता देण्यासाठी एकत्र काम केले आहे.

अगदी अलीकडे, जॉन्सन यांनी एप्रिलमध्ये आपला विचार बदलला. बायडेन यांनी विनंती केल्यानंतर काही महिन्यांनी जॉन्सन यांनी सभागृहाला या निर्णयावर मतदान करण्याची तसेच युक्रेनसाठी 61 अब्ज डॉलर्सची मदत मंजूर करण्याची परवानगी दिली.

झेलेन्स्की यांनी डिसेंबरमध्ये शेवटची काँग्रेसची भेट घेतली तेव्हा जॉन्सन यांनी स्पष्ट केले होते की ते बायडेन यांच्या अतिरिक्त निधीच्या विनंतीला पाठिंबा देणार नाहीत.
ट्रम्प यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या पुराणमतवादी रिपब्लिकनकडून आलेल्या ‘नाही’ मतांसह सभागृहाने पूरक खर्चाचे पॅकेज 311 विरुद्ध 112 अशा मतांनी मंजूर केले. नोव्हेंबरमध्ये सभागृह, सिनेट आणि व्हाईट हाऊसवर निवडून आल्यास ट्रम्प यांचा पक्ष युक्रेनसाठी अधिक निधी मंजूर करणार नाही, अशी चिंता या मतदानामुळे वाढली.
मात्र जॉन्सन यांनी या आठवड्यात आपल्या पहिल्या प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा भाषणात सांगितले की युक्रेनला रशियाकडून मोठा धोका आहे. आपण देशभरात प्रवास करत असताना अमेरिकन मतदारांनी युक्रेनच्या मदतीसाठी पाठिंबा दर्शविला आहे.

“लोकांना समजते की (रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन) त्यांनी कीव ताब्यात घेतले तर ते तिथेच थांबणार नाहीत. माझ्या मते तो एक निर्दयी हुकूमशहा आहे,” असे जॉन्सन म्हणाले.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleTaiwan Annual War Games: Few Can Beat Many, Taiwan President
Next articleSouth Korea’s Hanwha Wins $1B Romanian Order For K9, K10 Howitzers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here