चाणक्य डिफेन्स डायलॉग: यंग लीडर्स फोरम 2025 मध्ये ‘मनाच्या लढाई’ साठी आवाहन

0
ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले की युद्धे जितकी धाडसाने जिंकली जातात तितकीच कल्पकतेने जिंकली जातात”

चाणक्य डिफेन्स डायलॉग: यंग लीडर्स फोरम 2025 मध्ये, भारतातील तरुण पिढीने एक स्पष्ट संदेश दिला: पुढचे युद्ध केवळ युद्धभूमीवर लढले जाणार नाही तर ते कल्पना, कल्पकता आणि बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही लढले जाईल. या वर्षीच्या सुरूवातीला नागरी-लष्करी समन्वय आणि युवा पिढीने तयार केलेल्या तंत्रज्ञानाची ताकद दर्शविणाऱ्या ऑपरेशन सिंदूर या भारताने केलेल्या बहु-क्षेत्रीय अचूक युद्धाच्या ऐतिहासिक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तरूणांना आवाहन केले.

या कार्यक्रमात बोलताना, ऑपरेशन सिंदूर दरम्यान माध्यमांना माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की या मोहिमेने आधुनिक युद्धाबद्दल एक नवीन सत्य अधोरेखित केले:

“ऑपरेशन सिंदूरने सिद्ध केले की तरुणांप्रमाणे विचार आणि नागरिकांच्या सहभागाशिवाय स्थिरता आणि प्रगती टिकू शकत नाही,” असे कुरेशी म्हणाल्या.”यामुळे fifth-generation ची लढाई  असलेल्या बहु-डोमेन अचूक युद्धासाठी भारताची क्षमता प्रमाणित झाली. हे समन्वय, तंत्रज्ञान आणि मानवी इच्छाशक्तीचे एक उल्लेखनीय प्रदर्शन होते.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे भारताच्या तरुण पिढीला भविष्यातील वारसदार म्हणून नव्हे तर राष्ट्रीय शक्तीचे सध्याचे शिल्पकार म्हणून स्थान मिळाले.

मेजर राधिका सेन यांनी संरक्षणाची व्याख्या वाढवली आणि नागरिकांना सुरक्षिततेला सामूहिक नैतिक जबाबदारी म्हणून पाहा असे आवाहन केले.

“उद्याची युद्धे बंदुकीच्या गोळीने नव्हे तर एका क्लिकने सुरू होऊ शकतात,” असे त्या म्हणाल्या. “आपली पहिली संरक्षण भावना केवळ सीमेवर नाही; ती आपल्या हृदयात आणि मनात आहे.”

त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली की चुकीच्या माहितीशी लढणे, नागरिकांचा विश्वास वाढवणे आणि एकजूटीने उभे राहणे ही स्वतःच एक राष्ट्रीय संरक्षणाची कृती आहे.

त्या पुढे म्हणाल्या “जेव्हा नागरिक एकत्र येतात तेव्हा कोणतीही बाह्य शक्ती आपल्याला विभाजित करू शकत नाही किंवा पराभूत करू शकत नाही.”

नवकल्पनांच्या पुढाकाराबाबत बोलताना 3rd iTech च्या सीईओ वृंदा कपूर यांनी असा युक्तिवाद केला की भारताने राष्ट्रीय शक्तीचा आधारस्तंभ म्हणून आपली उद्योजकीय शक्तीचा वापर केला पाहिजे.

“चीनचा झालेला उदय यातून देश आणि उद्योग कसे धोरणात्मक क्षमता निर्माण करू शकतात हे लक्षात येते,” त्या म्हणाल्या “भारतासारख्या लोकशाही देशामध्ये, आपल्याला आपले स्वतःचे मॉडेल शोधावे लागेल, जिथे नवोपक्रम आणि प्रशासन एकत्र येतील.”

त्या पुढे म्हणाल्या, भारताने त्याच्या जागतिक स्तरावरील इतर देशांप्रमाणे दीर्घकालीन धोरणात्मक विचारसरणी स्वीकारली पाहिजे.

“पीएलएची 20 वर्षांची तंत्रज्ञान योजना होती; अमेरिकेची नवकल्पनांची परिसंस्था 20 वर्षांच्या दृष्टिकोनावर चालते,” असे कपूर म्हणाल्या. “भारतानेही निवडणूक चक्रांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताचा विचार केला पाहिजे.”

युद्धे युद्धभूमीऐवजी मेंदूद्वारे लढली जात आहेत- लष्करप्रमुख

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी तरुणांशी संवाद साधला, त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली की युद्धाचे स्वरूप पूर्वीपेक्षा जास्त वेगाने विकसित होत आहे.

“युद्ध अधिकाधिक गतिमान आणि संपर्करहित होत चालले आहे,” असे ते म्हणाले. “त्याला अशा प्रतिसादाची आवश्यकता आहे जो लष्करी शक्तीला बौद्धिक पराक्रम आणि नैतिक तयारीसह एकत्रित करतो.”

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित या चर्चासत्रात वरिष्ठ अधिकारी, संरक्षण विचारवंत, उद्योजक आणि विद्यार्थी एकत्र आले, जे एकाच प्रश्नाने एकत्रित झाले: भारताचे तरुण मन उद्याची शक्ती कशी घडवू शकते?

जनरल द्विवेदी यांनी तरुणांना केवळ आघाडीवरूनच नव्हे तर प्रयोगशाळा, थिंक टँक आणि नवकल्पनांच्या केंद्रांमधून नेतृत्व करण्याचे आवाहन केले.

“आधुनिक काळातील संरक्षण आता सैनिकाच्या रायफलपुरते मर्यादित राहिलेले नाही; ते कोडरच्या कीबोर्डपर्यंत, संशोधकाच्या लेखणीपर्यंत आणि नवोन्मेषकाच्या कल्पनाशक्तीपर्यंत पसरलेले आहे.”

“आपण पुन्हा अपमान सहन करू शकत नाही”: किरेन रिजिजू

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मुख्य भाषण देताना 1962 च्या युद्धधड्यांवर आणि राष्ट्रीय दृढनिश्चयाच्या ताकदीवर त्यांचे विचार मांडले,

“माझे गाव बुडाले; सैनिकांनी रसद पुरवठ्याशिवाय लढा दिला. माझ्या वडिलांनी त्यांना अन्न देण्यासाठी आमचे धान्य कोठार उघडले. त्या आठवणींनी मला एक गोष्ट शिकवली: भारताला पुन्हा कधीही अपमान सहन करावा लागू नये; आपण नेहमीच मजबूत राहिले पाहिजे.”

त्यांनी नमूद केले की एक प्रमुख शक्ती म्हणून भारताचा उदय शिस्त, दृढनिश्चय आणि दूरदृष्टीचा परिणाम आहे, संधीचा नाही.

“बहुतेक देश सुमारे 2 ते 3 टक्क्यांनी वाढत आहेत. भारत 7 टक्क्यांहून अधिक दराने वाढत आहे. ही केवळ वाढ नाही, तर परिवर्तन आहे,” असे ते म्हणाले.

अर्थात योग्य कौशल्ये आणि उद्देशाशिवाय लोकसंख्याशास्त्रीय सामर्थ्य हे दायित्व बनू शकते असा इशाराही रिजीजू यांनी दिला.

“जर आपण आपल्या लोकसंख्येला कुशल बनवू शकलो नाही, तर ती आपल्या देशालाच मारक ठरेल. आपल्या तरुणांनी देशाची सर्वात मोठी संपत्ती बनली पाहिजे, ओझे नाही.”

त्यांनी तरुण भारतीयांना जागतिक नवोपक्रम स्वीकारत असतानाही संस्कृतीच्या मूल्यांमध्ये रुजून रहा असे आवाहन केले.

“आपल्याकडे अफाट तरुण लोकसंख्या असली तरी आपल्याला एक प्राचीन संस्कृती आहोत. आपल्या तरुणांनी आपले‌ लक्ष्य गाठताना आपण कुठून आलो आहोत हेही लक्षात ठेवले पाहिजे.”

भारताची आघाडीची शक्ती असणारा तरुण वर्ग

फोरममध्ये, एक भावना सर्वात वरचढ होती – भारतातील तरुण हे केवळ भविष्यच नाहीत; ते वर्तमानाचीही शक्ती आहेत.

चाणक्य डिफेन्स डायलॉगः यंग लीडर्स फोरम 2025 मध्ये भारताच्या धोरणात्मक मानसिकतेतील पिढ्यानपिढ्या झालेला बदल प्रतिबिंबित झाला-जिथे धैर्य मोजले जाते ते केवळ एखादी व्यक्ती कशी लढते यावरूनच नव्हे तर एखादी व्यक्ती कशी विचार करते यावरूनही.

रेशम

+ posts
Previous articleIndia Monitoring ‘Each and Every Chinese Vessel’ Entering Indian Ocean: Navy Vice Chief
Next articleIOR मध्ये प्रवेश करणाऱ्या ‘प्रत्येक चिनी जहाजावर’ भारताचे लक्ष: नौदल उपप्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here