युट्यूबने हॉंगकॉंग न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत त्या देशात प्रसारित झालेल्या 32 व्हिडिओच्या लिंक्स ब्लॉक केल्याचे म्हटले आहे.
न्यायालयाने मंगळवारी यासंदर्भातील आदेश जारी केला.
ऑनलाइन व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने या आदेशाबाबत मानवी हक्क गटांनी व्यक्त केलेली चिंता शेअर करत म्हटले आहे की या आदेशामुळे ऑनलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे या आदेशाविरोधात ते अपील दाखल करणार असल्याचे युट्यूबने जाहीर केले आहे.
हाँगकाँगच्या अपील न्यायालयाने “ग्लोरी टू हाँगकाँग” नावाच्या निषेध गीतावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे व्हिडिओच्या लिंक्स यापुढे हाँगकाँगमधील गुगल सर्चवर दिसणार नाहीत असे युट्यूबने म्हटले आहे. हाँगकाँगमधून यूट्यूबवर गाणे पाहण्याचा प्रयत्न झाला तर “न्यायालयाच्या आदेशामुळे हा आशय या देशाच्या डोमेनवर उपलब्ध नाही,” असा संदेश तिथे झळकताना दिसतो.
हाँगकाँगला अधिकृत राष्ट्रगीत नाही. “ग्लोरी टू हाँगकाँग” हे 2019 मध्ये त्यावर्षी व्यापक लोकशाही समर्थक निदर्शनांदरम्यान लिहिले गेले होते, जे चीनच्या “मार्च ऑफ द वॉलंटियर्स” चे अनधिकृत पर्यायी गीत बनले.
या बंदीमुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र म्हणून हाँगकाँगची असणारी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला सुरूंग लागेल, असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी किंवा गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटसाठी ही कारवाई जगभरातील पहिली नाही, ज्याने कायदेशीररित्या आवश्यक असताना त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. याआधी चीनमध्ये अशाप्रकारची कारवाई करण्यात आली होती.
2010 मध्ये मेन लॅण्ड चायनामध्ये गुगलने त्यांचे सर्च इंजिन बंद केले, तिथे युट्यूब सेवा उपलब्ध नाही.
अलिकडच्या वर्षांत, हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांना अमेरिकन सरकारने जनतेच्या असंतोषावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय सुरक्षा कारवाई करायला मंजुरी दिली. त्यामुळे अनेक लोकशाही विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले आहे आणि उदारमतवादी मीडिया आउटलेट आणि नागरी समाज गट बंद पडले आहेत.
आशिया इंटरनेट कोयलेशनबरोबरच (एआयसी) उद्योग समूहांनीही या निर्णयाचा निषेध केला आहे. मेटा, ऍपल आणि गुगलसारख्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एआयसीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हाँगकाँगमध्ये इंटरनेट सेवा मुक्त आणि खुली ठेवणे हा “मूलभूत” अधिकार आहे. यामुळे शहरातील व्यवहार सुरळीत सुरू रहाण्यास मदत होईल.
हाँगकाँग सरकारने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी हाँगकाँगमध्ये या गाण्याचा प्रसार थांबवणे आवश्यक होते.
अश्विन अहमद
(रॉयटर्स)