युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी युक्रेन रशिया युद्धावर राजनैतिक तोडगा काढण्याची मागणी केली. तसेच नाटो लष्करी आघाडीत सामील होईपर्यंत युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची कल्पना मांडली.
जर्मनीतील विरोधी पक्षनेते फ्रेडरिक मर्झ यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत केलेली ही मागणी युद्ध वाटाघाटीसाठी अधिक मोकळेपणाने युक्रेन तयार असल्याचे संकेत देणारी नवीन घडामोड आहे. ज्यामागे डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी व्हाईट हाऊसमध्ये परतण्याची तयारी करत असल्याचे कारण असू शकते.
पॅरिसमधील चर्चेसाठी झेलेन्स्की आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतल्यानंतर, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की त्यांना युद्ध लवकर संपवायचे आहे. त्यांनी रविवारी त्वरित युद्धबंदी आणि युद्धासंदर्भातील “वेडेपणा” संपवण्यासाठी वाटाघाटी करण्याचे आवाहन केले.
“युक्रेनला हे युद्ध इतर कोणापेक्षाही लवकर संपवण्यात जास्त रस आहे. यासंदर्भातील राजनैतिक निर्णय अधिक जीव वाचवतील यात शंका नाही. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत,” असे झेलेन्स्की यांनी सोमवारी कीव येथे पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले की त्यांनी मॅक्रॉन आणि ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा युद्ध संपवण्याबाबत चर्चा केली. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये सर्वात मोठा संघर्ष सुरू करणाऱ्या 2022 मध्ये करण्यात आलेल्या आक्रमणानंतर युक्रेनच्या जवळजवळ पाचव्या भागावर रशियाचे नियंत्रण आहे.
झेलेन्स्की म्हणाले की त्यांनी दोन्ही नेत्यांना सांगितले की पुतीन यांना प्रत्यक्षात युद्ध संपवायचे आहे यावर आपला विश्वास नाही आणि रशियन अध्यक्षांना जबरदस्तीने तसे करायला भाग पाडणे आवश्यक आहे.
“युक्रेन मजबूत असेल तरच तुम्ही बळाचा वापर करू शकता. कोणत्याही मुत्सद्देगिरीपूर्वी एक मजबूत युक्रेन म्हणजे युद्धभूमीवर एक मजबूत (युक्रेन) असणे असा अर्थ होतो,”असे ते म्हणाले. कीव्हला मजबूत होण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.
जर्मनीचे पुढचे चॅन्सेलर होण्याच्या निवडणुकीतील आघाडीवर असलेल्या मर्झ यांच्याकडून युक्रेनला अलंकारिक भाषेत प्रोत्साहन मिळाले अहे, ज्यांनी बर्लिनच्या सध्याच्या धोरणाची तुलना युक्रेनला पाठीमागे एक हात बांधून लढा देण्यास भाग पाडण्याशी केली.
झेलेन्स्की यांनी फेब्रुवारीमध्ये मॅक्रॉन यांनी मांडलेल्या एका कल्पनेला पाठिंबा दिला, या कल्पनेनुसार युरोपियन राष्ट्रांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र युरोपियन नेत्यांमध्ये या विषयावर एकमत झाले नाही.
नाटोमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण मिळविण्यासाठी ठोस प्रयत्न करणाऱ्या कीवने संपूर्ण युद्धादरम्यान आग्रह धरला आहे की, सध्याचे युद्ध थांबल्यानंतर रशियाने आणखी एक आक्रमण सुरू करण्यापासून रोखण्यासाठी त्याला सुरक्षा हमीची आवश्यकता आहे.
युक्रेनने नाटोत सहभागी होण्याची महत्त्वाकांक्षा सोडून द्यावी आणि कीवच्या आघाडीतील सदस्यत्वाकडे अस्वीकार्य सुरक्षा धोका म्हणून पाहावे अशी रशियाने मागणी केली आहे.
झेलेन्स्की यांनी पत्रकारांना सांगितले की, नाटोच्या सदस्यत्वावर चर्चा करण्यासाठी येत्या काही दिवसांत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन आपल्याला चर्चा करण्यासाठी बोलावतील अशी आपल्याला आशा आहे.
टीम भारतशक्ती