झेन टेक्नॉलॉजीजचा पेटंट स्पर्धेत विजय, प्रतिस्पर्धकाचा दावा रद्द

0

संरक्षण क्षेत्रातील सिम्युलेशन प्रणाली बनवणारी आघाडीची कंपनी, ‘झेन टेक्नॉलॉजीज‘ला एक मोठा कायदेशीर विजय मिळाला आहे. कंपनीने आपल्या ‘कॉम्बॅट ट्रेनिंग सिस्टीम’शी संबंधित एका प्रतिस्पर्धी भारतीय पेटंटला रद्द करण्यात यश मिळवले आहे.

“कंट्रोल्ड एनवायरमेंटमध्ये वापरकर्त्यांसाठी लक्ष्य नेमबाजी प्रशिक्षण प्रणाली” (Indian Patent No. 429859) या विवादित पेटंटला, MAG5 Innovations Pvt. Ltd. शी संबंधित व्यक्तींनी दाखल केले होते. झेन टेक्नॉलीजीजने ऑक्टोबर 2023 मध्ये, या पेटंटला विरोध करत दावा केला होता की, ‘हे पेटंट नवीन नाही, यात कोणताही शोधक टप्पा (inventive step) नाही आणि ते केवळ आधीपासून ज्ञात असलेल्या घटकांचे संयोजन आहे ज्यात कोणतीही तांत्रिक विशिष्टता नाही.’

कंपनीच्या निवेदनानुसार, 6 ऑगस्ट 2025 रोजी, असिस्टंट कंट्रोलर ऑफ पेटंट्स अँड डिझाइन्सने – झेनचा आक्षेप मान्य केला आणि पेटंट कायदा, 1970 च्या कलम 25(2)(b), (e) आणि (f) अंतर्गत ते पेटंट रद्द केले. या निर्णयानुसार, दावा केलेला शोध भारतीय पेटंट मानदंडांची पूर्तता करत नाही आणि त्यात मौलिकता किंवा शोधक योग्यता (inventive merit) दर्शवण्यात अपयश आले.

झेनचा आक्षेप मोशन प्लॅटफॉर्म्स, कंटेनराइज्ड सिम्युलेशन एन्व्हायर्नमेंट आणि सेन्सरी-एनहान्स्ड ट्रेनिंग सिस्टीममधील तिच्या आधीच्या पेटंट्सवर आधारित होता. कंपनीच्या मते, याच तंत्रज्ञानामुळे त्यांना आधुनिक संरक्षण प्रशिक्षण पायाभूत सुविधांमध्ये आघाडी मिळाली आहे.

झेन टेक्नॉलॉजीजच्या प्रवक्त्याने सांगितले की, “हा निर्णय केवळ आमच्या बौद्धिक संपदेचे संरक्षण करत नाही, तर नवोपक्रम आणि संशोधन व विकास (R&D) नेतृत्वासाठीच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देतो.” कंपनी नुकसानीच्या भरपाईसह पुढील कायदेशीर उपाय शोधू शकते, असेही त्यांनी सांगितले.

संरक्षण प्रशिक्षण क्षेत्रात ‘सर्वात मोठा पेटंट पोर्टफोलिओ’ असलेल्या झेन टेक्नॉलॉजीजने, भारत आणि परदेशातील लष्करी आणि सुरक्षा दलांसाठी नवीन पिढीच्या सिम्युलेशन प्रणालीमध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवले आहे.

ड्रोनविरोधी आणि संरक्षण प्रशिक्षण उपायांमध्ये आघाडीवर असलेली हैदराबादस्थित झेन टेक्नॉलॉजीज पुढील तीन आर्थिक वर्षांत 6 हजार कोटी रुपयांचा एकत्रित महसूल मिळविण्याची अपेक्षा करत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleऑस्ट्रेलियन लष्करप्रमुखांचा भारत दौरा; संरक्षण भागीदारीला चालना
Next articleIndia-Brazil Defence Ties Set to Deepen as MTA and Akash Missile Top Agenda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here