नौदलाने पकडला अमलीपदार्थाचा साठा

0
संयुक्त सागरी दलाचा सदस्य म्हणून पहिलीच कारवाई करताना भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस तलवार’ या युद्धनौकेने पश्चिम अरबी समुद्रात एका जहाजावर कारवाई करीत ९४० किलो अमली पदार्थांचा बेकायदा साठा पकडला.
संयुक्त सागरी दलाचा सदस्य म्हणून पहिलीच कारवाई करताना भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस तलवार’ या युद्धनौकेने पश्चिम अरबी समुद्रात एका जहाजावर कारवाई करीत ९४० किलो अमली पदार्थांचा बेकायदा साठा पकडला.

संयुक्त सागरी दलाचा (सीएमएफ) सदस्य म्हणून पहिलीच कारवाई

दि. १७ एप्रिल: संयुक्त सागरी दलाचा सदस्य म्हणून पहिलीच कारवाई करताना भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस तलवार’ या युद्धनौकेने पश्चिम अरबी समुद्रात एका जहाजावर कारवाई करीत ९४० किलो अमली पदार्थांचा बेकायदा साठा पकडला. भारतीय नौदलाने ही कारवाई संयुक्त कृती दलाचा सदस्य या नात्याने केली आहे. या कृतिदलाचे नेतृत्त्व कॅनडा करीत असल्याने त्यांच्या ध्वजाखाली ही कारवाई करण्यात आली. नौदलाच्या या धडक कारवाईमुळे सागरी सुरक्षेबाबतची भारतीय नौदलाची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे, असे सागरी दलाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

कॅनडाच्या नेतृत्वाखाली गेल्या नोव्हेंबरमध्ये संयुक्त सागरी दलाची (कम्बाइन मेरीटाईम फॉर्सेस-१५०) स्थापना करण्यात आली होती. या संयुक्त दलात ४२ देशांचा समावेश आहे. या दलाचे मुख्यालय बहारीन येथे असून, जगातील सर्वांत मोठी नौदल भागीदारी म्हणून या दलाकडे पहिले जाते. जगातील महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांची सुरक्षा करण्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय समुद्राचा सुमारे ३.२ दशलक्ष चौरस किलोमीटर भागावर या दलाकडून गस्ती घालण्यात येते. या दलाचा भाग म्हणून भारतीय नौदलाची आयएनएस तलवार ही बहुपयोगी नौका तैनात करण्यात आली होती. या नौकेने १५ एप्रिल रोजी पश्चिम अरबी समुद्रात एक संशयित गलबत पहिले. त्या गलबताला थांबवून नौदलाच्या जवानांनी त्यावर प्रवेश केला व विविध प्रकारचे ९४० किलो अमली पदार्थ हस्तगत केले. ‘ऑपरेशन क्रिमसन बर्रकुडा’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दहशतवादी संघटना व गुन्हेगारी टोळ्यांना समुद्रीमार्गे बेकायदा कारवाया व तस्करी करता येऊ नये म्हणून ही मोहीम राबविण्यात आली होती, असे ‘सीएमएफ’ने म्हटले आहे.

भारत जुलै २०२२ मध्ये ‘सीएमएफ’मध्ये सहयोगी सदस्य म्हणून सहभागी झाला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२३मध्ये भारताला या दलाचे पूर्ण सदस्यत्त्व प्राप्त झाले. चीनच्या गटातील देश सोडता जगातील बहुतेक देशांची नौदले या दलाचा भाग आहेत. पाकिस्तानचे नौदलही या दलात सहभागी आहे. या दलातील भारताचा समावेश भारताच्या यशस्वी लष्करी राजनयाची साक्ष देतो, तसेच सागरी सुरक्षेबाबत भारताची वचनबद्धता व क्षमताही प्रदर्शित करतो. भारताने या पूर्वीच या दलात सहभागी झाले पाहिजे होते. या दलात सहभागी होण्यास उशीर करून भारताने इतकी वर्ष पाकिस्तानला फुकटची संधी दिली, असे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पंकज सरन यांनी म्हटले आहे. नौदलाने केलेल्या या कारवाईबद्दल त्यांनी नौदलाचे अभिनंदन केले आहे.

रवीशंकर   


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here