जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड दहशतवादी हल्ला झाला. त्यात 40 जवान शहीद झाले. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर अवघ्या 12 दिवसांत भारताने त्याला सडेतोड उत्तर दिले. 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालकोट येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या छुप्या तळावर हल्ला करून तो उद्ध्वस्त केला.
पाकिस्तानला भारतीय जवानांनी याआधीही धूळ चारली आहे. परंतु पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे अनेकदा उल्लंघन केले आहे. सीमेवर अंधाधुंद गोळीबार करत अतिरेक्यांना घुसखोरी करण्यास पाकिस्तानी सैन्य मदत करत असते. पण भारताचे वीर जवान त्यांचा हा डाव वारंवार हाणून पाडत आला आहे. 2016मध्ये पठाणकोट हल्ल्याला भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइकने उत्तर दिले. भारतीय जवानांनी पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला. तरीही पाकिस्तानी अतिरेक्यांनी तीन वर्षांनी पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केलाच. पण आता भारतीय सेना पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला जोरदार उत्तर देत आहे. त्यानुसार भारताने 26 फेब्रुवारी 2019 ला बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून केल्या गेलेल्या या हल्ल्याची पूर्वतयारी कशी झाली, बालाकोटचीच निवड का करण्यात आली, पाकिस्तानी अतिरेक्यांकडून भारताला कशी मदत मिळाली, याआधीही भारतीय सेनेने एअर स्ट्राइकची तयारी दर्शवली होती, पण ती वास्तवात का उतरली नाही, 2019च्या एअर स्ट्राइकनंतर भारताची सशक्त भारत ही प्रतिमा जागतिक स्तरावर तयार व्हायला कशी मदत झाली, याचा चीनबरोबरच्या संघर्षात कसा फायदा झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही जोखीम होती का, अशा अनेक मुद्यांबद्दल माहिती दिली आहे, भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांनी.
संबंधित मुलाखत पाहा –