हवाईदलाकडून ‘इमर्जन्सी लँडिंग’ची चाचणी

0
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील महामार्गावर हवाईदलाकडून लढाऊ विमान व हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. छायाचित्र: वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील महामार्गावर ‘नाइट लँडिंग’

दि. ०३ एप्रिल: आणीबाणीच्या काळात धावपट्टी उपलब्ध न झाल्यास लढाऊ विमानांचे उड्डाण व ती उतरविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांचा वापर करण्याच्या उद्देशाने महामार्गावर ‘इमर्जन्सी लँडिंग’ करण्याची चाचणी हवाईदलाकडून नुकतीच घेण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात नव्याने बांधण्यात आलेल्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या महामार्गावर ही चाचणी घेण्यात आली.

युद्धकाळात आणीबाणीच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी व पेचप्रसंग हाताळण्याची क्षमता पारखून पाहण्याच्या उद्देशाने जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील महामार्गावर हवाईदलाकडून लढाऊ विमान व हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. ही चाचणी ‘नाइट लँडिंग’ स्वरुपाची होती, असे हवाईदलाकडून सांगण्यात आले. अनंतनाग येथील बिजबेहारा येथे सुमार ११९ कोटी रुपये खर्चून ही ‘इमर्जन्सी लँडिंग’ची सुविधा उभारण्यात आली आहे. हे व्यवस्था हवाईदलाच्या सामरिक क्षमतेत वाढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. युद्धकाळात हवाईदलाकडून हाती घेण्यात येणाऱ्या मोहिमा, इतर आणीबाणीचे प्रसंग, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत पुरविणे, दुर्घटनास्थळी अडकलेल्यांची सुटका करणे आदी बाबींसाठीही या सुविधेचा उपयोग होणार आहे. या भागातील आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे. ‘इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी’ उभारण्याबाबत हवाईदल आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने केलेल्या परस्पर समझोत्यानुसार २०२०मध्ये या प्रकल्पावर काम सुरु झाले होते. २०२३मध्ये या कामाची पूर्तता झाली.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या या ‘इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी’मध्ये लढाऊ विमानासाठी गरजेच्या सर्व सुविधा उभारण्यात आल्या आहेत. विमानासाठीचे हँगर्स, पार्किंग सुविधा, लढाऊ विमानांचे उड्डाण व ती उतरणे नियंत्रित करण्यासाठी हवाई नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा त्यात समावेश आहे. या चाचणी प्रसंगी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याबरोबरच सुरक्षेचे इतर उपायही योजण्यात आले होते. सुरक्षादलांच्या तैनातीसह सीसीटीव्ही कॅमेरा, रडार आदी बाबीही चाचणी व्यवस्थित पार पडण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. या चाचणीत सुखोई विमान, चिनूक आणि एमआय-१७ हेलिकॉप्टर यांच्यासह हवाईदलाच्या विविध प्रकारच्या विमाने व हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला होता.

विनय चाटी

स्रोत: वृत्तसंस्था  


Spread the love
Previous articleइंडोनेशियन नौदलासाठी नेव्हल ग्रुप बांधणार दोन पाणबुड्या
Next articlePhilippines To Strengthen Engagement with India on Climate Change Mitigation to Secure Supply Chains

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here