दक्षिण फिलीपिन्समध्ये 7.5 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी

0

शुक्रवारी सकाळी, फिलीपिन्सच्या दक्षिण किनारपट्टीवर 7.5 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसले, ज्यामुळे आसपासच्या अनेक देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, जवळच्या किनारी भागातील रहिवाशांना उंच जागी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक भूकंपशास्त्र संस्थेने दिली आहे.

डावाओ ओरिएंटलमधील मनाय शहराच्या समुद्री भागात आलेल्या या तीव्र भूकंनंतर, फिव्होलक्स संस्थेने इशारा दिला आहे की, यामुळे गंभीर नुसकनीची तसेच भूकंपानंतरचे झटके (aftershocks) जाणवण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 7.6 असल्याचे नोंदवले गेले होते, मात्र नंतर ती 7.5 असल्याची सुधारित नोंद जाहीर देण्यात आले. भूकंपाचे केंद्र 20 किलोमीटर (12 मैल) खोल असल्याचे सांगण्यात आले आहे.

अमेरिकेच्या ‘त्सुनामी चेतावणी प्रणालीने’ या भूकंपानंतर त्सुनामीचा धोका जाहीर केला आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, भूकंपाच्या केंद्रापासून 300 किमी (186 मैल) पर्यंतच्या किनारपट्ट्यांवर धोकादायक लाटा उसळण्याची शक्यता आहे.

बचाव पथके सज्ज

राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी सांगितले की, “बचाव अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत असून, गरज भासल्यास शोध आणि बचाव पथके त्वरित तैनात केली जातील.”

“प्रत्येक पीडित आणि गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहचावी, यासाठी आम्ही चोवीस तास काम करत आहोत,” असे मार्कोस यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले.

दरम्यान, बाधित प्रदेशातील स्थानिक अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधता आलेला नाही.

फिव्होलक्सने, मध्य आणि दक्षिण फिलीपिन्सच्या किनारपट्टीजवळील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना ताबडतोब उंच ठिकाणी स्थलांतरित करण्याचे किंवा त्यांचे अंतर्देशीय स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे, कारण भूकंपामुळे या भागात सामान्य भरती-ओहोटीच्या तुलनेत एक मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर (PTWC) ने म्हटले आहे की, “फिलीपिन्समध्ये भरती-ओहोटीच्या पातळीपेक्षा 1 ते 3 मीटर जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.”

या भूकंपाच्या दोन आठवडे आधीच, फिलीपिन्समध्ये एका दशकाहून अधिक काळातील सर्वात भीषण भूकंप झाला होता, ज्यामध्ये सेबू बेटावर 72 लोकांचा मृत्यू झाला. त्याची तीव्रता 6.9 इतकी होती आणि किनारपट्टीवरही त्याचे हादरे जाणवले.

फिलीपिन्स राष्ट्र, पॅसिफिक “रिंग ऑफ फायर” वर वसले आहे आणि दरवर्षी 800 हून अधिक भूकंपांचे साक्षीदार बनते आहे.

इंडोनेशिया, पालाऊसाठी त्सुनामीचा इशारा

इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी आणि पापुआ प्रदेशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. PTWC ने म्हटले आहे की, “इंडोनेशिया आणि पॅसिफिक बेट राष्ट्र असलेल्या पलाऊमधील काही किनाऱ्यांवर 1 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.”

फिलिपिन्समधील दावाओ ओरिएंटलचे गव्हर्नर म्हणाले की, “भूकंपामुळे लोक पुरते घाबरून गेले आहेत.”

“भूकंप खूप जोरदार होता, ज्यामध्ये काही इमारतींना नुकसान झाल्याचे समजते आहे,” असे एडविन जुबाहिब यांनी फिलीपिन्सची प्रसार वाहिनी DZMMला सांगितले. 

युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरने, भूकंपाची तीव्रता 7.4 आणि त्याची खोली 58 किमी (36 मैल) असल्याचे सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत आणि ब्रिटनमध्ये LMM सह, £600 दशलक्ष किमतीचे संरक्षण करार
Next articleट्रम्प यांच्याबरोबरच्या व्यापार चर्चेत ‘चांगली प्रगती’: पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here