अमेरिकेचे Donald Trump आणि Tesla चे सर्वेसर्वा Elon Musk यांच्याचील मैत्रीपूर्ण संबंधांची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना नोव्हेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणूकीत जिंकवण्यासाठी एलॉन मस्क यांनी एक चतुर्थांश अब्ज डॉलर्स इतकी मोठी रक्कम खर्च केल्याचे वृत्त, समोर आले आहे.
निवडणूकीतील एकूण खर्चाच्या नवीन फाईलिंगनंतर, गुरुवारी रात्री उशीरा यासंबंधीचे रिपोर्ट्स ‘The new Federal Election Commission’ ने प्रसिद्ध केले. यावरुन यंदाच्या व्हाईट हाऊस शर्यतीमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एकाचा प्रभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. फाइलिंगनुसार, ‘टेस्ला’ या Electric Car चे निर्माते आणि SpaceX अब्जाधीश मालक- एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना White House निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्या, त्यांचा प्रचार करणाऱ्या गटांना तब्बल ‘$259 दशलक्ष डॉलर्स’ दिले होते.
या प्रचंड मोठ्या रकमेच्या देणग्यांमुळे, एलॉन मस्कला अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील अध्यक्षीय मोहिमेतील सर्वात मोठे अंडररायटर म्हणून नवी ओळख प्राप्त झाली आहे. ज्यामुळे त्याला ट्रम्प यांचा एक शक्तिशाली राजकीय सहयोगी बनण्यात देखील मदत झाली. त्यामुळे येणाऱ्या रिपब्लिकन प्रशासनाच्या धोरणाचा अजेंडा तयार करण्यामध्ये मस्क यांची महत्वाची भूमिका राहणार आहे.
FEC फाइलिंगनुसार, सुरुवातीला मस्कने अमेरिकन PAC ला ट्रम्प यांचा प्रचार करण्यासाठी $239 दशलक्ष डॉलर देऊ केले होत. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस एलॉन मस्कने RBGPAC ला अतिरिक्त $20 दशलक्ष डॉलर दिले. ज्याचा वापर करुन करण्यात आलेल्या कॅम्पेनद्वारे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला गेला, की डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रीय गर्भपात बंदी कायद्यावर स्वाक्षरी करणार नाहीत.
एलॉन मस्क जे X (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे देखील मालक आहेत, त्यांनी ट्रम्प यांच्या बाजूने सोशल मीडियावरही जोरदार प्रचार केला होता. त्यांच्या विविध भूमिकांविषयी मस्क वेळोवेळी आपले मत जाहीरपणे मांडत होते. लोकांना आवाहन करत होते. यामुळे परिणामत: ट्रम्प यांच्या संघातील जवळचा सल्लागार अशी मस्क यांची एक नवी ओळख बनली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी Republican Party चे माजी अध्यक्षपदाचे उमेदवार आणि उद्योजक विवेक रामास्वामी यांच्यासह सरकारी खर्च व नियमांमध्ये कपात करण्याच्या उद्देशाने Task Force प्रमुख म्हणून त्यांची निवड केली आहे. एलॉन मस्क आणि रामास्वामी यांची देखील नुकतीच भेट पार पडली. या दोघांनी मिळून हजारो फेडरल कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे नियम शिथील करण्याबाबतचे तसेच दिग्गजांच्या आरोग्यसेवेसारख्या ज्या सुविधांची व्हॅलिडीटी संपली आहे अशा कार्यक्रमांना रद्द करण्याचे आवाहन देखील केले आहे.
निवडणुकीच्या काळात एलॉन मस्क यांनी ट्रम्पच्या विश्वासू सदस्यांपैकी एक म्हणून भूमिका बजावली आणि ट्रम्प अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतरही, Mar-a-Lago या त्यांच्या फ्लोरिडा येथील घरी मस्क आणि ट्रम्प यांच्या नियमित भेटीगाठी सुरु होत्या.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे