Wednesday, March 4, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi पुतिन यांच्या शांतता प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाचा Odesa वर ड्रोन हल्ला

पुतिन यांच्या शांतता प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाचा Odesa वर ड्रोन हल्ला

0

स्थानिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने युक्रेनच्या काळ्या समुद्र किनाऱ्यालगतच्या, ओडेसा शहरातील नागरी वस्तींवर रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले, ज्यामुळे अनेक आगी लागल्या आणि बऱ्याच इमारतींचे नुकसान झाले.

“शत्रूंनी ओडेसाच्या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरावर निशाणा साधला,” असे ओडेसाचे महापौर हेन्नादी त्रुखानोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग अ‍ॅपवर लिहिले.

त्यांनी काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये आगीच्या भक्षस्थानी पडलेली घरे, काचा फुटलेल्या खिडक्या आणि अनेक नुकसानग्रस्त इमारती दिसत आहेत.

प्रादेशिक राज्यपाल ओलेह किपेर यांनी सांगितले की, “या हल्ल्यात राहती घरे, नागरी पायाभूत सुविधा, एक शैक्षणिक संस्था आणि अनेक वाहनांचे यांचे नुकसान झाले.”

‘आपत्कालीन पथके बाधित भागात पाठवण्यात आली असून, मृतांबाबतची माहिती स्पष्ट करण्यात येत आहे,’ असे किपेर यांनी सांगितले.

ओडेसा गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या रशिया-युक्रेन संघर्षात वारंवार रशियन हल्ल्यांचे लक्ष्य ठरले आहे.

हा हल्ला त्या काही तासांनंतरच घडला, जेव्हा रशिया आणि युक्रेन यांनी एकमेकांवर बेछूट हल्ले केल्याचा आरोप केला, जे पुतिन यांनी जाहीर केलेल्या एका दिवसाच्या इस्टर युद्धविरामाचे उल्लंघन होते. क्रेमलिनने सांगितले की, “फ्रंटवॉर संदर्भात युद्धविरामाचा कोणताही आदेश देण्यात आलेला नव्हता.”

पुतिन यांचा शांतता प्रस्ताव

दरम्यान, पुतिन यांनी सोमवारी युद्धाच्या सुरुवातीपासून प्रथमच युक्रेनसोबत द्विपक्षीय शांतता चर्चांसाठी प्रस्ताव मांडला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेंस्की यांनी सांगितले की, “कीव नागरी वस्त्यांवरील हल्ले थांबवण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तयार आहे.”

झेलेंस्की यांनी पुतिन यांच्या प्रस्तावाला थेट उत्तर दिले नाही, पण त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत असे सांगितले की, “युक्रेन अशा कोणत्याही चर्चेसाठी तयार आहे, जी नागरी भागांवरील हल्ले थांबवण्यासाठी असेल.”

अमेरिकेचा दबाव

अमेरिकेने दोन्ही मोठ्या नेत्यांवर दबाव आणला आहे. जर याबाबत काही प्रगती झाली नाही, तर शांततेसाठी सुरू असलेले प्रयत्न सोडून देऊ, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.

रशिया आणि युक्रेन यांनी मॉस्कोने आठवड्याच्या शेवटी जाहीर केलेल्या 30 तासांच्या इस्टर युद्धविरामानंतर, अन्य युद्धविरामाची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर या युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप होतो आहे.

झेलेंस्की यांनी सांगितले की, “युक्रेन बुधवारी लंडनमध्ये अमेरिका आणि युरोपीय देशांसोबतच्या चर्चेत सहभागी होईल.” ही चर्चा गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये झालेल्या बैठकीचा पुढचा टप्पा आहे, जिथे अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांनी तीन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या युद्धाचा शेवट कसा करता येईल यावर विचार केला होता.

पुतिन यांनी रशियन राज्यवाहिनीवरील एका पत्रकाराशी बोलताना सांगितले की, ठत्यांनी शनिवारी एकतर्फीपणे जाहीर केलेल्या इस्टर युद्धविरामानंतर पुन्हा लढाई सुरू झाली आहे. तसेच मॉस्को कोणत्याही शांतता उपक्रमासाठी तयार आहे आणि त्यांनी कीवकडूनही तीच अपेक्षा ठेवली आहे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीनुसार)

+ posts
Previous articleद्विपक्षीय व्यापार करारातील प्रगतीचे, JD Vance व पंतप्रधान मोदींकडून कौतुक
Next articleव्हिसा निर्बंध आणि शुल्क प्रक्रियेमुळे चिनी विद्यार्थ्यांची अमेरिकेकडे पाठ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here