युक्रेनच्या काळ्या समुद्र किनाऱ्यावर (Black Sea) वसलेल्या, ‘ओडेसा’ शहरावर रशियन ड्रोन हल्ला झाला असून, या हल्ल्यात तीनजण जखमी झाले, अनेक ठिकाणी आगी लागली आणि काही घरांचे तसेच नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दक्षिण युक्रेनमधील अधिकाऱ्यांनी दिली.
“शत्रूने पुन्हा एकदा ओडेसा शहरावर मोठा ड्रोन हल्ला केला आहे,” असे क्षेत्रीय राज्यपाल ओलेह किपर यांनी सांगितले. ओडेसा हे या प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र आहे. त्यांनी ही माहिती टेलिग्राम या मेसेजिंग अॅपवर दिली. मात्र हल्ल्याचे पूर्ण स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रशियन हल्ल्यांविषयी Ukraine चे हवाई दल सहसा सकाळी अधिक तपशीलवार माहिती देते.
युक्रेनच्या आपत्कालीन सेवांनी टेलिग्रामवर पोस्ट करत सांगितले की, “या हल्ल्यामुळे तीन जण जखमी झाले असून शहरात अनेक ठिकाणी आगी लागल्या.”
ओडेसाचे महापौर हेन्नादी त्रुखानोव्ह, यांनी या हल्ल्याची काही छायाचित्रे शेअर केली, ज्यात एक निवासी इमारत आणि इतर काही रचना जवळपास उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. अन्य फोटोंमध्ये आपत्कालीन कामगार ढिगाऱ्यांमधून शोध घेताना दिसत आहेत, तर एका फोटोत लाकडांच्या ढिगाऱ्यात अडकलेला एक कुत्रा बाहेर डोकावताना दिसतो आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या घटनेची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. रशियाकडूनही या घटनेवर कोणतीच तात्काळ प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून तीन वर्षांहून अधिक काळाच्या युद्धात, दोन्ही बाजू नागरी व्यवस्थेवर हल्ला केल्याचे सातत्याने नाकारत आहेत.
मार्चच्या अखेरीस, अमेरिकेने सांगितले की, “त्यांनी काळ्या समुद्रावरील आणि एकमेकांच्या ऊर्जा लक्ष्यांवरील हल्ले थांबवण्यासाठी युक्रेन आणि रशियासोबत स्वतंत्र करार केले आहेत.”
मात्र दोन्ही बाजूंनी, वारंवार हा करार तोडल्याचा एकमेकांवर आरोप केला जात आहे.
NATO प्रमुखांचा ओडेसा दौरा
मंगळवारी NATO चे सरचिटणीस मार्क रुटे, यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत, दक्षिण युक्रेनमधील ओडेसा शहराला भेट दिली आणि त्यानंतर काही तासांतच रशियाने तिथे ड्रोन हल्ला झाला. रुटे यांनी युक्रेनला “अढळ” पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
रविवारी युक्रेनमधील सुमी शहरावर रशियने केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात, 35 जण ठार तर 100 हून अधिक जखमी झाले होते. या घटनेनंतर मार्क रुटे यांचा हा दौरा पार पडल्याचे, युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा दौरा अशा वेळी झाला, जेव्हा अमेरिकेने नाटोमधील प्रमुख शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धविरामासाठी, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर केलेल्या नव्या टीकेनंतर हा दौरा झाल्याचे समजते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)