Wednesday, March 4, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi अवघ्या 17व्या वर्षी, विद्यार्थिनीने सर केले किलिमांजारो पर्वत शिखर

अवघ्या 17व्या वर्षी, विद्यार्थिनीने सर केले किलिमांजारो पर्वत शिखर

0

वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी, अलविरा त्रिपाठी या विद्यार्थीनीने किलिमांजारो पर्वत शिखर यशस्वीरित्या सर केले. द श्रीराम स्कूल, मौलसरी येथे 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या स्पोर्ट्स कॅप्टन अलविराने आतापर्यंत, जगातील काही सर्वात उंच शिखरे सर केली आहेत, हिमालयात खोलवर प्रवास केला आहे आणि तिच्या या साहसी मोहिमांसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

जून 2025 मध्ये, अलविराने चारधाम यात्रेला सुरुवात केली, मात्र केवळ एक भाविक म्हणून नाही, तर एक गिर्यारोहक, संशोधक आणि सांस्कृतिक अभ्यासक म्हणून. “ही माझ्यासाठी एक ‘पर्सनल रिसेट’ आणि संशोधनाची संधी होती,” यानिमित्ताने गिर्यारोहण, इतिहास संशोधन, अध्यात्म आणि पर्यावरणातील बदल. अशा मला आवडणाऱ्या सर्वच गोष्टींची एकत्र सांगड घालता आली,” असे अलविरा म्हणाली.

मार्गदर्शक डॉ. चंदा गुडरिच यांच्या मदतीने, अलविराने हिमालयीन समाजांबद्दलचा तिचा अभ्यास अधिक सखोल केला, पण तिच्या प्रवासाचा मुख्य उद्देश निसर्गाला ‘ऐकणे आणि त्याच्याकडून शिकणे’ हा होता. “हिमालय म्हणजे फक्त डोंगर नाहीत. त्या आठवणी आहेत. ते चैतन्य आहे. अर्थपूर्ण शिक्षण आहे.”

हिमालयीन गिर्यारोहणातून मिळालेले धडे

नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्प (5,500 मीटर) पासून, अलविराने वयाच्या 9व्या वर्षी ट्रेकिंगला सुरुवात केली. जिथे तिने धडा घेतली की “शांतता कशाप्रकारे ताकद निर्माण करू शकते.” दोन वर्षांनंतर, तिने माउंट किलिमांजारो (5,895 मीटर उंच) शिखर सर केले आणि असे करणारी ती दुसरी सर्वात तरुण आशियाई मुलगी बनली. “जेव्हा तुमचे स्नायू काम करणे थांबवतात, तेव्हा तुमची मानसिक ताकद तुम्हाला पुढे घेऊन जाते,” असे ती म्हणते.

12व्या वर्षी अलविराने, हिमस्खलनाची तीव्र शक्यता असलेल्या ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’ (जे पर्वत तुम्हाला शिखर सर करण्याची खात्री देत ​​नाही) पासून, ते 14व्या वर्षी लडाखमधील कांग यात्से II च्या तांत्रिक आव्हानांपर्यंत आणि 17व्या वर्षी फ्रेंडशिप पीकवरील ‘व्हाईटआउट’ परिस्थितीपर्यंत, अनेक धाडसी मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. प्रत्येक चढाईने तिला शिकवले की: तुमच्या महत्वाकांक्षेता सातत्याने पाठपुरावा करा, अस्वस्थतेचा स्विकार करा पण जिद्द सोडू नका आणि अपरिचित संकंटांवर धाडसाने मात करा.

TEDx वर संदेश

14व्या वर्षी, अलविराने TEDx टॉकमध्ये सहभाग घेतला, “Start Young… To Make the World a Better Place,” द्वारे तिने अनुभवातून शिकण्यावर आणि लहान वयात आव्हानांना सामोरे जाण्याच्या महत्त्वावर भर दिला. किलिमांजारो शिखरावर, रात्रीच्या वेळी फक्त हेडलाइटच्या मदतीने चढाई करणे किंवा शेरपा पोर्टर्सना शांतपणे प्रचंड ओझे घेऊन जाताना पाहणे, अशा क्षणांनी आपल्याला खूप काही शिकवले, समृद्ध केले… असे म्हणत, तिने अनेक आठवणी ताज्या केल्या. “असे प्रसंग आपल्याला कष्ट शिकवतात, स्थैर्य आणि शिकवतात. निसर्ग तुम्हाला नम्र बनवून तुमचे सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व बाहेर आणतो,” असे मत तिने व्यक्त केले.

पर्वतांपलीकडील नेतृत्व

अलविराचे नेतृत्व ट्रेकिंगच्या बाहेरही विस्तारलेले आहे. ती ज्युनियर स्कूल हेड गर्लपासून, सीनियर स्कूल स्पोर्ट्स कॅप्टन बनली, राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व केले आणि ट्रॅक स्पर्धांमध्ये पदके जिंकली. “खेळ आणि गिर्यारोहणाने मला शिकवले की यश म्हणजे केवळ प्रतिभा नाही, तर वेळेवर उपस्थित राहणे आहे. लवकर. सातत्याने. कोणताही बहाणा न देता.”

उदाहरणातून प्रेरणा

अलविरासाठी, चढाई करणे म्हणजे विक्रमांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कृतीला अर्थाशी जोडणे. बर्फाळ शिखरांवर असो, हिमालयीन गावांमध्ये असो, किंवा क्रीडांगणावर असो, ती स्पष्टता, सहानुभूती आणि धैर्याने नेतृत्व करते. “तुमच्या भीतीवर विश्वास ठेवू नका, कारण त्यांना तुमची ताकद माहित नसते,” हे तिचे आवडते ब्रीदवाक्य तिच्या जीवनशैलीचे सार सांगते.

अँथ्रोपोलॉजी आणि पर्यावरण इतिहास शिकण्याच्या तिच्या योजनांसोबतच, चार धाम यात्रेवरील आगामी माहितीपटामुळे, अलविरा फक्त शिखरेच सर करत नाहीये, तर ती आयुष्याचा उद्देश उंचावत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous article17 and Unstoppable: Meet the Schoolgirl Who Conquered Kilimanjaro
Next articleArabian Sea Trap: India’s ASW Wall Poised to Hunt Pakistan’s Hangor Submarines Before They Sail

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here