संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची पायाभरणी | भारतशक्तीची दशकपूर्ती

0
विश्वसार्हता, दृढनिश्चय आणि बांधिलकीची 10 वर्षे

25 नोव्हेंबर 2015 च्या मध्यरात्री, BharatShakti.in हे न्यूज पोर्टल सुरू झाले. एका स्थिर आणि दृढनिश्चयी विचारधाराने सुरू झालेले हे पोर्टल, कालांतराने भारताच्या संरक्षण आणि धोरणात्मक घडामोडींसंदर्भात माहिती पुरवणाऱ्या सर्वात विश्वासार्ह माध्यमांपैकी एक बनले.

ज्येष्ठ पत्रकार नितीन ए. गोखले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, आणि ब्रिगेडियर एस.के. चॅटर्जी (निवृत्त) आणि नीलांजना बॅनर्जी यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या, ‘भारतशक्ती’ पोर्टलचा पाया एका सरळ-साध्या पण तितक्याच प्रभावी उद्दिष्टावर रचला गेला. ते उद्दिष्ट होते, भारतीय संरक्षण उद्योगाला व्यक्त होण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

भारतशक्तीचे मुख्य संपादक नितीन गोखले सांगतात की, “जेव्हा आम्ही या संकेतस्थळाची सुरुवात केली, तेव्हा उद्योगांना संवाद साधण्यासाठी, आपली आव्हाने मांडण्यासाठी किंवा त्याबाबत विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नव्हते. आम्हाला ‘भारतशक्ती’च्या निमित्ताने असेच एक व्यासपीठ उपलब्ध करुन द्यायचे होते, जिथे एकाच जागी विश्लेषण, धोरण आणि उद्योग संवादाला स्थान मिळू शकेल.”

आमच्या तीन जणांच्या टीमने, संरक्षण क्षेत्रातील भारताच्या आत्मनिर्भरतेच्या क्षमतेवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर सुरू केलेला हा प्रवास, लवकरच एका सक्षम मीडिया आणि विश्लेषण समूहात परिवर्तित झाला. गेल्या काही वर्षांत, भारतशक्ती हे विश्वासार्ह पत्रकारितेचे, संरक्षण क्षेत्रातील सखोल माहिती पुरवणारे आणि भारताच्या संरक्षण परिसंस्थेवर माहितीपूर्ण भाष्य करणारे एक प्रमुख माध्यम बनले आहे. भारतशक्तीच्या वाचकांमध्ये धोरणकर्ते, सेवेत असलेले आणि निवृत्त झालेले लष्करी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील नेते आणि खरेदी व धोरण प्रक्रियेतील व्यावसायिक यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

भारतशक्तीच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेताना गोखले म्हणतात की, “आमचे सर्वात मोठे यश हे आहे की, आम्ही आमची विश्वासार्हता कायम टिकवून ठेवली आहे. आम्ही कधीही तथ्यांशी किंवा प्रामाणिकपणाशी तडजोड केली नाही.” 
या व्यासपीठाची वृद्धी, ही भारताच्या स्वदेशीकरणाच्या प्रवासाशी समांतर राहिली असून, 2015 मध्ये सुरू झालेल्या सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी नैसर्गिकरीत्या जोडली गेली आहे. 2016 मध्ये झालेल्या, आमच्या पहिल्या ‘India Defence Conclave’ (भारतीय संरक्षण परिषद) पासून, ज्याचे उद्घाटन तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले होते, ते यंदाच्या कॉनक्लेव्हपर्यंत, ज्यामध्ये सशस्त्र दले, उद्योग आणि विदेशी संरक्षण अधिकारी एकत्र येतात, भारत शक्तीची सर्व संम्मेलने, या संपूर्ण परिसंस्थेसाठी अत्यंत महत्वाचे व्यासपीठ ठरली आहेत.

आता 11व्या वर्षात पदार्पण करत असताना, भारतशक्ती आपल्या पुढील टप्प्यासाठी सज्ज होत आहे. उद्योग-केंद्रित आशयाला नवसंजीवनी देणे, हिंदी भाषेतील माहितीपूर्ण व्हिडिओजद्वारे आणि माहितीपटच्या स्वरुपातील विविध फील्ड फिल्म्सद्वारे, YouTube वाहिनीचा विस्तार करणे आणि ‘Women in Defence’ आणि ‘Training India’s Best’ यांसारख्या नवीन मालिका सुरू करण्याची योजना आहे, ज्यात भारतातील प्रमुख लष्करी संस्थांवर प्रकाश टाकला जाईल.

डिजिटल माहिती पुरवण्यासोबतच, प्रत्यक्ष उपक्रमांद्वारे देशाच्या तरुण वर्गाशी जोडले जाण्यावरही भर दिला जात आहे. गोखले म्हणतात की, आम्ही टियर-II शहरांमध्ये आणि कोईम्बतूर, लखनऊ, कानपूर आणि पुणे यांसारख्या संरक्षण कॉरिडॉरमध्ये ‘भारत शक्ती क्लब’ सुरू करण्याचा विचार करत आहोत.” “MSMEs म्हणजे लघु आणि मध्यम उद्योग, विद्यार्थी आणि तरुण अधिकारी, जे भारताच्या संरक्षण क्षेत्राचे भविष्य आहेत, त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची हीच योग्य वेळ आहे.”

यावरून स्पष्ट होते की, ‘भारतशक्ती’ आता आपले कार्य अधिक व्यापक स्तरावर घेऊन जात आहे, विशेषतः देशातील तरूण आणि MSME क्षेत्रांशी जोडण्यावर भर देत आहे.

यशस्वी दशकपूर्तीनंतर, आता 11 व्या वर्षात प्रवेश करत असताना, भारतशक्तीची टीम तिच्या मूळ उद्दिष्टांशी, तत्वांशी जोडलेली आहे, ते म्हणजे सराकारी धोरणे, उद्योग आणि जनतेतील दरी कमी करणारे एक विश्वासार्ह, सखोल माहिती पुरवणारे आणि भविष्यदर्शी व्यासपीठ म्हणून कार्य करणे.

ब्रिगेडियर चॅटर्जी म्हणतात की, “आमची सुरुवात लहान प्रमाणावर झाली असली तरी, आमचे ध्येय सदैव मोठे होते, जे विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दृढनिश्चय या मूल्यांवर आधारित आहे.”

दहा वर्षांनंतरही, आमचा मूळ गाभा कायम आहे. 25 नोव्हेंबर 2015 च्या मध्यरात्री. ज्या भक्कम निर्धाराने भारतशक्तीच्या प्रवासाची सुरूवात झाली होती, तोच निर्धार आज अधिक वृद्धिंगत होत आहे, भारताच्या संरक्षण आणि सामरिक समुदायासाठीच्या पुढील दशकातील सेवेला दिशा देत आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleमोक्याच्या ऑस्ट्रेलियन ख्रिसमस बेटावर गुगल एआय डेटा सेंटर उभारणार
Next articleजागतिक ऊर्जा संक्रमणाला रोखणारे व्यापार अडथळे दूर करण्यावर चीनचा भर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here