पुनर्उभारणीसाठी सुदानची भारताकडे मदतीची मागणी

0
सुदानचे
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी 30 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे सुदानचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री मोहिद्दीन सलीम अहमद इब्राहिम यांची भेट घेतली. 

मोठ्या प्रमाणात झालेल्या संघर्षानंतर सावरत असलेल्या सुदानने भारतीय कंपन्यांना ऊर्जा, खाणकाम, कृषी, औषधनिर्माण आणि लॉजिस्टिक्ससह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून हा देश पुन्हा उभा राहू शकेल.

नवी दिल्लीत भारतीय उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधताना, सुदानचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री मोहिएल्दिन सलीम अहमद इब्राहिम म्हणाले की, परदेशी सहभाग आकर्षित करण्यासाठी आपल्या गुंतवणूक धोरणांमध्ये खार्तुम सुधारणा करत असून भारतासोबतच्या आर्थिक संबंधांना धोरणात्मकदृष्ट्या आपण अत्यंत महत्त्वाचे मानतो.

इब्राहिम म्हणाले, “आम्ही अशा टप्प्याटप्प्याने मिळणाऱ्या  सहकार्याच्या शोधात आहोत, जे क्षमता निर्माण करेल, स्थानिक उद्योगांना पाठिंबा देईल आणि दोन्ही बाजूंसाठी मूल्य निर्माण करतील.” याशिवाय, सुदान सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs), उत्पादन परिसंस्था आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या यशस्वी भारतीय मॉडेलचा अवलंब करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतातील सुदानचे राजदूत मोहम्मद अब्दुल्ला अली एल्टोम म्हणाले की, देशाच्या औद्योगिक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे, सुदान सध्या आपल्या अत्यावश्यक गरजांचा मोठा भाग आयात करतो.

“जवळजवळ प्रत्येक गोष्टीला प्रचंड मागणी आहे,” असे सांगत ते पुढे म्हणाले की, उत्पादनाचे स्थानिकीकरण केल्याने सुदानच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, त्याचबरोबर खर्च कमी होईल आणि गुंतवणूकदारांसाठी बाजारपेठेत प्रवेश सुलभ होईल.

ऊर्जा आणि वीज निर्मिती ही प्राधान्याची क्षेत्रे म्हणून ओळखली गेली असून, अधिकाऱ्यांनी विजेच्या तुटवड्याचा उल्लेख केला, तर औषधे आणि पशु लसींसह फार्मास्युटिकल्स, तसेच कृषी आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रांनाही उच्च मागणीची क्षेत्रे म्हणून अधोरेखित करण्यात आले.

सुरक्षा आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणासंबंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना इब्राहिम म्हणाले की, परिस्थिती स्थिर होत आहे, सरकारी संस्था खार्तुममध्ये परत येत आहेत आणि विमानतळांसह वाहतूक पायाभूत सुविधा हळूहळू पूर्ववत सुरू होत आहेत. पुनर्बांधणीच्या टप्प्यात सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सवलती आणि सरकार-समर्थित संरक्षण उपाय लागू केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सुदानने धोरणकर्ते आणि उद्योगांमध्ये सहकार्य संस्थात्मक करण्यासाठी भारत-सुदान संयुक्त व्यवसाय परिषद आणि भारत-सुदान व्यवसाय मंच स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

अधिकाऱ्यांनी खाणकाम क्षेत्रातील संधींवरही भर दिला, ज्यात मोठ्या प्रमाणात न वापरलेल्या खनिज साठ्यांचा उल्लेख करण्यात आला, आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील संधींवरही लक्ष वेधले. भारताला आफ्रिकन बाजारपेठांशी जोडणारा बंदरे आणि वाहतूक मार्ग विकसित करण्यासाठी सुदानचे तांबड्या समुद्राजवळील स्थान हा एक मोठा फायदा असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा संपर्क भारत-अरब आर्थिक संबंध विस्ताराच्या पार्श्वभूमीवर साधला गेला असून, नवी दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या भारत-अरब परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने झालेल्या चर्चांनंतर हे घडले आहे.

या बैठकीच्या निमित्ताने, ‘इंडिया अँड अरब कंट्रीज चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर’चे (IACCIA) अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले.

IACCIA चे सरचिटणीस (प्रभारी) डॉ. वाएल अव्वाद यांच्या मते, “मंत्रिस्तरीय व्यासपीठाच्या सोबतच झालेले हे उद्घाटन या गोष्टीवर प्रकाश टाकते की, आर्थिक सहकार्य हे राजकीय आणि राजनैतिक संबंधांच्या बरोबरीने पुढे गेले पाहिजे, ही बाब दोन्ही बाजूंनी मान्य केली जात आहे.”

“हे IACCIA ला उच्च-स्तरीय राजकीय समजुतींचे मूर्त व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी एक प्रमुख अंमलबजावणी यंत्रणा म्हणून स्थापित करते,” असेही ते पुढे म्हणाले.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleटॅरिफ धमकीद्वारे ट्रम्प यांचे पुढचे लक्ष्य क्युबाचा तेल पुरवठा
Next articleबांगलादेश निवडणूक चर्चेत भारताचा नामोल्लेख क्वचितच का केला जातोय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here