सन 2008मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 160हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मीर याला, दहशतवादी कारवायांसाठी निधीपुरवठा केल्याप्रकरणी ‘दहशतवाद विरोधी न्यायालयाने’ अटक केली, खटला भरला आणि आठ वर्षांसाठी तुरुंगात टाकले, असे वृत्त पाकिस्तानी मीडियाने या आठवड्याच्या सुरुवातीला दिले. जगभरातील दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करणाऱ्यांवर लक्ष ठेवणाऱ्या फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवले आहे आणि दहशतवादी कृत्यांना निधीपुरवठा आणि मनी लॉण्ड्रिंगला आळा घालण्यात पाकिस्तानला कितपत यश आले आहे, यावर एफएटीएफ नजर ठेऊन आहे. पाकिस्तान गेली चार वर्षे या यादीत आहे. या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय शांतपणे पार पडली.
एफएटीएफच्या दबावामुळे ज्याला पाकिस्तानने फार पूर्वी मृत घोषित केले होते, तो मीर पुन्हा ‘जीवित’ झाला यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आपल्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय द्यायचा, त्यांना प्रशिक्षण देऊन शस्त्रसज्ज करायचे आणि जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी भारतात घुसवायचे हेच पाकिस्तानी दहशतवादी संघटना फार पूर्वीपासून करत आल्या आहेत. भारतीय संरक्षण दलांनी केलेल्या दहशतवादविरोधी कारवाया आणि त्यात जप्त केलेली सामग्री आणि दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे, हा एक अहवाल देत आहोत, त्यावरून जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कृत्यांमागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट होते.
Click on the link, to download the report
Pakistan’s Proxy War In Jammu And Kashmir