अ‍ॅपल $4 ट्रिलियनचा टप्पा गाठण्याच्या दिशेने; iPhone 17 ठरला गेमचेंजर

0

सोमवारी, Apple कंपनीच्या शेअर्सनी एकाकी उसळी घेत विक्रमी उच्चांक गाठला. नव्या iPhone मॉडेलसाठी होत असलेल्या जोरदार मागणीमुळे, कंपनी $4 ट्रिलियन बाजारमूल्य गाठणारी जगातील तिसरी कंपनी बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

संशोधन संस्था काउंटरपॉईंट यांच्या आकडेवारीनुसार, iPhone 17 सिरीजने आपल्या सुरुवातीच्या विक्रीत iPhone 16 पेक्षा चांगली कामगिरी केली आहे. चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये नवीन मॉडेल्सनी विक्रीच्या पहिल्या 10 दिवसांत iPhone 16 सिरीजपेक्षा 14% अधिक विक्री केली आहे.

परिणामी, अ‍ॅपलच्या शेअर्समध्ये 4.2% वाढ होऊन ते $262.9 वर पोहोचले आहेत, ज्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य सुमारे $3.9 ट्रिलियनवर गेले आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता चिप्स बनवणारी दिग्गज कंपनी Nvidia नंतर ती, अ‍ॅपल जगातील दुसरी सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी बनली आहे.

सुट्टीच्या दिवशी, Evercore ISI ने आपल्या Tactical Outperform List मध्ये अ‍ॅपलचा समावेश केला, कारण ब्रोकरेजला अपेक्षा आहे की, अ‍ॅपल तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये बाजारपेठेतील अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करेल आणि डिसेंबरच्या तिमाहीसाठी सकारात्मक परिणाम सादर करेल.

“चीनमध्ये, आयफोनच्या ऑनलाईन ऑर्डर्समध्ये होणारे प्री-बुकिंग शेवटच्या तिमाहीतील व्यवसायाला सकारात्मक गती देऊ शकते, कारण सुरूवातीच्या काळात झालेल्या वितरणानुसार, इतर प्रदेशांच्या तुलनेत येथे जास्त मागणी दिसत आहे,” असे Evercore ISI च्या विश्लेषकांनी एका निवेदनात म्हटले आहे.

‘अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी’

अ‍ॅपलने सप्टेंबर महिन्यात, नवीन iPhone सिरीजचे अनावरण केले होते, ज्यामध्ये स्लिम iPhone Air चा समावेश आहे. दरम्यान, अमेरिकेतील शुल्कवाढीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने किंमती स्थिर ठेवल्या.

“अ‍ॅपलने त्यांच्या iPhone ची नवीन आवृत्ती सादर केली आणि ती अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी करत आहे. iPhone साठीची मागणी आता कमालीची वाढली आहे,” असे B Riley Wealth चे मुख्य बाजारपेठ धोरणकार आर्ट होगन म्हणाले. 

या वर्षाच्या सुरुवातीला चीनमधील तीव्र स्पर्धा तसेच चीन आणि भारतासारख्या आशियाई अर्थव्यवस्थांवर अमेरिकेतील उच्च शुल्कांचा झालेला परिणाम आणि त्यामुळे वाढलेली अनिश्चितता, यामुळे अ‍ॅपलच्या शेअर्सना अडचणींचा सामना करावा लागला होता.

मात्र, कंपनीने $100 अब्ज अमेरिकन गुंतवणुकीची घोषणा केल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासून, शेअर्सच्या किंमतीत हळूहळू वाढ झाली आहे. या निर्णयामुळे संभाव्य शुल्कवाढीचा परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते.

गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहिला, तर कंपनीचा शेअर मागील चार आठवड्यांतील सर्वात मोठी एकदिवसीय उसळी घेईल आणि वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत 5% पेक्षा अधिक वाढेल.

अ‍ॅपल 30 ऑक्टोबर रोजी बाजारपेठ बंद झाल्यानंतर, आपला या तिमाहीतील निकाल जाहीर करणार आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleट्रम्प यांना चीनसोबत ‘निष्पक्ष’ व्यापार कराराची अपेक्षा, तैवानचा तणाव नियंत्रणात
Next articleZorawar Roars: Indian Army to Induct Indigenous Light Tank Armed with Nag Mk-2 This Winter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here