वेलिंग्टन, सिकंदराबाद दौऱ्यात तंत्रज्ञान-चालित युद्धावर लष्करप्रमुखांचा भर

0

लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल उपेंद्र द्विवेदी 25 ते 27 मार्च या कालावधीत वेलिंग्टन आणि सिकंदराबादच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारतीय सैन्यात तांत्रिक एकात्मता वाढवणे आणि सज्जता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

25 मार्च रोजी जनरल द्विवेदी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये (डीएसएससी) पोहोचले. तिथे  दुसऱ्या दिवशी त्यांनी 80 व्या स्टाफ कोर्सच्या अधिकाऱ्यांना आणि प्राध्यापकांना संबोधित केले. विकसित होणारे सुरक्षा परिदृश्य, धोरणात्मक दूरदृष्टी आणि आधुनिक युद्धात तंत्रज्ञानाची परिवर्तनशील भूमिका यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. वाढत्या गुंतागुंतीच्या जागतिक संरक्षण वातावरणात अनुकूल नेतृत्व आणि परिचालन सज्जतेचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

वेलिंग्टन येथील मद्रास रेजिमेंटल सेंटरला दिलेल्या भेटीदरम्यान, सीओएएस यांनी प्रशिक्षण आणि प्रशासकीय सुविधांचा आढावा घेतला. याशिवाय परिचालन कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूलमध्ये प्रगत तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणावर भर दिला. भारतीय सशस्त्र दलांची तांत्रिक अनुकूलता आणि धोरणात्मक प्रतिसादात्मकता बळकट करण्याच्या उद्देशाने लष्करी परिवर्तनाच्या प्रमुख उपक्रमांबाबतही त्यांनी चर्चा केली.

त्यानंतर लष्करप्रमुख सिकंदराबाद येथील मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंगला (एमसीईएमई) भेट दिली. या ठिकाणी त्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य विकास उपक्रमांची माहिती देण्यात आली. काउंटर-ड्रोन प्रणाली, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये संस्थेने दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली आणि विकसित भारत 2047 अंतर्गत भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीकोनाला पाठिंबा देण्यात एमसीईएमईच्या भूमिकेची दखल घेतली.

तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज सैनिकांचे महत्त्व अधोरेखित करत, जनरल द्विवेदी यांनी लष्करी उपकरणांच्या नवीनतम पिढीसाठी कर्मचारी तयार करण्यासाठी प्रशिक्षण अभ्यासक्रमात अत्याधुनिक प्रगती एकत्रित करण्याचे आवाहन केले.

27 मार्च रोजी जनरल द्विवेदी सिकंदराबाद येथील संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयाला (सीडीएम) भेट देणार आहेत, जिथे ते नवी दिल्लीला परतण्यापूर्वी विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करतील आणि रोलिंग चषक प्रदान करतील.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleसंरक्षण नवकल्पनांसाठी 50 स्टार्ट-अप्स, एमएसएमईची बैठक संपन्न
Next articleभारतीय खासदाराची उमेदवारी कॅनडाच्या लिबरल पार्टीकडून रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here