ऑस्ट्रेलिया: बोंडी गोळीबार घटनेतील मृत हल्लेखोर मूळचा हैदराबादचा

0
बोंडी
सिडनीमधील बोंडी बीच येथे दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मारल्या गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ शोकाकुल नागरिक जमले. 

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवरील झालेल्या गोळीबारातील हल्लेखोराचा भारताशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे: दोन हल्लेखोरांपैकी मोठा साजिद अक्रम हा मूळचा हैदराबादचा होता आणि तो 1998 मध्ये शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. शहरातील त्याच्या नातेवाईकांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या  वृत्तांनुसार ही माहिती समोर आली आहे.

साजिदचा त्याच्या कुटुंबाशी फारसा संपर्क नव्हता आणि कौटुंबिक वादामुळे त्याने संबंध तोडले होते. तो 2022 मध्ये हैदराबादमध्ये होता आणि त्याच्याकडे अजूनही भारतीय पासपोर्ट होता. त्याचा मुलगा नवीद, जो दुसरा हल्लेखोर होता याच्यावर सध्या सिडनीच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साजिदची मुलगी ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत.

पोलिसांनी सांगितले की, साजिदच्या कथित कट्टरतावादाचा आणि भारताचा या संदर्भात कोणत्याही प्रकारचा वैचारिक संबंध असल्याचे दर्शवणारा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

मात्र साजिद आणि नवीद या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी फिलिपाईन्समध्ये आले होते आणि 28 नोव्हेंबर रोजी तेथून निघाले या गोष्टीला फिलिपिन्सच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दक्षिण फिलिपिन्समधील दावाओ या ठिकाणी ते शेवटचे गेले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिंदनाओ बेटावरील दावाओ हा एक गरीब भाग असून, ऐतिहासिकदृष्ट्या तिथे इस्लामिक गट कार्यरत आहेत. उदाहरणार्थ, अबू सय्याफ गटाने इस्लामिक स्टेटशी निष्ठा जाहीर केली होती आणि सध्या त्यांच्याकडे सुमारे 100 सशस्त्र सैनिक आहेत. त्यांना एक इस्लामिक राज्य स्थापन करून शरिया कायदा लागू करायचा आहे.

साजिद आणि नाविद यांनी दावाओ भेटीदरम्यान कोणते लष्करी प्रशिक्षण घेतले होते की नाही, याची पुष्टी फिलिपिन्सचे अधिकारी करू शकले नाहीत. त्यामुळे, फिलिपिन्स भेटीचा त्यांचा उद्देश हा अजूनही पोलिसांच्या तपासाचा विषय आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleतिबेटींनी दिला 6 व्या दलाई लामाच्या आठवणींना उजाळा, चीनचा धोका कायम
Next articleबोंडी बीचवरील हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियात लागू होणार आपत्कालीन शस्त्र कायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here