बांगलादेशात अल्पसंख्यांकावर होणाऱ्या हल्ल्यांबाबत एक नवीन अपडेट समोर आला आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना यांची बांग्लादेशातून हकालपट्टी केल्यानंतर, बांगलादेशने प्रथमच अल्पसंख्याकांना लक्ष्य करून करण्यात 88 हल्ल्यांची पुष्टी केली आहे. मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी ही आकडेवारी जाहीर केली असून, या वृत्ताची पुष्टी करत जातीय हिंसाचाराच्या अंतर्गत 70 लोकांना अटक करण्यात आली आहे.
आलम यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटल्यानुसार, “बांगलादेशच्या ईशान्य (सुनामगंज), मध्य (गाझीपूर) आणि इतर भागात अल्पसंख्यांकावरील हिंसाचाराच्या नवीन घटनांची नोंद झाल्यामुळे यासंबंधी प्रकरणांची आणि त्यातील अटकेची संख्या वाढण्याची शक्यता आहे.” त्यांनी अहवालात सूचित केले आहे की, या अटकांमध्ये बांगलादेशचे काही माजी सत्ताधारी पक्ष तसेच अवामी लीगचे काही सदस्य यांचा समावेश असू शकतो. तरी याबाबत कुठलाही हिंसाराच रोखण्यासाठी पोलीस योग्य ती कारवाई करत असल्याचेही ते म्हणाले.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या बांगलादेशी समकक्ष मोहम्मद जशीमुद्दीन यांच्याशी ढाका येथे झालेल्या चर्चेनंतर हे सर्व खुलासे करण्यात आले आहेत.
भारताला बांगलादेशशी चांगले संबंध प्रस्थापित करायते असून, नवीन सरकारसोबत काम करण्यास भारत इच्छुक असल्याचे अधोरेखित करत, मिश्री यांनी अल्पसंख्याकांवर आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली.
बांगलादेशी डिप्लोमॅट्स असलेल्या ढाकाने ट्रिब्यूनला याविषयी माहिती देताना म्हटले आहे की, ‘दोन्ही बाजूंनी पाणी वाटप करण्याबाबत तसेच दोन्हीकडील कनेक्टिव्हिटीपासून सीमा सुरक्षा आणि संरक्षणाच्य मुद्द्यांवर संवादासाठी 80 द्विपक्षीय यंत्रणा पुन्हा सक्रिय करणे आवश्यक आहे.’ “द्विपक्षीय यंत्रणा या दर महिन्याला अंदाजे दोन ते तीन बैठका आजोयित करतात. मात्र, 5 ऑगस्टपासून आजपर्यंत केवळ तीन ते चार बैठका झाल्या आहेत. जर बैठकांची संख्या हळूहळू वाढली तर परस्पर संवाद सुधारेल आणि सहकार्य वाढवण्यासंदर्भात संकेत दिले जातील”, असेही ढाकाने ट्रिब्यूनच्या अहवालात म्हटले आहे,
दरम्यान, ‘भारताकडून सामान्य व्हिसा सेवा पुन्हा सुरू करणे हा एक मोठा सकारात्मक संकेत असेल,’ असे एका अज्ञात डिप्लॉमॅटने म्हटले आहे.
दरम्यान, “आम्हा सर्वांना हे मतभेद शांततेने सोडवायचे आहेत”, असे वक्तव्य अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये मंगळवारी स्टेट डिपार्टमेंट ब्रीफिंग दरम्यान बोलताना, प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी केले.
सूर्या गंगाधरन
अनुवाद- वेद बर्वे