आशियातील सर्वात मोठा एरो शो, ‘एरो इंडिया 2025’ चे, 15 वे सादरीकरण, 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान, कर्नाटकातील बेंगळुरू येथे पार पडेल. बंगळुरूच्या ‘येलाहंका’ येथील एअरफोर्स स्टेशनवर हा दिमाखदार सोहळा पार पडेल. “द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज” या थीमसह जागतिक एरोस्पेस, मूल्यांमध्ये नवीन मार्ग शोधत असाताना, भारतीय आणि परदेशी कंपन्यांमध्ये सहकार्य वाढवणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. स्वदेशीकरणाला चालना देण्यातही हा विशेष कार्यक्रम हातभार लावेल.
कार्यक्रमाचे पहिले तीन दिवस – फेब्रुवारी 10, 11 आणि 12—व्यावसायिक अभ्यागतांसाठी राखीव असतील, तर शेवटचे दोन दिवस, – 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी, नेत्रदीपक हवाई प्रदर्शनांचा अनुभव घेण्याची संधी सर्वसामान्य लोकांना मिळेल. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, या कार्यक्रमात ‘डायनॅमिक एअर डिस्प्ले, प्रगत लष्करी प्लॅटफॉर्मचे स्थिर प्रदर्शन आणि नवीनतम एरोस्पेस तंत्रज्ञान’ आदींचा समावेश असेल.
एरो शोच्या याआधीच्या आवृत्त्यांप्रमाणेच, Aero India 2025 मध्ये अनेक महत्त्वाच्या इव्हेंट्सचा समावेश असेल. ज्यामध्ये उद्घाटन समारंभ, संरक्षण मंत्र्यांची परिषद, सीईओंचे राउंडटेबल आणि मंथन स्टार्ट-अप इव्हेंट यांचा समावेश असेल. यात सहभागी होणारे लोक भव्य हवाई शो आणि विस्तृत प्रदर्शन क्षेत्राचा अनुभव घेऊ शकतील. ज्यामध्ये भारत पॅव्हेलियनसोबत एक व्यापार मेला दाखवला जाईल, ज्यात आघाडीच्या एरोस्पेस कंपन्यांचा समावेश असेल.
धोरणात्मक भागीदारीवर लक्ष केंद्रित
संरक्षण मंत्र्यांचा परिषद “BRIDGE – Building Resilience through International Defence and Global Engagement” या थीमवर आधारित असणार आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय संरक्षण सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येईल. या उपक्रमामध्ये, सहयोगी राष्ट्रांमधील- सहकारी सुरक्षा आणि विकासाच्या प्रयत्नांद्वारे परस्पर समृद्धीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
या इव्हेंटमध्ये भारताचे संरक्षण मंत्री, संरक्षण राज्यमंत्री, संरक्षण मुख्यालय प्रमुख आणि इतर उच्च अधिकाऱ्यांच्या सहभागात उच्च-स्तरीय द्विपक्षीय बैठका पार पडतील. या चर्चांचा उद्देश. मित्र देशांसोबत संरक्षण आणि एरोस्पेस संबंध मजबूत करणे आणि भागीदारीच्या नवीन क्षेत्रांचा शोध घेणे हा आहे.
स्वदेशी इनोव्हेशन आणि स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन
इव्हेंटच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे इंडिया पॅव्हेलियन, जे भारताच्या ‘मेक-इन-इंडिया’ कामगिरीचे प्रदर्शन करेल. यात स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमता आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सज्ज असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान सामाविष्ट असेल. भारतातील स्टार्ट-अप्स- iDEX पॅव्हेलियनमध्ये केंद्रस्थानी असतील, जे अत्याधुनिक नवकल्पनांचे आणि उत्पादनांचे प्रदर्शन करतील. हा कार्यक्रम संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करेल
जागतिक सहकार्यासाठी संधी
यावेळी विविध सीईओंच्या राउंडटेबल बैठकीद्वारे, ‘जागतिक ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्ट युजर्स’ (OEMs) साठी, भारतात उत्पादनाच्या संधींचा शोध घेण्याचा एक मंच तयार केला जाईल. या बैठकीत जागतिक सीईओ, स्थानिक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे प्रमुख (PSUs) आणि खाजगी एरोस्पेस आणि संरक्षण कंपन्यांमधील वरिष्ठ कार्यकारी उपस्थित असतील.
भूतकाळातील यशावर आधारित
1996 मध्ये बेंगळुरू येथे पदार्पण केल्यापासून, एरो इंडियाने आजवर 14 यशस्वी इव्हेंटसह, ‘प्रीमियर एरोस्पेस’ म्हणून जागतिक ओळख मिळवली आहे. 2023 मधील शेवटच्या इव्हेंटने 7 लाखांहून अधिक सामान्य लोकांना, 98 देशांतील विविध मान्यवरांना आणि 809 प्रदर्शकांना आकर्षित केले होते. व्यवसाय, गुंतवणूकदार, स्टार्ट-अप्स आणि MSMEs यांचा समावेश होता.
2023 च्या शोने, 250 हून अधिक व्यावसायिक भागीदारी सुकर केल्या होत्या, ज्यामध्ये 201 सामंजस्य करार, उत्पादन लॉन्चिंग्स आणि 75 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तंत्रज्ञान हस्तांतरण यांचा समावेश आहे. आता ‘एरो इंडिया 2025’ हे टप्पे ओलांडण्यासाठी तयार आहे, जे आणखी मोठ्या प्रमाणावर, नाविन्यपूर्ण आणि भव्यतेचे आश्वासन देतील.