Saturday, March 7, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi बांगलादेश निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळवत BNP विजयी

बांगलादेश निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळवत BNP विजयी

0

गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (BNP) निर्णायक दोन-तृतीयांश बहुमत मिळवले, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पदच्युतीनंतर अनेक महिन्यांच्या अशांततेनंतर राजकीय स्थिरतेचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.

दक्षिण आशियातील या देशात गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच खरोखरच्या स्पर्धात्मक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या निवडणुकीतील ताज्या मतमोजणीत BNP आणि त्यांच्या मित्रपक्षांना 299 जागांपैकी किमान 212 जागा मिळाल्या आहेत, असे स्थानिक टीव्ही चॅनेल्सनी म्हटले आहे. विरोधी जमात-ए-इस्लामी आणि त्यांच्या मित्रपक्षांना राष्ट्रीय संसदेत किंवा हाऊस ऑफ द नेशनमध्ये 70 जागा मिळाल्या आहेत.

20 वर्षांनंतर सत्तेत परतणाऱ्या BNP ने रात्रभर चाललेल्या मतमोजणीत बहुमत मिळवल्यानंतर लगेचच जनतेचे आभार मानले आणि शुक्रवारी देश आणि त्यांच्या नागरिकांसाठी विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

175 दशलक्ष मुस्लिम बहुसंख्येच्या या देशात काही महिन्यांच्या प्राणघातक हसीनाविरोधी अशांततेमुळे दैनंदिन जीवन आणि वस्त्रोद्योग विस्कळीत झाल्यानंतर, एक स्पष्ट निकाल स्थिरतेसाठी महत्त्वाचा मानला जात होता. वस्त्रोद्योग निर्यातीत बांगलादेश जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बीएनपी नेते तारिक रहमान पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पक्षाचे संस्थापक, माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांचे पुत्र असलेले तारिक रहमान 18 वर्षे परदेशात राहून डिसेंबरमध्ये राजधानी ढाका येथे परतले.

ऑगस्ट 2024 मध्ये हसीना शेजारच्या भारतात पळून गेल्यानंतर 85 वर्षीय नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांनी अंतरिम प्रमुख म्हणून पदभार सांभाळला.

आता नवी दिल्लीत निर्वासित असलेल्या, हसिना यांनी रहमान यांच्या आई खालिदा झिया यांच्यासह बांगलादेशच्या राजकारणावर बराच काळ वर्चस्व गाजवले, तर त्यांचे वडील 1977 ते 1981 पर्यंत राज्य करणारे एक आघाडीचे स्वातंत्र्य नेते होते ज्यांनी नंतर हत्या करण्यात आली.

मतदान संपल्यानंतर गुरुवारी लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. कागदी मतपत्रिकांची मॅन्युअली मोजणी शुक्रवारी दुपारपर्यंत चालेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

200 पेक्षा जास्त जागांसह BNP चा विजय हा त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. 2001 मध्ये या पक्षाला 193 जागांवर विजय मिळाला होता. तर 15 वर्षे राज्य करणाऱ्या आणि यावेळी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आलेल्या हसीना यांच्या अवामी लीगने 2008 मध्ये 230 जागांवर विजय मिळवला होता.

मात्र इतर वर्षांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांसाठी मोठ्या संख्येने मिळालेली मते एकतर्फी, बहिष्कृत किंवा वादग्रस्त म्हणून पाहिली गेली.

जमातने दिले सकारात्मक विरोधाचे आश्वासन

त्यांच्या मुख्य प्रतिस्पर्धी, जमात-ए-इस्लामीच्या प्रमुखांनी पराभव मान्य केला असून केवळ यासाठी त्यांचा पक्ष विरोधासाठी विरोध अशा “राजकारणात” सहभागी होणार नाही असे सांगितले आहे.

मात्र, हसीना यांना पदच्युत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि जमातच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भाग असलेल्या युवा कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल सिटीझन पार्टीला (एनसीपी) लढवलेल्या 30 जागांपैकी फक्त पाच जागांवर विजय मिळवता आला आहे.

2024 मध्ये गेल्या निवडणुकीच्या 42 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे दिसून आले, मीडियाने म्हटले आहे की नोंदणीकृत मतदारांपैकी 60 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी यात भाग घेतला असावा.

2 हजारांहून अधिक उमेदवारांची नावे, ज्यात अनेक अपक्ष होते, मतपत्रिकेवर होती, ज्यामध्ये किमान 50 पक्षांची विक्रमी संख्या होती. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका मतदारसंघातील मतदान पुढे ढकलण्यात आले.

जमुना टीव्हीने सांगितले की निवडणुकीसोबत झालेल्या घटनात्मक सुधारणांवरील जनमत चाचणीत 20 लाखांहून अधिक मतदारांनी “होय” या पर्यायाची निवड केली, तर 8 लाख 50 हजारांहून अधिक मतदारांनी “नाही” च्या बाजूने निकाल दिल्याचे म्हटले आहे. मात्र या निकालाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

या बदलांमध्ये पंतप्रधानांसाठी दोन कार्यकाळांची मर्यादा आणि मजबूत न्यायालयीन स्वातंत्र्य तसेच महिलांचे प्रतिनिधित्व यांचा समावेश आहे, तर निवडणुकीच्या काळात तटस्थ अंतरिम सरकारांची तरतूद करणे आणि 300 सदस्यांच्या संसदेचे दुसरे सभागृह स्थापन करणे यांचा समावेश आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleRafale 2.0: Catalyst for Make in India
Next articleIAF, Royal Thai Air Force Hold Four-Day Air Combat Exercise Over Indian Ocean

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here