संबंध सुरळीत होण्याच्या आशेने कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर येणार

0

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद 13-14 ऑक्टोबर रोजी भारत दौऱ्यावर येण्याची अपेक्षा आहे. 2023 मध्ये उभय देशांमधील संबंध बिघडल्यानंतर मंत्री स्तरावरून होणारा हा पहिलाच संवाद असेल.

 

 

दीर्घकाळ चाललेल्या राजनैतिक तणावानंतर दोन्ही देश संबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करतील.

उच्चायुक्तांची पुनर्नियुक्ती आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांवरील निर्बंध शिथिल करणे यासह संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावेत यासाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नवी दिल्लीत भेट झाली तेव्हा सुरक्षा-स्तरीय चर्चेला पुन्हा सुरूवात केली. आनंद यांच्या या दौऱ्याचा उद्देश याच चर्चेला वेग मिळावा असा आहे.

चर्चेत दहशतवादविरोधी आणि सुरक्षा सहकार्य, विशेषतः गुप्तचर माहितीचे शेअरिंग आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीशी लढण्यासाठी आवश्यक सहकार्य या सारखे मुद्दे प्रामुख्याने मांडले जाण्याची अपेक्षा आहे. गेल्या दोन वर्षांच्या तणावानंतरही, दोन्ही देशांशी कायद्याच्या अंमलबजावणीत सहकार्य करण्याची गरज दर्शविली आहे.

सर्वात अवघड मुद्दा म्हणजे निज्जर आणि पन्नून प्रकरणांमधील परिणाम. जून 2023 मध्ये ब्रिटिश कोलंबियामध्ये शीख फुटीरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याची हत्या करण्यात आली. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी यामागे भारतीय एजंट्चा हात असल्याचा आरोप केला, ज्यामुळे भारताने कॅनेडियन राजदूतांना देश सोडून जाण्यास सांगितले. त्यानंतर उभय देशांमधील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत तणावपूर्ण बनले.

एप्रिल 2025 मध्ये जेव्हा मार्क कार्नी कॅनडाचे पंतप्रधान बनले आणि त्यांनी भारताबाबत सौम्य दृष्टिकोन दर्शविला त्यावेळी परिस्थिती बदलली. ऑगस्टपर्यंत, दोन्ही देशांनी नवीन उच्चायुक्तांची नियुक्ती केली आणि शांततापूर्ण चर्चेला पुन्हा एकदा सुरूवात झाली.

अर्थात, शीख फुटीरतावादी नेत्यांशी संबंधित हत्येच्या कटातील अमेरिका आणि कॅनेडियन तपास अजूनही संबंधांवर मोठा परिणाम करत आहेत. सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या 61 पानी अहवालात अमेरिकन न्यायालयाने निज्जरच्या हत्येचा आणि गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येच्या अयशस्वी प्रयत्नामागे भारताचा हात असल्याचा आरोप केला.

या कागदपत्रांमध्ये माजी भारतीय गुप्तचर अधिकारी विकास यादव आणि कथित मध्यस्थ निखिल गुप्ता यांच्यातील संवादांचा उल्लेख आहे. भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत, परराष्ट्र मंत्रालयाने या कारवाईबाबत भाष्य करण्यास नकार दिला असून टीकाकारांनी अकाली निष्कर्ष काढले असल्याचा आरोप केला आहे.

कॅनडा सरकारने अलीकडेच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. आंतरराष्ट्रीय नेटवर्क असलेल्या या गटाचा निज्जरच्या हत्येशी संबंध आहे आणि कॅनडामध्ये झालेल्या ताज्या गोळीबाराची जबाबदारी या गटाने घेतली आहे.

राजनैतिक निरीक्षकांचे म्हणणे आहे की आनंद यांची ही भेट महत्त्वाची आहे कारण ती दोन्ही बाजूंनी अद्याप तोडगा न निघालेल्या वादांनंतरही सहभागी होण्याची तयारी दर्शवते. कॅनडासाठी, संवेदनशील कायदेशीर प्रकरणांचा पाठपुरावा करताना ते एका प्रमुख इंडो-पॅसिफिक भागीदाराशी संबंध स्थिर करण्याची संधी दर्शवते. भारतासाठी, द्विपक्षीय अजेंड्यावर फुटीरतावादी राजकारणाचे नियंत्रण होण्यापासून रोखण्यासाठी ओटावा किती गंभीर आहे याचे हे एक मोजमाप असेल.

काहींना या भेटीतून मोठ्या यशाची अपेक्षा असली तरी, अशा उच्चस्तरीय चर्चा होत असतात ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन दोन्ही देश सावधगिरीने पुढे जाण्यास तयार आहेत याचे संकेत म्हणून या भेटीकडे पाहिले जाते. नवी दिल्लीतील आनंद यांच्या होणाऱ्या बैठका भविष्यातील संवादाची दिशा निश्चित करतील आणि अधिक व्यावहारिक संबंधांसाठी पाया रचण्यास मदत करतील अशी अपेक्षा आहे.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleThrustworks Dynetics Secures Funding to Build India’s Next Rocket Engine Platform
Next articleभारत हवामानाशी संबंधित ‘देशव्यापी विमा योजना’ सुरू करण्याचा विचारात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here