रडार वादाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून जपानच्या “लष्करी चिथावणीचा” निषेध

0
जपानच्या

‘चीनच्या लढाऊ विमांनानी, नौदल कवायतींदरम्यान आमच्या लष्करी विमानांना रडारद्वारे लक्ष्य केले’ असा दावा जपानने केल्यानंतर, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जपानवर “लष्करी चिथावणी” केल्याचा आरोप केला आहे, तसेच टोकियोचे हे वर्तन “पूर्णपणे अस्वीकार्य” असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. या वादामुळे तैवान आणि प्रादेशिक सुरक्षा यावरून दोन्ही शेजारी देशांमध्ये वाढत असलेला तणाव पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

बीजिंग आणि टोकियोकडून आरोप-प्रत्यारोप

हा वाद तेव्हा अधिक पेटला, जेव्हा जपानने आठवड्याच्या अखेरीस, मियाको सामुद्रधुनीच्या पूर्वेला पायलट्सच्या उड्डाण प्रशिक्षण कवायतींदरम्यान चिनी वैमानिकांनी केलेल्या धोकादायक कृत्याची निंदा केली. जपानच्या सेल्फ-डिफेन्स फोर्सेसनुसार, चिनी विमानांनी जपानी जेट्सवर आपले रडार लॉक करणे हा संभाव्य धोका होता, ज्यामुळे त्यांच्या वैमानिकांना बचावात्मक उपाययोजना करणे भाग पडले.

बीजिंगने हा आरोप फेटाळला असून, जपानने वारंवार विमाने पाठवून चीनच्या कायदेशीर नौदल प्रशिक्षणात “हस्तक्षेप केल्याचा” आरोप केला. चिनी संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, ‘या कवायती सार्वजनिकरित्या घोषित केल्या होत्या, मात्र टोकियोने यामध्ये तणाव निर्माण केला.’

काही आठवड्यांपूर्वी, जपानच्या पंतप्रधान सनेई ताकाईची यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, दोन्ही राष्ट्रांमधील संबंध बिघडले आहेत. ताकाईची म्हणाल्या होत्या की, “तैवानविरुद्धच्या कोणत्याही चिनी लष्करी कारवाईने, जपानच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यास टोकियो त्याला थेट प्रत्युत्तर देऊ शकतो,” त्यांच्या या वक्तव्यावर बीजिंगकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

‘ऐतिहासिक घटनेवरून’ वांग यी यांचा जपानला टोला

सोमवारी, बीजिंगमध्ये जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वाडेफुल यांची भेट घेत असताना, वांग यी यांनी युद्धाच्या इतिहासाचा उल्लेख केला. त्यांनी जपानला टोला लगावत आठवण करून दिली की, ‘यावर्षी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला 80 वर्षे पूर्ण होत असून, जपानने “पराजित राष्ट्र” म्हणून अधिक संयमाने वागले पाहिजे.’

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, वांग म्हणाले की, “जपानचे सध्याचे नेतृत्व आता तैवान प्रश्नाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्या प्रदेशात जपानने अर्ध्या शतकाहून अधिक काळ वसाहतवाद केला होता आणि चिनी लोकांविरुद्ध असंख्य गुन्हे दाखल केले होते. तथापि, आता त्याच मुद्द्याचा फायदा उचलत जपान, चीनला लष्करीदृष्ट्या धमकावण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, जे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.”

ते पुढे म्हणाले की, “जपानच्या नेतृत्वाने तैवानशी संबंधित काल्पनिक परिस्थितींविषयी “बेपरवेशीर वक्तव्ये” केली आहेत आणि त्यांना गंभीर चिथावणी असल्याचे म्हटले आहे.” वांग यांनी चीनचा हा दृष्टिकोन पुनरुच्चारित केला की, ‘तैवान हा त्यांचाच भूभागाचा भाग आहे, आणि हे निश्चितपणे आणि अपरिवर्तनीयपणे ऐतिहासिक आणि कायदेशीर तथ्यांनी सिद्ध झाले आहे.”

ऐतिहासिक दाव्यांशी स्पर्धा

जपानने 1895 पासून, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत तैवानवर राज्य केले, त्यानंतर हे बेट रिपब्लिक ऑफ चायना (ROC) सरकारकडे सोपवण्यात आले. माओ त्से तुंगच्या कम्युनिस्ट सैन्याकडून गृहयुद्धात पराभूत झाल्यानंतर, आर.ओ.सी. 1949 मध्ये तैवानकडे परत फिरले, ज्यांनी चीनच्या मुख्य भूमीवर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (PRC) ची स्थापना केली.

‘पीआरसीने (PRC) या बेटावर कधीही शासन केले नाही’; असा युक्तिवाद करत तैवानच्या सरकारने बीजिंगचे दावे वारंवार फेटाळले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शिआओ कुआंग-वेई यांनी मंगळवारी सांगितले की, “केवळ तैवानचे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकारच आंतरराष्ट्रीय स्तरावर, तैवानच्या 23 दशलक्ष लोकांचे प्रतिनिधित्व करू शकते.”

पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (PRC), हे चीनचे एकमेव कायदेशीर सरकार म्हणून रिपब्लिक ऑफ चायना (ROC) चे उत्तराधिकारी आहे आणि म्हणूनच “सर्गिकरित्या तैवानवर सार्वभौमत्व राखण्याचा” बीजिंगचा दावा कायम आहे.

जपानने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला

रडार प्रकरणाबाबत विचारणा केली असता, जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव मिनोरू किहारा यांनी चीनचे स्पष्टीकरण फेटाळून लावले आणि या कृतीला “सुरक्षित आणि आवश्यकतेपेक्षा अधिक धोकादायक कृत्य” म्हटले. 2008 मध्ये संकट संप्रेषणासाठी स्थापन केलेल्या द्विपक्षीय हॉटलाइनद्वारे बीजिंगने प्रतिसाद दिला की नाही, याची पुष्टी करण्यास त्यांनी नकार दिला.

किहारा पुढे म्हणाले की, “जपान चीनच्या लष्करी हालचालींवर शांतपणे परंतु ठामपणे लक्ष ठेवेल, आणि प्रादेशिक स्थिरता राखणे ही टोकियोचे सर्वोच्च प्राधान्य असेल.”

अलीकडील या राजनैतिक वादामुळे- तैवान, सागरी सीमा आणि ऐतिहासिक तक्रारींवर आधारित, दोन्ही आशियाई शक्तींमधील संघर्ष बळावला आहे, ज्यामुळे पूर्व चीन समुद्रात आणखी तणाव निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleसांस्कृतिक क्रांतीचा नॉस्टाल्जिया झपाट्याने वाढला, नाहीसा झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here