चीनचा 10 अब्ज डॉलर्सचा कालवा पूर्णत्वाच्या मार्गावर

0
कालवा

चीन एक महत्त्वाचा नवीन कालवा लवकरच सुरू करणार असून यामुळे त्याच्या अंतर्गत प्रदेश आणि आग्नेय आशिया दरम्यानच्या मालवाहतुकीचे स्वरूप लक्षणीयरीत्या बदलू शकते.

10 अब्ज डॉलर्सचा पिंगलू कालवा 2026 च्या अखेरीस पूर्ण होऊन कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, असे वृत्त ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिले आहे.

गुआंग्शी झुआंग स्वायत्त प्रदेशात असलेला हा कालवा, प्रादेशिक राजधानी नानिंगपासून दक्षिण चीन समुद्रावरील टोंकिनच्या आखातापर्यंत सुमारे 134 किलोमीटर लांब आहे. एकदा कार्यान्वित झाल्यावर, तो अंतर्गत शिजिआंग नदी प्रणालीला थेट किनारपट्टीशी जोडेल, ज्यामुळे एक वेगळा आणि स्वस्त सागरी वाहतूक मार्ग तयार होईल.

5 हजार टन वजनाची जहाजे हाताळण्यासाठी डिझाइन केलेला हा कालवा मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करू शकेल. या प्रकल्पात तीन दुहेरी मार्गी जहाज लॉक केंद्रे आणि जवळपास 30 नवीन किंवा सुधारित पुलांचा समावेश आहे, ज्यामुळे जहाजांना उंचीतील बदल व्यवस्थापित करून नदी प्रणाली आणि समुद्र यांच्या दरम्यान सहजपणे प्रवास करणे शक्य होईल.

चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ग्वांगडोंग प्रांतामार्गे असलेल्या सध्याच्या मार्गांच्या तुलनेत या कालव्यामुळे समुद्रापर्यंतचे 560 किलोमीटरपेक्षा जास्त असणारे अंतर आता कमी होईल, ज्यामुळे पश्चिम आणि नैऋत्य चीनमधील व्यवसायांसाठी लॉजिस्टिक्स खर्चात लाखो डॉलर्सची बचत होईल आणि वितरणाचा वेळ कमी होईल.

पिंग्लू कालवा हा चीनच्या नवीन आंतरराष्ट्रीय भू-समुद्री व्यापार मार्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्याचा उद्देश अंतर्गत प्रांत आणि जागतिक बाजारपेठा, विशेषतः आग्नेय आशियातील बाजारपेठांमधील संपर्क सुधारणे हा आहे.

अधिकाऱ्यांनी कालव्याचे आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी बांधकाम-पश्चात नियमांची रूपरेषा देखील आखली आहे, जी दीर्घकालीन, शाश्वत कार्यान्वयनावर लक्ष केंद्रित करते.

एकदा हा मार्ग सुरू झाल्यावर, पिंग्लू कालवा हा चीनच्या सर्वात महत्त्वाच्या अंतर्गत जलवाहतूक मार्गांपैकी एक म्हणून उदयास येईल, ज्यामुळे देशाचा अंतर्गत भाग, त्याचा दक्षिणेकडील किनारा आणि प्रादेशिक बाजारपेठा यांच्यातील संबंध अधिक मजबूत होतील.

अनुकृती 

+ posts
Previous articleबांगलादेश निवडणूक चर्चेत भारताचा नामोल्लेख क्वचितच का केला जातोय?
Next articleबांगलादेश निवडणुकीवर परकीय प्रभाव… त्यात भारतही आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here