गुआममध्ये सुरु असलेल्या अमेरिकेच्या ‘क्षेपणास्त्र चाचणी’ दरम्यान, शहरात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असलेल्या, सात चिनी नागरिकांना अटक करण्यात आली, अशी माहिती गुआमच्या ‘कस्टम्स आणि क्वारंटाईन एजन्सी’ने दिली. त्यावेळी गुआमध्ये U.S. च्या ‘मिसाईल डिफेन्स एजन्सीद्वारे’ नवीन रडार वापरुन तयार करण्यात आलेल्या मुख्य क्षेपणास्त्रांची अवरोध चाचणी सुरु होती.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 10 आणि 11 डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या घुसखोरांपैकी चारजण “लष्करी तळांच्या परिसरामध्ये” सापडले. गुआममध्ये अँडरसन एअर फोर्स बेससह अशी अनेक लष्करी तळं आहेत, जिथे 10 डिसेंबर रोजी क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली होती.
तपास अद्याप सुरु
“यूएसच्या लष्करी सुविधांविरूद्ध केलेली हेरगिरी, विशेषत: क्षेपणास्त्र प्रक्षेपण क्षमता असलेल्या भागांमध्ये केलेली हेरगिरी, ‘PCR’ (Police Control Room) ला संभाव्य मौल्यवान माहिती प्रदान करू शकते,” असे इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉरने शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
ग्वामानियनच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, अटक करण्यात आलेले सर्व चिनी घुसखोर हे सायपनहून एकाच बोटीमध्ये आले असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस आणि सुरक्षा एजन्सीजचा सध्या सखोल तपास सुरु आहे.
याबाबत चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने, अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नसल्याचे समजते.
हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण नेटवर्क
युनायटेड स्टेट्सने, गुआम बेटाच्या आजूबाजूच्या 16 विविध साईट्सवर ‘हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण नेटवर्क’ तयार करण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे गुआमवरील कोणत्याही क्षेपणास्त्र हल्ल्याला रोखण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते.
सर्वात प्रगत यूएस क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि रडार एकत्रित करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढील दहा वर्षात, $10 अब्ज डॉलर्स इतका खर्च केला जाऊ शकतो.
दरम्यान 10 डिसेंबर रोजी करण्याच आलेली क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी झाली असून, क्षेपणास्त्र संरक्षण एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ‘दरवर्षी अशाप्रकारच्या दोन इंटरसेप्शन चाचण्या घेतल्या जाऊ शकतात.’
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार, ‘युनायटेड स्टेट्स गुआम बेटाच्या आजूबाजूच्या 16 ठिकाणी हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण नेटवर्क तयार करत आहे, ज्यामुळे गुआमवरील कोणत्याही क्षेपणास्त्र हल्ल्याला रोखण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते. त्यासाठी युएस उभारत असलेल्या क्षेपणास्त्र संरक्षण नेटवर्क क्षमतेचे बळकटीकरण करणे भविष्यात महत्वाचे ठरेल.
ही अद्ययावत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि रडार यंत्रणा एकत्रित करणे, हे अमेरिकेच्या या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ज्याकरता भविष्यात लक्षावधी डॉलर्सचा खर्च येऊ शकते, असे अहवालात स्पष्ट केले आहे.
(रॉयटर्स)