डोवाल-यी चर्चाः LAC सीमा समस्येबाबत मोठे निर्णय

0

2020 मध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या चीनच्या परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत व्यापक चर्चा केली. त्यांनी सकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांची भेट घेतली आणि नंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले.

 

वांग आणि डोवाल यांच्यातील चर्चा सीमा स्थिरता पुन्हा स्थापित करण्यावर आणि भारत-चीन संबंधांना नवीन गती देण्यावर केंद्रित होती. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्याच्या पूर्वसंध्येला एनएसए डोवाल यांनी या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. भूतकाळातील अडचणी परस्पर हितासाठी उपयुक्त ठरल्या नाहीत हे दोन्ही बाजूंनी मान्य केले.

परराष्ट्र मंत्री (ईएएम) एस. जयशंकर – ज्यांनी देखील वांग यांची भेट घेतली – यांनी संबंधांमध्ये कोणत्याही ठोस सुधारणासाठी सीमेवर शांतता ही एक पूर्वअट असल्याचा पुनरुच्चार केला. दरम्यान, चीनने खते, दुर्मिळ खनिजांपासून ते बोगदा बोरिंग मशीनपर्यंतच्या गोष्टी भारताला देण्यासाठी  सहमती दर्शविली.

भारतशक्तीचे मुख्य संपादक नितीन गोखले यांनी या चर्चेवर भाष्य करताना, ‘अनेक सकारात्मक निर्णयांबरोबरच, प्रदीर्घ काळापासून सुरू असणाऱ्या सीमाप्रश्नावर प्रमुख निर्णयांबाबत’ ही एक ‘प्रगती’ असल्याचे वर्णन केले.

प्रमुख परिणाम आणि निष्कर्ष

गोखले यांनी एक्सवर शेअर केलेल्या ठळक मुद्द्यांनुसार, पुढील घडामोडी समोर आल्या:

1. सीमा सीमांकनावर ‘Early Harvest’

दोन्ही बाजूंनी सीमा क्षेत्रांच्या सीमांकनात “Early Harvest’ दृष्टिकोनावर चर्चा केली. यामध्ये कमी वादग्रस्त मध्य क्षेत्राचे नकाशे देवाणघेवाण करणे समाविष्ट असू शकते – असे काहीसे 2002 मध्ये करण्याचा थोडासा प्रयत्न झाला होता परंतु पुढे कधीही केला गेला नाही. नवीन सहमत झालेल्या तज्ज्ञ गट यंत्रणेद्वारे आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते.

2. उच्च-स्तरीय लष्करी सहभाग

पहिल्यांदाच, थ्री स्टार पातळीवरील जनरल केवळ पश्चिम (लडाख) क्षेत्रातच नव्हे तर पूर्व आणि मध्य क्षेत्रांमध्ये देखील चर्चेत सहभागी होतील. भारतीय बाजूने, यामध्ये पूर्वेकडील 3, 4 किंवा 33 कॉर्प्सचे कॉर्प्स कमांडर्स आणि मध्य क्षेत्रातील उत्तर भारत क्षेत्र कमांडर यांचा समावेश असू शकतो.

3. नवीन सीमा व्यवस्थापन प्रोटोकॉल

WMCC (वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन) अंतर्गत एक कार्यगट सीमा व्यवस्थापनासाठी नवीन प्रोटोकॉल तयार करण्यावर काम करेल.

4. सीमा व्यापार पुन्हा सुरू करणे

सीमेवरील व्यापार नियुक्त केलेल्या ठिकाणांवरून पुन्हा सुरू होणार आहे.

5. कैलास मानसरोवर यात्रा

कैलास मानसरोवर यात्रेसाठी परवानगी असलेल्या भारतीय यात्रेकरूंची संख्या 2026 पासून वाढेल.

6. सीमापार नदी सहकार्य

सीमापार नद्यांवरील भारत-चीन तज्ज्ञ पातळीच्या यंत्रणेअंतर्गत दोन्ही बाजूंनी सहकार्याची पुष्टी केली. चीनने मानवतावादी आधारावर आपत्कालीन परिस्थितीत जलविज्ञानविषयक डेटा सामायिक करण्यास सहमती दर्शविली.

7. ब्रह्मपुत्रेबाबतची चिंता

यारलुंग त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) नदीच्या खालच्या भागात चीनने बांधलेल्या महाकाय धरणावर भारताने तीव्र आक्षेप घेतला, ज्यामुळे खालच्या बाजूच्या राज्यांवर होणारे परिणाम लक्षात घेता जास्तीत जास्त पारदर्शकतेची गरज अधोरेखित झाली.

8. तैवान मुद्दा

चीनने तैवानबद्दल चिंता व्यक्त केली. भारताने आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही, आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक संबंधांवर केंद्रित असलेले तैवानशी असलेले संबंध कायम राहतील हे स्पष्ट केले, जसे बीजिंग समान संबंध राखतो.

एनएसए डोवाल यांच्यासोबत असणाऱ्या विशेष प्रतिनिधींच्या 24 व्या फेरीच्या चर्चेनंतर, वांग यी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि या महिन्याच्या अखेरीस तियानजिन येथे होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा वैयक्तिक संदेश आणि निमंत्रण सुपूर्द केले. मोदींनी ते स्वीकारले आहे‌. त्यामुळे शिखर परिषदेच्या निमित्ताने आता शी यांच्याशी द्विपक्षीय बैठक अपेक्षित आहे. 2020 मधील गलवान संघर्षानंतरची अशी ही पहिलीच भेट असेल.

भारतातील चीनचे राजदूत झू फेहोंग यांनी ‘एक्स’ वर लिहिले: “या वर्षाच्या सुरुवातीपासून, द्विपक्षीय संबंध विकासाच्या स्थिर मार्गावर परतले आहेत आणि सीमा परिस्थिती स्थिर असून सुधारत आहे. दोन्ही बाजूंनी संवादाद्वारे परस्पर विश्वास वाढवावा, देवाणघेवाण आणि सहकार्य वाढवावे आणि सीमा व्यवस्थापन, सीमा वाटाघाटी तसेण सीमापार देवाणघेवाण यासारख्या मुद्द्यांवर एकमत होण्यासाठी काम करावे. दोन्ही बाजूंनी विशिष्ट मुद्द्यांना योग्यरित्या संबोधित करावे, अधिक सकारात्मक प्रगती साधावी आणि द्विपक्षीय संबंधांच्या सुधारणा आणि विकासासाठी सतत सक्षम परिस्थिती निर्माण करावी.”

भविष्यातील दृष्टिकोन आणि आव्हाने

संबंध सामान्य व्हावेत या उद्देशाने एक पाऊल म्हणून या चर्चेचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले असले तरी, काही निरीक्षकांनी असे नमूद केले की वांग यी यांचा दिल्लीहून थेट इस्लामाबादला जाण्याचा निर्णय “वाईट दृष्टिकोन निर्माण करतो”, ज्यामुळे भारतासोबतचे संबंध स्थिर करण्याबाबत चीनच्या गांभीर्यावर शंका निर्माण होते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleGovt clears Rs 62,000 crore Order for 97 LCA Mark 1A Jets from HAL
Next articleHAL कडून 97 LCA Mark 1A विमानांच्या खरेदीला सरकारकडून मंजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here