डेफएक्स्पो 2022 : डीआरडीओचे स्वदेशी कौशल्य आणि सामर्थ्य हेच आकर्षण!

0

गुजरातच्या गांधीनगर येथे 18 ते 22 ऑक्‍टोबर या कालावधीत डेफएक्स्पो 2022चे आयोजन करण्यात आले आहे. या डेफएक्स्पो 2022मध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) 430हून अधिक उत्पादने प्रदर्शित केली असून, त्यात स्ट्रॅटेजिक आणि सामरिक शस्त्रे तसेच संरक्षण उपकरणे यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. डेफएक्स्पो 2022मध्ये हा आशियातील प्रमुख संरक्षण कार्यक्रम असून, यंदा त्याचे हे 12 वे वर्ष आहे.

या वर्षीच्या डीआरडीओच्या सहभागाची मध्यवर्ती कल्पना 3D (डीआरडीओ, डिझाईन आणि विकसित) इकोस्फीअरवर आधारित आहे, जी त्यांच्या उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील परस्पर मजबूत संबंधांवर प्रकाश टाकते. आपल्या प्रयोगशाळांनी केलेली तांत्रिक प्रगती आणि अलीकडच्या वर्षांत विविध उद्योगांसोबतची त्यांची भागीदारीदेखील डीआरडीओने प्रदर्शित करत आहे. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना देणारी देणारी प्रगत आणि अत्याधुनिक संरक्षण उत्पादने तसेच उच्च पातळीच्या तंत्रज्ञानामधील स्वदेशीपणाचे हे सादरीकरण असेल, असे निवेदनात म्हटले आहे.

मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार “डेफएक्स्पो 2022ची संकल्पना “अभिमानाचा मार्ग” यासोबतच “भारताची 75 वर्षे” आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मध्यवर्ती कल्पनेवर प्रकाश टाकणारी आहे. यामुळे उद्योगजगत आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यात सहभागी होण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.” यामुळे ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ ही कल्पना पुढे घेऊन जाण्याचे उद्दीष्ट आहे. या प्रदर्शनात जमीन, आकाश, समुद्र तसेच होमलॅंड सिक्युरिटी सिस्टीम आणि तंत्रज्ञानातील विविध प्रकारची स्वदेशी डिझाइन्स, विकसित, प्रोटोटाइप आणि उत्पादने मांडण्यात येत आहेत.

या प्रदर्शनात, डीआरडीओ बॉर्डर सर्व्हिलन्स सिस्टीम (BOSS), लेझर फेंस सिस्टीम (LFS), ब्रह्मोस एअर व्हर्जन क्षेपणास्त्र, प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGS), व्हील आर्मर्ड प्लॅटफॉर्म (WhAP), प्रहार क्षेपणास्त्र यासह रुद्रम III क्षेपणास्त्र, क्विक रिअ‍ॅक्शन सरफेस टू एअर मिसाईल (QRSAM) आणि मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइल (MRSAM) अशी अनेक उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत.

यंदा जमीन, पाणी आणि हवाई-आधारित प्रणालींसाठी विकसित केलेल्या अनेक तंत्रज्ञानाचा सिनेमॅटिक अनुभव घेण्यासाठी एक बंद खोलीत तशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथमच, प्रगत लढाऊ विमान (AMCA) सिम्युलेटर देखील ऑग्युमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीसह जल, जमीन आणि हवाई उत्पादने सिम्युलेटरसह अनुभवासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. शस्त्रास्त्रांच्या डिझाइन्सच्या गुंतागुंतीची माहिती मिळवण्यासाठी हॉलमध्ये 30हून अधिक संरक्षण उत्पादनांचा 3D अनुभव देणारा होलोग्राफिक डेक तयार आहे.

डीआरडीओकडून ज्या 5 उपकरणांचे लाइव्ह डेमो प्रदर्शित केले जात आहेत, ती आहेत – पोर्टेबल डायव्हर डिटेक्शन सोनार (PDDS), इलेक्ट्रो-ऑप्टिक सिस्टम (EOS), इमेजिंग सोनार ‘CHITR’, ऑटोनॉमस सर्व्ह व्हेइकल इनलॅण्ड, ऑटोनॉमस सर्व्ह व्हेइकल – कोस्टल आणि वेपन माउंटेड सरफेस व्हेइकल. याशिवाय डीआरडीओ उपकरणांचे सहा स्टॅटिक डिस्प्ले सादर करत आहे. ज्यामध्ये AIR इंडिपेंडेंट प्रोपल्शन सिस्टीम, व्हर्च्युअल रिअॅलिटीवर आधारित काऊंटरमेजर डिप्लॉयमेंट सिम्युलेटर, TAL टॉरपीडो, पोर्टेबल डायव्हर डिटेक्शन सोनार, वेट एंड युनिट, काऊंटर ड्रोन सिस्टम फॉर IN – D4 रडार, सॉफ्ट किल सिस्टम आणि हार्ड किल सिस्टम आणि पॅसिव्ह IRSS डिव्हाइस आहेत.

याव्यतिरिक्त, हेलिपॅड एक्झिबिशन सेंटरमधील इंडिया पॅव्हेलियन येथे डीआरडीओ सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राबरोबरच आपली एकत्रित ताकद प्रदर्शित करत आहे. डीआरडीओने आपली 22 उत्पादने स्टॅटिक डिस्प्लेवर ठेवली आहेत. ही उच्च-मूल्यांवर आधारित उत्पादने वास्तविक उत्पादनांच्या स्वरूपात प्रदर्शित केली आहेत. त्यामध्ये VIBHAV- अँटी टँक पॉइंट अटॅक मुनिशन, विशाल- अँटी टँक बार माइन, प्रचंड – अँटी टँक, 9 x 19 मिमी मशीन पिस्तूल- ASMI, माईन फील्ड मार्किंग इक्विपमेंट Mk II, लाइट टँक, दक्ष डिफ्यूझर, MBT अर्जुन एमके- 1A, लाइट मशीन गन, प्रले, क्यूआरएसएएम, कार्बाइन- 5.56x 45 मिमी, एआयपी सिस्टम- एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन, TAPAS, ASTRA Mk-I, LCA Mk2 यांचा समावेश आहे.

(अनुवाद : आराधना जोशी)


Spread the love
Previous articleभारतीय ड्रोन स्टार्टअप गरुड एरोस्पेसची लॉकहीड मार्टिनसोबत भागीदारी
Next articleDEFEXPO 2022: BAE Systems Signs Agreement With PTC Industries to Produce 155mm Ultra-Lightweight Howitzer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here