दक्षिण गाझामध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात हमासचा एक वरिष्ठ नेता ठार झाला, ज्यामुळे या प्रदेशातील तणाव आता आणखीनच वाढला आहे.
हमासच्या राजकीय ब्युरोचे वरिष्ठ सदस्य- सलाह अल-बर्दावील, हे रविवारी त्यांच्या पत्नीसह गाझा शहरातील खान युनिसमधील त्यांच्या छावणीत प्रार्थना करत असताना मारले गेले, असे पॅलेस्टिनियन गटाने म्हटले आहे. या गटाने इस्रायलवर त्यांची हत्या केला आरोप केला आहे, असे वृत्त अल जझीराने रिपोर्ट केले आहे.
“त्यांचे बलिदान, त्यांची पत्नी आणि शहीदांचे रक्त, स्वातंत्र्य आणि मुक्ततेच्या लढ्याला प्रेरणा देत राहील. शत्रू आमच्या निर्धाराला आणि इच्छाशक्तीला तोडू शकणार नाही,” असे संबंधित गटाने एका निवेदनात म्हटले आहे.
मात्र इस्रायलने अद्याप बर्दावील यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
इस्रायलने गाझावर सुरू केलेल्या आक्रमणात हमासचे नेते अनेक ठार झाले.
रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यांत हमास नेत्यांसह अन्य 22 लोकही मारले गेले.
अल जझीराचे रिपोर्टर तारिक अबू अझोम यांनी सांगितले की, “इस्रायलने गेल्या काही तासांत गाझावर ‘तीव्र आणि मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले’ केले आहेत.”
“इथली परिस्थिती अजूनही खूपच गंभीर आहे,” असेही ते म्हणाले.
ओसामा तबाश मरण पावले
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने शनिवारी सांगितले की, “हमासचे लष्करी गुप्तचर प्रमुख ओसामा तबाश, गाझा पट्टीवरील हवाई हल्ल्यात मरण पावले.”
आयडीएफने मंगळवारी आपल्या हवाई मोहिमेची पुन्हा सुरूवात केली आणि घातक हल्ले केले, ज्यामुळे 19 जानेवारीपासून कायम असलेल्या शांततेला तडा गेला.
तबाश ठार झाल्याचे जाहीर करत, आयडीएफने एक्सवर लिहिले की, “दक्षिण गाझामधील हमासच्या लष्करी गुप्तचर प्रमुख आणि हमासच्या देखरेख आणि लक्ष्यीकरण युनिटचे प्रमुख, ओसामा तबाश मारले गेले.”
आयडीएफने सांगितले की, “तबाशने हमासमध्ये विविध उच्च पदे भूषवली होती, ज्यात खान युनिस ब्रिगेडमध्ये बटालियन कमांडरपद देखील समाविष्ट आहे.”
“तबाश जमिनीवर हमासची लढाऊ रणनीती तयार करण्यासाठी देखील जबाबदार होता, ज्यामध्ये दक्षिण गाझामधील हमासच्या लष्करी शाखेच्या गुप्तचर यंत्रणेचे समन्वय साधणे आणि त्या भागात त्यांच्या कारवायांचे नेतृत्व करणे समाविष्ट होते,” आयडीएफने म्हटले आहे.
रशीद जहजौह यांचाही खात्मा
आयडीएफने हमास जनरल सिक्युरिटी सर्व्हिसचे प्रमुख- रशीद जहजौह यांनाही, अलिकडेच ठार मारण्यात आल्याची पुष्टी केली.
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते अविकाय अद्राई यांनी एक्सवर लिहीले की, “अलिकडच्या काळात, आयडीएफ आणि शिन बेट यांनी हमास जनरल सिक्युरिटी सर्व्हिसचे प्रमुख दहशतवादी, रशीद जहजौह यांना एका हल्ल्यात ठार केले. रशीद ज्यांनी जुलै 2024 मध्ये, त्यांचे पूर्ववर्ती सामी ओदेह यांना संपवल्यानंतर त्यांची भूमिका स्विकारली होती, तसेच गाझा पट्टीतील हमास सरकारचे प्रमुख रावही मुश्ताहा यांनाही ठार मारण्यात आले.”
त्यांनी सांगितले की, सुरक्षा यंत्रणेतील खान युनिस क्षेत्राचा कमांडर आयमान अस्लिह नावाचा एक ‘दहशतवादी’ देखील संपवण्यात आला.
‘जहजौह यांच्या नेतृत्वाखालील जनरल सिक्युरिटी सर्व्हिस, ही हमासमधील एक गुप्त आणि केंद्रीय यंत्रणा मानली जाते,’ असेही त्यांनी सांगितले.
“हमास ज्यांना एजंट मानतो त्यांचा पर्दाफाश करणे, गाझा पट्टीच्या आत आणि बाहेर चळवळीचे नेते आणि हितसंबंध सुरक्षित करणे आणि हमासच्या दहशतवादी राजवटीच्या विरोधकांना दडपण्यासाठी कारवाई करणे याला ते जबाबदार आहेत,” असे ते म्हणाले.
इस्लामिक जिहादच्या इस्माईल अब्देल-अलचा अंत
अविचाय अद्राई यांनी सांगितले की, ‘इस्लामिक जिहादचा सदस्य असलेल्या इस्माईल अब्देल-अल, हा आयडीएफ आणि शिन बेट यांनी केलेल्या छापेमारीदरम्यान मारला गेला.’
“तो इस्लामिक जिहादच्या शस्त्रास्त्र तस्करी नेटवर्कचा एक प्रमुख सदस्य मानला जात होता. त्याच्या पदावर, तो इस्लामिक जिहादच्या बहुतेक शस्त्रास्त्र तस्करी कारवायांसाठी जबाबदार होता,” अशी माहिती त्यांनी दिली.
अदारी म्हणाले की, “आयडीएफ आणि शिन बेट हमासविरुद्ध आणि इस्रायलच्या नागरिकांना असलेला कोणताही धोका दूर करण्यासाठी काम करत राहतील.”
अहवालांनुसार, मंगळवारी इस्रायलने गाझावर पुन्हा हल्ला सुरू केल्यापासून ५०४ लोक मारले गेले आहेत.
7 ऑक्टोबर 2023 रोजी, इस्रायलमध्ये हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवादी हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून युद्ध सुरू झाले, ज्यामध्ये सुमारे 1,250 लोक मारले गेले आणि 250 हून अधिक लोकांना ओलिस ठेवण्यात आले.
तर, युद्धबंदीच्या शेवटच्या टप्प्यात पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात अनेक ओलिसांची सुटका देखील करण्यात आली.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)