राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हॅरिस यांनी घेतली आघाडी

0
हॅरिस

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुनर्निवडणुकीतून माघार घेऊन आपल्या जागी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची निवड केल्यानंतर हॅरिस रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दोन टक्क्यांची आघाडी घेतली आहे. रॉयटर्स/इप्सोसच्या एका सर्वेक्षणानुसार असा कल सध्यातरी आढळून आला आहे.

सोमवारी आणि मंगळवारी यासंदर्भातील मतदान घेण्यात आले. त्याआधी मागील आठवड्यात रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये गुरुवारी ट्रम्प यांनी त्यांच्या पक्षाचे नामांकन औपचारिकपणे स्वीकारले. तर दुसरीकडे रविवारी बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडत कमला हॅरिस यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
हॅरिस, यांच्या निवडणूक मोहिमेत त्यांनी डेमोक्रॅटिक उमेदवारी मिळवली आहे असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांना 42 टक्के तर हॅरिस यांना 44 टक्के पसंती मिळाली आहे.

15-16 जुलै रोजी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हॅरिस आणि ट्रम्प यांना प्रत्येकी 44 टक्के मते मिळाली होती तर 1-2 जुलैच्या मतदानात ट्रम्प एका टक्क्याने आघाडीवर होते.
देशव्यापी सर्वेक्षण राजकीय उमेदवारांना अमेरिकेच्या पाठिंब्याचे महत्त्वपूर्ण संकेत देत असताना, मोजकी स्पर्धात्मक राज्ये सामान्यतः यूएस इलेक्टोरल कॉलेजमधील राज्ये हे संतुलन कायम झुकवतात. त्यामुळे शेवटी राष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण जिंकते हे त्यावर ठरत असते.

सर्वात अलीकडील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 56 टक्के नोंदणीकृत मतदारांनी 59 वर्षीय हॅरिस या “मानसिकदृष्ट्या निरोगी आणि आव्हानांचा सामना करण्यास  सक्षम” असल्याच्या विधानाशी सहमती दर्शविली आहे, तर 49 टक्के मतदारांनी 78 वर्षीय ट्रम्प यांच्याबद्दल असेच म्हटले आहे.

केवळ 22 टक्के मतदारांनी बायडेन हे योग्य उमेदवार असल्याचे मूल्यांकन केले आहे.

ट्रम्प यांच्याशी झालेल्या डिबेटनंतर 81 वर्षीय बायडेन यांनी त्यांचा पुनर्निवडणुकीचा प्रयत्न संपवत असल्याचे जाहीर केले. या डिबेटमध्ये बोलताना बायडेन अनेकदा अडखळले. याशिवाय खोट्या गोष्टीं सांगत असलेल्या ट्रम्प यांच्या हल्ल्यांना आक्रमकपणे आव्हान देण्यात ते अपयशी ठरले होते.

सर्वेक्षणातील मतदारांना एक काल्पनिक मतपत्रिका दाखवण्यात आली ज्यात स्वतंत्र अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्याही नावाचा समावेश होता. यावेळी हॅरिस यांना 42 टक्के तर ट्रम्प यांना 38 टक्के अशी आघाडी मिळाली होती. मतदानात 8 टक्के मतदारांनी केनेडी यांच्या नावाला पसंती दिली असून, 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी अनेक राज्यांमध्ये ते मतपत्रिकेसाठी अद्यापही पात्र ठरलेले नाहीत.

ऑनलाईन घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अमेरिकेतील 1 हजार 241 प्रौढांनी भाग घेतला होता, ज्यात 1 हजार 018 नोंदणीकृत मतदारांचा समावेश होता.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleHarris Leads Trump 44% To 42% In Presidential Race, Poll Finds
Next articleGSL-Made Advanced Warship ‘Triput’ For Indian Navy Launched

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here