हाँगकाँगने Black Rain चा इशारा देत, सार्वजनिक सेवा केल्या बंद

0

हाँगकाँगच्या हवामान विभागाने मंगळवारी, सर्वात उच्चस्तरीय अशा Black Rain चा इशारा दिला आहे. सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आशियातील आर्थिक केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. खबरदारी म्हणून स्थानिक रुग्णालये, शाळा, न्यायालये आणि नोंदणी कार्यालये इत्यादी सार्वजनिक सेवा बंद करण्यात आली आहेत.

गेल्या आठवड्याच्या शेवटी, दक्षिण चीनमध्ये अचानक आलेल्या प्राणघातक पुरामुळे ग्वांगडोंग प्रांतात, 5 लोकांचा मृत्यू झाला, ज्यानंतर 1,300 हून अधिक बचाव कर्मचाऱ्यांसह शोध मोहिम राबवली गेली.

पूर आणि वाहतूक कोंडी

“सततचा पाऊस रस्त्यांवर गंभीर पूरस्थिती आणि वाहतूक कोंडी निर्माण करू शकतो. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा,” असा इशारा Hong Kong Observatory ने त्यांच्या वेबसाइटवरील बुलेटिनमध्ये दिला आहे.

पहाटे 6.00 (2200 GMT) ते 6:59 दरम्यान, शहरावर 9,837 विजांचे झटके नोंदवले गेले.

चीनच्या हवामान विभागानुसार, दर तासाला हाँगकाँग आणि जवळच्या ग्वांगझू शहरात, 60 ते 90 मिलीमीटर (2.4-3.5 inches) पावसाची नोंद झाली आहे. सामान्यतः हाँगकाँगमध्ये दरवर्षी सरासरी 2,220mm पावसाची नोंद होते, ज्यातील निम्म्याहून अधिक पाऊस जून ते ऑगस्ट या काळात पडतो.

OPD सेवा बंद

हाँगकाँग Stock Exchange चे कामकाज मात्र यादरम्यान सुरुच राहिले आहे, कारण गेल्यावर्षाच्या अखेरीस त्यांनी हवामान कसेही असले तरी, व्यापार सुरू ठेवण्याचे धोरणात्मक बदल स्वीकारले होते.

हाँगकाँगच्या हॉस्पिटल प्राधिकरणाने जाहीर केले आहे की, “अपघात आणि आपत्कालीन वॉर्ड्स सुरू राहतील, पण सर्वसामान्य बाह्यरुग्ण (OPD) सेवा तसेच वृद्ध आणि मानसिक आजारांवरील हॉस्पिटल्स बंद राहतील.”

न्यायपालिकेने म्हटले आहे की, “Black Rain चा इशारा रद्द झाल्यानंतर दोन तासांच्या आत शक्य तितक्या लवकर न्यायालये, न्यायाधिकरणे आणि नोंदणी कार्यालये सुरू करण्यात येतील.”

पोस्ट ऑफिसने जाहीर केले आहे की, त्याची सर्व कार्यालये आणि वितरण सेवा वादळाचा इशारा शमेपर्यंत स्थगित राहतील.

शहराच्या विमानतळावर मात्र कोणत्याही प्रकारचा अडथळा नोंदवलेला नाही.

हाँगकाँग मधील प्रसिद्ध Disneyland देखील मर्यादित सेवांसह सुरू आहे.

कृषी, मत्स्यव्यवसाय आणि संवर्धन विभागाने भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुराच्या धोक्यामुळे जनतेला देशातील उद्यानांना भेट देणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleहिंदू धर्मावर ताशेरे ओढल्यानंतर आसिम मुनीरकडून आता ‘प्रॉक्सी वॉर’ची ओरड
Next articleशुल्क कपातीचा आदेश मिळवण्यासाठी, जपानचे समन्वयक अमेरिकेला रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here