हाँगकाँगने 2025 मधील दुसऱ्या Black Rainstorm बाबत इशारा जारी केला

0

शनिवारी सकाळी, हाँगकाँगने 2025 मधील दुसऱ्या Black Rainstorm बाबत इशारा जारी केला. हाँगकाँग वेधशाळेने ब्लॅक सिग्नल कमी करून तो आधी रेड सिग्नलमध्ये आणि नंतर मध्यरात्री 12.30 पर्यंत अँबरमध्ये बदलला, हे सर्व एका तासाच्या आत घडले. त्यावेळी शहरातील काही भाग अचानक उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करत होते कारण तेथील हवामान अजूनही अस्थिर होते. याआधी मंगळवारी हाँगकाँगने या वादळाबाबत पहिला इशारा दिला होता.

“सक्रिय नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे, वादळी पावसाच्या जोरदार सरी पर्ल रिव्हर डेल्टा परिसरावर परिणाम करत आहेत. कृपया सर्वांनी काळजी घ्यावी. प्रवास करणे अनिवार्य असल्यास हवामान व रस्त्याच्या स्थितीचा विचार करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे हाँगकाँग वेधशाळेने अँबर सिग्नल जारी करतेवेळी SCMP च्या अहवालानुसार सांगितले.

शहरभर पूरस्थितीची नोंद

ड्रेनेज सर्व्हिसेस विभागाने, 11.15 वाजेपर्यंत पूर येण्यासंबंधीच्या 4 घटनांची पुष्टी केली. ह्या घटना नॉर्थ लांताउ हायवे, तुन मुन रोड, साई कुंगमधील ताय मोंग साय रोड आणि नॉर्थवेस्ट चिंग यी इंटरचेंज येथे घडल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लांताउ आणि साई कुंगमधील पूरस्थिती हाताळण्यात आली आहे, परंतु उर्वरित दोन ठिकाणी काम सुरु आहे.

ऑनलाइन शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये, ताय मोंग साय रोडवर गंभीर पूरस्थिती दिसून आली, जिथे चिखलयुक्त पाणी संपूर्ण परिसरात पसरले होते आणि वाहनं खोल भागांपासून दूर राहून एका बाजूने जात होती.

मंगळवारी झालेल्या जोरदार पावसात पूर आलेल्या ठिकाणी एक precaution म्हणून, अधिकाऱ्यांनी पूर्वीच चाय वान रोड राऊंडअबाऊट येथे पाणी शोषण करणारे पंप आणि कर्मचारी तैनात केले होते.

शाळा आणि सेवा संचालनात बदल

अस्थिर हवामानाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाने जाहीर केले की- दुपारच्या सर्व शाळा वर्ग रद्द करण्यात येतील. आधीपासून सुरु असलेल्या शाळांनी मात्र सामान्य वेळेपर्यंत सुरु राहावे आणि केवळ सुरक्षित असल्यासच विद्यार्थ्यांना सोडावे.

सामाजिक कल्याण विभागाने पुष्टी केली की, त्यांच्या केअर सेंटर्स आणि सेवा युनिट्स नेहमीप्रमाणे खुले राहतील. गृह व्यवहार विभागाने सांगितले की, पावसामुळे प्रभावित झालेल्यांसाठी तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था केली जाईल.

आराम व सांस्कृतिक सेवा विभागाने सांगितले की, त्यांच्या अखत्यारीतील सर्व राजपत्रित समुद्रकिनारे तात्पुरते बंद ठेवले जातील. “खराब हवामानात नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे आणि कोणत्याही वॉटर स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटीज टाळाव्यात जेणेकरून स्वतःला आणि बचाव कर्मचाऱ्यांना धोका होणार नाही,” असे प्रवक्त्याने सांगितले. “सूचना न पाळणाऱ्यांना $2,000 हाँगकाँग डॉलर्सचा दंड किंवा 14 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते,” असेही त्यांनी बजावले.

प्रवास व पावसाचे अपडेट्स

MTR कॉर्पोरेशनने सांगितले की, पूर टाळण्यासाठी त्यांनी पूर्वीच चोई हंग स्थानकावरील एग्झिट A1, वोंग ताय सीनमधील एग्झिट B3, आणि शाम शुई पोमधील एग्झिट A2 बंद केले होते. नंतरच्या अपडेटमध्ये त्यांनी सर्व एग्झिट्स आता खुले झाले असल्याचे सांगितले.

कृषी, मत्स्यव्यवसाय आणि संवर्धन विभागाने नागरिकांना भूस्खलन व अचानक पूर याचा धोका लक्षात घेता कंट्री पार्कमध्ये जाणे टाळण्याचे आवाहन केले.

वेधशाळेच्या मते, शनिवारी सकाळी हाँगकाँग आयलंड, कोव्लून ईस्ट, साई कुंग आणि लम्मा आयलंडमध्ये 30mm पेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आला. “ज्यांना याचा फटका बसू शकतो अशा रहिवाशांनी संभाव्य पूरहानी टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,” असे त्यांनी सांगितले.

आगामी काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून, जोरदार पावसाच्या सरी आणि वादळी हवामानाचा अंदाज आहे. वेधशाळेने सांगितले की, हवामानाची परिस्थिती पुढील आठवड्याच्या मध्य किंवा नंतरच्या काळात हळूहळू सुधारेल.

आठवड्याच्या सुरुवातीला, मुख्य सचिव एरिक चॅन क्वोक-की यांनी नागरिकांकडून आलेल्या टीकेनंतर, शहराच्या अतिवृष्टीसंदर्भातील प्रतिसादाचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की हॉंगकॉंगकडे अशा घटना हाताळण्यासाठी “समग्र आणि प्रभावी” यंत्रणा आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleअमेरिका-चीन संबंधांबाबत बेसेंट आशावादी, ‘करार होण्याची शक्यता’ वर्तवली
Next articlePilgrimage & Power: Can India Match China at the Roof of the World?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here