Pakistan Train Hijack Update: ट्रेन क्वेटा येथे पोहोचल्यावर बंधकांना दिलासा

0
क्वेटा
12 मार्च 2025 रोजी, पाकिस्तानातील क्वेटा येथील रेल्वे स्थानकावर, फुटीरतावादी दहशतवाद्यांनी हायजॅक केलेल्या प्रवासी ट्रेन बोलानला पाठवली जाणार आहे. ट्रेनजवळ सुरक्षा दलाचा एक सदस्य पहारा देताना. फोटो सौजन्य: REUTERS/Stringer (फाइल फोटो)

फुटीरतावादी दहशतवाद्यांनी नैऋत्य पाकिस्तानातून हायजॅक केलेल्या ट्रेनमधून, सुटका करण्यात आलेले डझनभर लोक गुरुवारी क्वेटा येथे पोहोचले. सुरक्षा दलांनी सर्व 33 हल्लेखोरांना ठार मारल्यानंतर काही तासांतच या भागात दिवसभर सुरू असलेल्या तणावपूर्ण आणि हिंसक संघर्षाचा यशस्वीपणे अंत झाला.

दहशतवाद्यांनी रेल्वे मार्ग उखडला आणि जाफर एक्सप्रेसवर गोळीबार करत ट्रेनला हायजॅक केले. ही ट्रेन बालोचिस्तान प्रांताच्या राजधानीतून खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावरकडे जात होते, आणि अनेक प्रवाशांना बंधक बनवले.

सरकारशी लढणाऱ्या या प्रदेशातील सर्वात मोठ्या सशस्त्र वांशिक गटांपैकी एक असलेल्या ‘बलुच लिबरेशन आर्मी (BAL)’ या सशस्त्र बंडखोर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली, ज्यामध्ये 21 जणांना ओलीस ठेवण्यात आले तर 4 सुरक्षा जवान ठार झाले.

बीएलएच्या रणनीतींमध्ये सामान्य नागरिकांवरील अनेक हल्ले समाविष्ट आहेत, जसे की 2024 मध्ये क्वेटा रेल्वे स्थानकावर झालेला आत्मघाती बॉम्बस्फोट, ज्यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला होता आणि 62 जण जखमी झाले होते.

“दहशतवाद्यांनी अखेर ट्रेनच्या खिडक्या फोडून ट्रेनमध्ये प्रवेश केला, पण त्यांना चुकून वाटले की आम्ही मेलो आहोत आणि ते मागे हटले,” असे ट्रेन चालक अमजद याने सांगितले. जेव्हा अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला, तेव्हा स्वत:चा जीव वाचवण्यासाठी त्याने इंजिनच्या वरच्या भागात उडी मारली.

सुरक्षा दल पोहचेपर्यंत सुमारे 27 तास तिथेच लपून राहिल्याचे, अमजद याने सांगितले.

रॉयटर्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, क्वेटा येथील रेल्वे स्टेशनवर सुटका केलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचार देण्यात येत असल्याचे दिसून आले, जिथे त्यांना सुरक्षा दलांनी सुरक्षितपणे नेले होते.

“जर आज सैन्य आले नसते तर, हल्लेखोरांनी सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सर्वांना फाशी दिली असती,” असे सुखरुप सुटलेल्या एका प्रवाशाने ब्रॉडकास्टर जिओ न्यूजला सांगितले.

जर अधिकाऱ्यांनी बलुच राजकीय कैदी, कार्यकर्ते आणि बेपत्ता लोकांना लष्कराने अपहरण केले असल्याचे सांगून, त्यांची सुटका करण्यासाठी 48 तासांची मुदत चुकवली असती, तर BLA ने ओलिसांना मारण्याची धमकी दिली होती.

या गटाचे म्हणणे आहे की, सरकार या प्रदेशाला त्याच्या खनिज संसाधनांमधून मिळणाऱ्या फायद्यांचा योग्य वाटा नाकारत आहे.

पंतप्रधान शेहबाज शरीफ गुरुवारी या प्रदेशाला भेट देतील, असे माध्यमांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी X वरील एका पोस्टमध्ये हल्ल्याचा निषेध करत म्हटले होते की, “अशा भ्याड कृत्यांमुळे पाकिस्तानचा शांततेचा संकल्प डळमळीत होणार नाही.”

(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleअमेरिकेसोबत युक्रेन चर्चेसाठी, रशियाने केल्या ‘या’ प्रमुख मागण्या…
Next articleभारत-मॉरिशस संरक्षण आणि धोरणात्मक संबंध मजबूत होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here