भारत – चीनच्या विशेष प्रतिनिधी बैठकीत व्यापार, मानसरोवर यात्रेवर चर्चा

0
भारत - चीनच्या
विशेष प्रतिनिधी यी आणि अजित डोवाल  सखोल चर्चेनंतर हस्तांदोलन करताना

भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींची (एसआर) सुमारे पाच वर्षांच्या कालावधीनंतर बीजिंगमध्ये काल भेट झाली. द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी अनेक मुद्द्यांवर यावेळी सहमती दर्शवली गेली.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एसआर म्हणजेच भारताचे एनएसए अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री यी यांनी “सर्वांगीण द्विपक्षीय संबंधांचा राजकीय दृष्टीकोन राखण्याच्या आणि सीमा प्रश्नावर न्याय्य, वाजवी आणि परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्याच्या महत्त्वावर भर दिला.”

सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित करत, एसआरने कैलाश मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, सीमापार नद्या आणि सीमा व्यापारावरील माहितीची देवाणघेवाण यासह सीमापार सहकार्यासाठी सकारात्मक निर्देश दिले.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन अधिक तपशीलवार होते, ज्यात असे म्हटले होते की दोन्ही बाजू व्यवस्थापन आणि नियंत्रण यंत्रणा सुधारतील, विश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजना वाढवतील आणि सीमापार देवाणघेवाण तसेच सहकार्य बळकट करतील.

यासाठी, विशेष प्रतिनिधी यंत्रणा बळकट केली जाईल, लष्करी आणि राजनैतिक वाटाघाटी आणि WMCC (Working Mechanism For Consultation & Coordination on Bordre Affairs) यांच्यात अधिक समन्वय साधून पाठपुरावा सुनिश्चित करण्याचे काम केले जाईल.

कैलाश-मानसरोवर यात्रा आणि ब्रह्मपुत्रेच्या संदर्भातील माहितीची देवाणघेवाण याव्यतिरिक्त, सिक्कीममधील नाथू-ला सीमेवरून व्यापार सुलभता असेल, असे चीनने म्हटले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की एनएसए डोवाल यांनी धोरणात्मक संवाद मजबूत करण्याची आणि द्विपक्षीय संबंधांना नवीन चालना देण्याची तयारी दर्शविली आहे.

एसआर यंत्रणेची पुढील बैठक भारतात 2025 मध्ये होणार आहे. ती कधी होईल हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. अर्थात यामुळे दोन्ही देशांना हे द्विपक्षीय संबंध कसे पुढे जात आहेत आणि कोणत्या आव्हानांचा सामना करणे आवश्यक आहे हे पाहण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

दोन्ही देशांनी व्यापाराचे महत्त्व अधोरेखित केले असले तरी, चीनबरोबरची भारताची वाढती तूट, जी आता 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, ही एक मोठी चिंता आहे आणि बीजिंगने त्याचे निवारण करण्यासाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत.

चिंतेची बाब म्हणजे चीन व्यापाराकडे भारताविरुद्ध वापरायचे शस्त्र म्हणून पाहतो, जे बहुधा जगाच्या इतर भागांमध्येही वापरले जाते.

सूर्या गंगाधरन

 


Spread the love
Previous articleमुंबईतील बोट दुर्घटनेत 13 मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर
Next articleVietnam Holds International Arms Fair In Hanoi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here