भारत-फ्रान्स संबंधांचा आढावा; पुढील वर्षीच्या AI Summit साठी अजेंडा निश्चित

0

फ्रान्समधील एक उच्च-स्तरीय पथक, पुढील वर्षी होणाऱ्या भारत-फ्रान्स ‘इनोव्हेशन इयर’ (नवकल्पना वर्ष) वरील चर्चा पुढे नेण्यासाठी सध्या दिल्लीमध्ये आहे. या चर्चेत सायबर सुरक्षा आणि ग्रीन टेक यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे, तसेच पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत होणाऱ्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेचा’ (AI Summit) अजेंडा देखील निश्चित केला जात आहे.

या शिखर परिषदेला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांनी ठरवलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी ते प्रयत्न करतील, ज्यामध्ये: शाश्वत विकासासाठी 2030 चा अजेंडा पूर्ण करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षित आणि नियमबद्ध AIच्या वापराला प्रोत्साहन देणे, यावर भर दिला जाईल.

भारत जबाबदारीने वापरण्यायोग्य AI संदर्भात जागतिक चर्चा घडवू पाहतो आहे, तर फ्रान्स डिजिटल नियमावली आणि युरोपियन युनियनच्या तंत्रज्ञान धोरणातील आपल्या भूमिकेचा अनुभव घेऊन यात योगदान देत आहे.

या क्षेत्रातील त्यांचे सहकार्य जागतिक नियमांवर प्रभाव पाडण्याच्या त्यांच्या सामायिक महत्त्वाकांक्षेचे संकेत देते. विशेषतः डेटा सार्वभौमत्व, अल्गोरिदमची जबाबदारी आणि नैतिक AI यांसारख्या मुद्द्यांवर प्रमुख जागतिक शक्तींमध्ये अजूनही मतभेद आहेत.

दरम्यान, फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सरचिटणीस- ॲन-मेरी डेस्कोटेस यांच्या या भेटीदरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्यासोबत व्यापक संबंधांचा आढावा देखील घेतला गेला.

त्यांनी नागरी अणुऊर्जा प्रकल्पावरील भारत-फ्रान्स विशेष कार्य दलाच्या दुसऱ्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. यावेळी लहान मॉड्युलर रिअॅक्टर्स (SMRs) आणि प्रगत मॉड्युलर रिअॅक्टर्स (AMRs) यासारख्या पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित काम पुढे नेण्याच्या, दोन्ही देशांच्या तयारीचा पुनरुच्चार करण्यात आला. यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना मिळणार आहे.

या चर्चेत- ‘हॉरिझॉन 2047 रोडमॅप’ , इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजी आणि डिफेन्स इंडस्ट्रियल रोडमॅप यावरही विचारविनिमय झाला.

या महिन्याच्या सुरुवातीला, भारत आणि फ्रान्सने पॅरिसमध्ये दहशतवादविरोधी संयुक्त कार्यगटाची 17वी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी सायबर धोके, ऑनलाइन अतिरेकीकरण आणि अतिरेकी गटांकडून उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न वाढवण्यास सहमती दर्शविली.

राजकीय चर्चांमध्ये, डेस्कोटेस आणि मिसरी यांनी वेगाने बदलणाऱ्या जागतिक आव्हानांना दोन्ही देश कसे सामोरे जाऊ शकतात, यावर विचार केला गेला. तसेच युक्रेनमधील युद्ध, गाझामधील ढासळलेली मानवतावादी परिस्थिती, AI प्रेरित चुकीच्या माहितीचा प्रसार आणि दहशतवादी गटांकडून डिजिटल साधनांचा वापर यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता.

फ्रान्सने 2030 पर्यंत 30,000 भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये आणण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यावर डेस्कोटेस यांनी अलायन्स फ्रांसेझ दे दिल्ली आणि कॅम्पस फ्रान्स येथे थांबून विशेष भर दिला.

मूळ लेखिका- हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleMilitary Theaterisation in India: Is the Air Chief Right?
Next articleलष्कराच्या थिएटरायझेशनविषयी, हवाई दल प्रमुखांची चिंता योग्य आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here