मंदिराजवळ थाई–कंबोडियन सैन्यात पुन्हा चकमक, भारताने व्यक्त केली चिंता

0
थाई–कंबोडियन
10 डिसेंबर 2025 रोजी, कंबोडियातील ओड्डार मीन्चे प्रांतातील चोंग काल येथे, वादग्रस्त सीमावर्ती भागात थायलंड आणि कंबोडियामध्ये झालेल्या प्राणघातक संघर्षांदरम्यान, निर्वासित छावणीत स्थलांतरित झालेले लोक, रेड क्रॉसच्या मदत साहित्याच्या आडोशाला बसले आहेत. सौजन्य: रॉयटर्स/किम हाँग-जी

थायलंड आणि कंबोडियामधील सीमा तणाव या आठवड्यातही कायम असल्याचे पाहायला मिळाले. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रीह विहार या मंदिराजवळच्या काही भागांसह, सीमेवरील अनेक ठिकाणांवर थाई आणि कंबोडियन सैन्याकडून गोळीबार झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.

दोन्ही देशांनी, एकमेकांवर प्रादेशिक सीमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला असून, या भागातील मर्यादित प्रवेशामुळे याची स्वतंत्र पडताळणी करणे कठीण झाले आहे. दोन्ही देशांतील स्थानिक लष्करी सूत्रांनी याची पुष्टी केली की, थाई सैन्याने डांग्रेक पर्वतरांगेतील वादग्रस्त क्षेत्रांमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे कंबोडियन सैन्याने प्रीह विहार मंदिराभोवतीची त्यांची पकड अधिक मजबूत केली.

एका व्हिडिओमध्ये, कंबोडियाचे टेहळणी करणारे उपकरण घेऊन जाणारी एक क्रेन या ठिकाणाजवळ कोसळताना दिसत असून, यामध्ये पार्श्वभागात थाई सैनिकांचा आवाज ऐकू येत आहे, ज्यामुळे या उपकरणाला जाणूनबूजून लक्ष्य करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मंदिर परिसरातील कारवाईबद्दल दोन्ही देशांच्या सरकारांनी सविस्तर माहिती दिली नसली तरी, दोघांनीही सीमा क्षेत्रात लष्करी कारवाई सुरू असल्याची कबुली दिली आहे.

थाई अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला एका रिकाम्या पडलेल्या कसिनो अड्ड्याच्या जागेवर असलेल्या कंबोडियान लष्करी ठिकाणावर हवाई कारवाई करण्यात आली. कंबोडियन अधिकाऱ्यांनी दावा केला की, हे ठिकाण केवळ निरीक्षणासाठी वापरले जात होते, तसेच त्यांनी थायलंडवर परिस्थिती चिघळवल्याचा आरोप केला. याला प्रत्युत्तर म्हणून, कंबोडियाने थाई ठिकाणांवर रॉकेट डागली. यामध्ये किती प्रमाणात जीवितहानी झाली आहे, याची आकडेवारी अद्याप अस्पष्ट असली, तरी त्याचे मूल्यमापन सुरू असल्याचे दोन्ही देशांच्या सरकारांनी सांगितले आहे.

सीमाभागात सुरू असलेल्या लढायांमुळे, दोन्ही देशांतील गावांमधून नागरिक आपले घर सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या संघर्षामुळे, जे विस्थापन झाले होते, त्याचीच ही पुनरावृत्ती आहे. मानवतावादी संस्थांच्या अंदाजानुसार, अलीकडेच मोठ्या संख्येने लोक तात्पुरत्या छावण्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.

प्रीह विहार मंदिर परिसरात सुरू असलेल्या या लढाईबद्दल चिंता व्यक्त होत असताना, भारताने एक निवेदन जारी केले आहे, ज्यात परिसरातील संवर्धन सुविधांना संभाव्य नुकसान होण्याची शक्यता नोंदवली गेली. या स्थळी सांस्कृतिक जतन कार्यात सहभागी असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी, अशा नुकसानीला “दुर्दैवी” म्हटले आणि मंदिर हे “मानवतेचा सामायिक सांस्कृतिक वारसा” दर्शवते असा उल्लेख केला आगे.

नवी दिल्लीने, दोन्ही देशांच्या सरकारांना संयम राखण्याचे, शत्रुत्व थांबवण्याचे आणि संवाद पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. हे निवेदन, युनेस्को आणि अनेक आसियान (ASEAN) सदस्यांनी केलेल्या तत्सम आवाहनांशी जुळते, ज्यांनी या संघर्षामुळे सांस्कृतिक स्थळे आणि नागरी क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सुरक्षेच्या परिस्थितीत अनिश्चितता असल्याचे कारण देत, भारताने आपल्या नागरिकांना प्रभावित सीमावर्ती प्रांतांमध्ये प्रवास करणे टाळण्याचा सल्लाही दिला आहे.

आसियान चौकटीत राजनैतिक चर्चा सुरू आहेत, परंतु कायमस्वरूपी युद्धविरामाच्या दिशेने काही अंशी प्रगती झाली आहे. निरीक्षकांनी नोंदवले आहे की, थायलंड आणि कंबोडिया या दोघांनीही वाटाघाटी करण्याची तयारी सार्वजनिकरित्या दर्शवली असली तरी, लष्करी हालचाली आणि गोळीबाराची देवाणघेवाण अजूनही सुरूच आहे.

सध्या, प्रीह विहार क्षेत्राजवळ सुरू असलेली कारवाई कमी करण्याचे संकेत कोणत्याही देशाकडून देण्यात आलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय देखरेख संस्था, नागरिकांच्या सुरक्षिततेवर आणि सांस्कृतिक स्थळांच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करत आहेत, तर भारतासह शेजारील देश तणाव कमी करणे आणि संवाद पुन्हा सुरू करण्याचे महत्त्व अधोरेखित करत आहेत.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleव्यापाराचे पुनर्संचयन करण्यासाठी भारत आणि रशियामध्ये वेगवान हालचाली
Next articleतिबेट, अरुणाचलबाबत चीनचे नकाशा बदलाचे दावे सुरूच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here