प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-ग्रीस नौदल संबंध बळकट

0

बदलत्या भू-राजकीय परिस्थितीला उत्तर देण्यासाठी, भारताने ग्रीससोबतचे नौदल संरक्षण सहकार्य अधिक दृढ केले आहे. भारताने उचलेले हे पाऊल तुर्की आणि पाकिस्तानसाठी अस्वस्थता निर्माण करणारे ठरू शकते.

ग्रीक युद्धनौका भारतीय नौदल सरावात सहभागी

तुर्की आणि पाकिस्तान त्यांच्यातील समुद्री भागीदारी मजबूत करत असून, त्यात नौदल आधुनिकीकरण, संयुक्त युद्धसराव आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, तुर्कीचा दीर्घकालीन प्रतिस्पर्धी असलेल्या ग्रीसने, आपली युद्धनौका HS Psara भारताच्या सागरी हद्दीत पाठवून, एक ठोस राजनैतिक संदेश दिला आहे.

सध्या ही ग्रीक युद्धनौका भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडसोबत बंदर दौऱ्यावर असून, तिने भारतीय स्टेल्थ फ्रिगेट INS Tarkash सोबत संयुक्त युद्धसरावात भाग घेतला.

भारतीय नौदलानुसार, या सरावात प्रगत नौदल युद्धतंत्रांचा समावेश होता — जसे की संवाद प्रोटोकॉल, सामरिक चाली, समुद्रात इंधन भरणे, पृष्ठभागावर गोळीबार आणि हेलिकॉप्टरची क्रॉस-डेक ऑपरेशन्स.

“या सहभागामुळे, दोन्ही नौदलांना अनुभवांची देवाण-घेवाण करण्याची आणि सागरी सहकार्य वाढवण्याची उत्तम संधी मिळाली,” असे भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडने सांगितले.

नौदलप्रमुखांचा ग्रीस दौरा: रणनीतिक सहकार्याचे चिन्ह

भारत-ग्रीस संरक्षण संबंधांमध्ये गती आणणारा महत्त्वाचा क्षण म्हणजे, सप्टेंबर 2024 मध्ये भारतीय नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी यांचा चार दिवसांचा अधिकृत ग्रीस दौरा. या दौऱ्याने भारताच्या भूमध्यसागर क्षेत्रातील नौदल उपस्थितीला बळ मिळाले.

या दौऱ्यात ॲडमिरल त्रिपाठी यांनी, सलामिस नौदल तळावर ग्रीसचे संरक्षण प्रमुख जनरल दिमित्रिस चूपिस यांची भेट घेतली. चर्चेचा केंद्रबिंदू होता — संयुक्त प्रशिक्षण, सागरी सुरक्षा आणि रणनीतिक सहकार्य वाढवणे.

तेव्हा त्यांनी ग्रीसच्या अनेक नौदल युनिट्सना भेट दिली, जसे की: HS Katsonis (Type 214 पाणबुडी), HS Hydra (फ्रिगेट) आणि HS Grigoropoulos (फास्ट पेट्रोल बोट). त्यांनी ग्रीसच्या नौदल अधिकाऱ्यांशी आणि खलाशांशी देखील संवाद साधला.

भारत-ग्रीस संबंधांना चालना

भारत आणि ग्रीस या दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक संबंध असून, अलीकडील काळात हे संबंध लक्षणीयरित्या दृढ झाले आहेत.

2024 च्या सुरुवातीला, ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोताकिस यांनी, नवी दिल्लीत रायसीना डायलॉगमध्ये प्रमुख वक्ते म्हणून भाग घेतला.

त्यानंतर, ग्रीसच्या लढाऊ विमानांनी पहिल्यांदाच भारताच्या ‘तरंग शक्ती’ या बहुराष्ट्रीय हवाई सरावात जोधपूर येथे भाग घेतला.

मे 2024 मध्ये, भारतीय वायुसेनेच्या राफेल विमानांनी ग्रीक एअर फोर्ससोबत संयुक्त सराव केला, जेव्हा ती विमाने अलास्कामधील ‘रेड फ्लॅग’ सरावातून परत येत होती.

तुर्की-पाकिस्तान गठजोडला भारताचा धोरणात्मक प्रतिसाद

तुर्की आणि ग्रीस यांच्यात समुद्रसीमा, सायप्रस वाद यांवरून जुने मतभेद आहेत. तुर्कीने पाकिस्तानसोबत लष्करी भागीदारी वाढवली आहे आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला सातत्याने समर्थन दिले असून, ही बाब भारताच्या दृष्टीने चिंतेची आहे.

पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, काही अहवालांनुसार, तुर्कीचे ड्रोन भारताच्या विरोधात वापरण्यात आले होते, जे ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने यशस्वीरित्या निष्प्रभ केले.

या पार्श्वभूमीवर भारत आपल्या रणनीतीत बदल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सायप्रस दौरा, तसेच वायुसेना प्रमुखांचा जून 2025 मधील ग्रीस दौरा, हे याचे स्पष्ट संकेत आहेत.

सागरी सहकार्य हे धोरणाचे केंद्रबिंदू

संरक्षण धोरण हे आता परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग बनत आहे. अशा परिस्थितीत, भारत आणि ग्रीस यांच्यातील सहकार्य हे केवळ द्विपक्षीय संबंधांचे नाही तर सागरी स्थैर्य, प्रादेशिक संतुलन आणि भौगोलिक प्रभाव या सर्व दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहे.

— हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleIndia Strengthens Naval Ties with Greece Amid Rising Tensions in the Region
Next articleसंरक्षण विधेयकाच्या मसुद्यात युक्रेनसाठी 500 दशलक्ष डॉलर्सचा निधी मंजूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here