या सरावात सहभागी होत असलेल्या भारताच्या पथकात आयएनएस जलाश्व, आयएनएस घडियाल, आयएनएस मुंबई आणि आयएनएस शक्ति या भारतीय नौदलाची युद्धनौका तसेच त्यांच्यासोबत असलेली हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग क्राफ्ट्स समावेश आहे. याशिवाय दीर्घ पल्ल्याचे सागरी गस्त विमान P8I, 91 इंफंट्री ब्रिगेड आणि 12 मेकॅनाइज्ड इन्फंट्री बटालियनचे लष्करी जवान, भारतीय हवाई दलाचे C-130 हे मालवाहू विमान आणि MI-17 हेलिकॉप्टर्स, तसेच जलद वैद्यकीय कृती पथक देखील या सरावात भाग घेणार आहेत.
अमेरिकच्या पथकात अमेरिकेच्या नौदलाची युद्धनौका कॉमस्टॉक आणि राल्फ जॉन्सन तसेच अमेरिकेच्या नौदल विभागातले सैनिक सहभागी होणार आहेत.
या सरावाअंतर्गत नौदल तळावरील प्रारंभिक टप्पा (Harbour Phase) 1 एप्रिल ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत विशाखापट्टणम इथे होणार आहे. आज आयएनएस जलाश्व या युद्धनौकेवर संयुक्त ध्वज संचलनाने या सरावाचे औपचारिक उद्घाटन होईल, याशिवाय माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद सत्राचेही आयोजन करण्यात येणार आहे. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये प्रशिक्षण भेटी, विषयज्ञांसोबत संवाद, क्रीडा उपक्रम आणि सामाजिक संवाद अशा उपक्रमांचेही आयोजन केले गेले आहे.
नौदल तळावरील प्रारंभिक टप्पा पूर्ण झाल्यानंतर, सैन्यासह जहाजे समुद्रातील सरावाच्या टप्प्यासाठी रवाना होतील. यावेळी काकीनाडाच्या सागरी किनाऱ्यावर सागरी, समुद्र आणि जमिनीवरील (सैन्य समुद्रातून जमिनीवर उतरणं आणि कार्यवाहीसाठी सज्ज होणं) तसेच मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहीमांचा सराव केला जाईल.
टीम भारतशक्ती