लष्कराद्वारे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची लांब पल्ल्याची लढाऊ चाचणी यशस्वीरित्या पूर्ण

0
ब्रह्मोस
भारतीय लष्कराने बंगालच्या उपसागरातील चाचणी श्रेणीतून, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले.

भारतीय लष्कराने 1 डिसेंबर रोजी, रोजी बंगालच्या उपसागरातील एका चाचणी श्रेणीतून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे युद्ध प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पाडले, ज्यामुळे भारताच्या लांब पल्ल्याच्या अचूक मारा करण्याच्या क्षमतेला महत्त्वपूर्ण बळ मिळाले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, दक्षिण कमांडच्या समर्पित ब्रह्मोस युनिटने त्रि-सेवा दलांच्या अंदमान आणि निकोबार कमांडच्या साहाय्याने अत्यंत समन्वयित पद्धतीने ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. या चाचणीने ऑपरेशनल परिस्थितींमझ्ये क्षेपणास्त्र प्रणालीची लढाऊ सज्जता सिद्ध केली.

X वर पोस्ट केलेल्या एका निवेदनात, दक्षिण कमांडने नमूद केले की: क्षेपणास्त्राने अतिशय वेगाने उड्डाण केले आणि ‘बंगालच्या उपसागरावरून रोरावत जाऊन,’ आपल्या निर्धारित लक्ष्यावर ‘अगदी अचूकपणे’ मारा केला, ज्यामुळे त्याचा अतुलनीय वेग, अचूकता आणि विनाशकारी क्षमता ठळकपणे दिसून आली. लष्कराने पुढे सांगितले की, ब्राम्होसच्या या प्रक्षेपणाने, विस्तारित पल्ल्यावर निर्णायक आणि अचूक हल्ले करण्याची भारताची युद्धक्षमता पुन्हा एकदा सर्वांसमोर आली.

प्रगत मार्गदर्शन, नेव्हिगेशन आणि नियंत्रण प्रणालींनी सुसज्ज असलेल्या ब्रह्मोसने, चाचणीदरम्यान अपवादात्मक उड्डाण स्थिरता आणि अंतिम टप्प्यातील अचूकता दर्शविली. लष्कराने नमूद केले की, या मोहिमेने अनुकरण केलेल्या युद्धसदृश परिस्थितींमध्ये सर्व पूर्वनिर्धारित उद्दिष्ट्ये पूर्ण केली, ज्यामुळे बदलत्या सुरक्षा आव्हानांदरम्यान वास्तविक-वेळेतील अचूक मोहिम हाती घेण्यासाठीची ब्रह्मोस युनिट्सची तयारी अधोरेखित झाली आहे.

दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी, या मोहिमेशी संबंधित जवानांचे कौतुक केले आणि हे प्रक्षेपण, लष्कराच्या व्यावसायिकता आणि तांत्रिक कौशल्याचे प्रतीक असल्याचे म्हटले.

लष्कराने सांगितले की, “दक्षिण कमांडने केलेले हे यशस्वी प्रक्षेपण संरक्षण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचा आणि भविष्यातील ऑपरेशनल आव्हानांना तोंड देण्यास लष्कराच्या अटल तयारीचा एक सशक्त पुरावा आहे.”

या चाचणीमुळे भारताची प्रतिबंधक क्षमता अधिक मजबूत होते आणि स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची विश्वासार्हता तसेच परिणामकारकता दिसून येते. हे ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाच्या स्थिर प्रगतीचे प्रतिबिंब आहे, ज्यामुळे महत्त्वाच्या संरक्षण तंत्रज्ञानामधील आत्मनिर्भरतेच्या राष्ट्रीय बांधिलकीला बळकटी मिळते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleहाँगकाँगमधील भीषण आग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून 13 जणांना अटक
Next articleनेपाळच्या राजकीय अस्थिरतेत, भारत-नेपाळ मधील जुने वादग्रस्त मुद्दे पुन्हा चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here