नौदल-एनसीबीच्या गुजरातमधील कारवाईत 700 किलो अमली पदार्थ जप्त

0
नौदल-एनसीबीच्या
गुजरातच्या किनाऱ्यावर अंमली पदार्थांनी भरलेली बोट भारतीय नौदलाने अडवली

भारतीय नौदल, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि गुजरात पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत शुक्रवारी गुजरात किनाऱ्याजवळील एक संशयास्पद जहाजावरून सुमारे 700 किलोग्रॅम मेथाम्फेटामाइन जप्त केले. नौदल प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, यावर्षी नौदलाची ही दुसरी मोठी अंमली पदार्थविरोधी मोहीम आहे.

गुरुवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या या कारवाईने अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे उद्ध्वस्त केले. प्रतिबंधित पदार्थ घेऊन जाणारी इराणी बोट अडवण्यात आली आणि इराणी नागरिकत्वाचा दावा करणाऱ्या आठ परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याचे एनसीबीने सांगितले.

“सागर मंथन-4” हे सांकेतिक नाव असलेली ही मोहीम अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे सुरू करण्यात आल्याचे एनसीबीने  सांगितले. भारतीय नौदलाने संशयित बोट ओळखण्यासाठी आणि त्यात अडथळा आणण्यासाठी आपली सागरी गस्त साधने तैनात केली. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ कायदा अंमलबजावणी संस्थांकडून (डीएलईए) मदत मागवून, अंमली पदार्थांचे सिंडीकेट जाळे उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलेले ऑपरेशन सागर मंथन हे एनसीबीची ऑपरेशन्स शाखा, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांचा समावेश असलेल्या एक बहु-एजन्सीचे प्रयत्न असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले. सागरी अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या वाढत्या धोक्याचा सामना करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत अशाच प्रकारच्या अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत.

या वर्षी, 27 फेब्रुवारी रोजी, भारतीय नौदल आणि एनसीबीच्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या पोरबंदरकडे जाणाऱ्या एका जहाजातून सुमारे 3 हजार 300 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. समन्वित सागरी सुरक्षा प्रयत्नांची परिणामकारकता दर्शविणारी ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी अंमली पदार्थांची जप्ती होती. भारतीय नौदलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या मोहिमांमुळे राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आणि सागरी धोक्यांविरुद्ध, विशेषतः अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित, दक्षता राखण्यासाठी भारतीय नौदलाची वचनबद्धता अधोरेखित होते.

 

टीम भारतशक्ती

 


Spread the love
Previous articleपेरूच्या चँके डीप-वॉटर बंदराचे जिनपिंग यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleParliamentary Panel Reviews Strategic Operations At Southern Air Command

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here