भारतीय नौदल 21 जुलै रोजी, ‘अजय’ ही ASW युद्धनौका लाँच करणार

0

भारतातील सागरी संरक्षण क्षमतेत वाढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, भारतीय नौदल 21 जुलै रोजी, कोलकातामधील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (GRSE) शिपयार्डमध्ये ‘अजय’ नावाच्या शेवटच्या अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टचे (ASW SWC) जलावतरण करणार आहे.

‘अजय’ युद्धनौकेच्या नौदलातील समावेशामुळे, भारतीय महासागर क्षेत्रामधील (IOR) वाढत्या पाणबुडीच्या धोक्यांना उत्तर देण्यासाठी, भारताच्या अँटी-सबमरीन वॉरफेअर आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे. विशेषतः चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजारील प्रतिस्पर्ध्यांकडून उद्भवणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा एक महत्वपूर्ण बदल असणार आहे.

‘अजय’: किनारपट्टीचे स्वदेशी रक्षक

यार्ड क्रमांक 3034, ज्याचे नामकरण ‘अजय’ असे करण्यात आले आहे, हे GRSE येथे तयार झालेले आठवे आणि शेवटचे ASW शॅलो वॉटर क्राफ्ट आहे. हा 16 जहाजांच्या मालिकेतील एक टप्पा असून, उर्वरित आठ ASW जहाजे कोचीन शिपयार्डमध्ये बांधली जात आहेत. या प्रगत जहाजांची रचना विशेषतः किनारपट्टी आणि उथळ पाण्यातील अँटी-सबमरीन मोहिमेसाठी करण्यात आली आहे. सध्या सेवेत असलेल्या जुन्या अभय-श्रेणीच्या युद्धनौकांची जागा ही आधुनिक जहाजे घेतील.

21 जुलै रोजी होणाऱ्या या जलावतरण सोहळ्याला, भारतीय नौदलाचे चीफ ऑफ मटेरियल व्हाईस अ‍ॅडमिरल किरण देशमुख उपस्थित राहणार आहेत.

किनारी भागात पाणबुडी विरोधी जहाजांची गरज

‘अजय’ चे नौदलातील समावेशन अशावेळी होत आहे, जेव्हा चीनकडे 70 हून अधिक पाणबुड्यांचा ताफा आहे आणि पाकिस्तानही 5 विद्यमान पाणबुडींव्यतिरिक्त 8 नवीन चिनी बनावटीच्या पाणबुड्या नौदलात सामील करुन घेण्याच्या मार्गावर आहे, ज्यापैकी 4 कराचीमध्ये आणि उर्वरित चीनमध्ये बांधल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर, भारताने अत्याधुनिक ASW प्लॅटफॉर्म्स – जसे की शॅलो वॉटर क्राफ्टच्या तैनातीला गती दिली आहे. या मालिकेतील पहिले जहाज ‘INS अर्नाळा’, 18 जून रोजी विशाखापट्टणम येथे, CDS जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते नौदलात समाविष्ट करण्यात आले. हे नौदलाचे पहिले स्वदेशी बनावटीचे ASW शॅलो वॉटर क्राफ्ट आहे.

प्रगत क्षमतांनी युक्त – उथळ पाण्यात अचूक ऑपरेशन

ASW शॅलो वॉटर क्राफ्ट ‘अजय’ची रचना अशी केली आहे की, हे जहाज किनाऱ्याजवळ 100–150 नॉटिकल मैलांच्या परिघात चालणाऱ्या शत्रूच्या पाणबुडी शोधू आणि नष्ट करू शकते. हे जहाज फक्त 30–40 मीटर इतक्या उथळ पाण्यातही प्रभावीपणे कार्य करू शकते, जे त्यांना भारतीय बंदरांजवळ येणाऱ्या किंवा मोठ्या नौदल जहाजांवर संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या पाणबुडींना रोखू शकते.

जहाजाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर्स
  • हलक्या वजनाच्या टॉरपीडो
  • 30 मिमी नौदल तोफ
  • अँटी-सबमरीन वॉरफेअर कॉम्बॅट सूट
  • हल-माउंटेड सोनार व लो-फ्रीक्वेन्सी व्हेरिएबल डेप्थ सोनारचा समावेश
  • टॉप स्पीड: 25 नॉट्स (सुमारे 46 किमी/तास)
  • प्रति मिशन: 3,000 किमी पर्यंतची सहनशक्ती

या प्रकारातील जहाजे, मोठ्या युद्धनौकांसाठी मार्गदर्शक म्हणूनही काम करतात, बंदरातील त्यांच्या आगमन आणि निर्गमनापूर्वी त्यांना पाणबुडींच्या संभाव्य धोक्यांपासून सुरक्षा पुरवतात.

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत सागरी ताकद

‘अजय’ आणि त्याची इतर साथीदार जहाजे, भारतीय नौदलाच्या स्वदेशी संरक्षण उत्पादनांवरील वाढत्या अवलंबनाचे प्रतीक आहेत, जे ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाअंतर्गत विकसित केले जात आहेत. हा प्रकल्प 2013 मध्ये, संरक्षण संपादन परिषदेकडून (DAC) मंजूर करण्यात आला होता आणि 2014 मध्ये ‘Buy and Make (Indian)’ श्रेणी अंतर्गत निविदा मागवण्यात आली होती. सुमारे ₹12,500 कोटींचा हा करार 2019 मध्ये मंजूर करण्यात आला.

या श्रेणीतील प्रत्येक ASW जहाजाची लांबी 77 मीटर असून, वजन सुमारे 1,490 टन आहे. या जहाजांची रचना गस्त, शोध आणि बचावकार्य, तसेच निम्न तीव्रतेच्या सागरी मोहिमेसाठी करण्यात आली असून, ही जहाजे भारताच्या विशाल सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

आत्तापर्यंत एक जहाज (‘अर्नाळा’) सेवेत दाखल झाले आहे, 11 जहाजांचे जलावतरण झाले आहे, तीन जहाजे अजून बांधकामाच्या प्रक्रियेत आहेत, आणि सर्व 16 जहाजे 2026 पर्यंत नौदलात समाविष्ट होणार आहेत.

‘अजय’ चे जलावतरण, GRSE च्या या प्रकल्पातील बांधकामाची जबाबदारी पूर्ण करते आणि भारतीय नौदलाला या भागातील वाढत्या पाणबुडीच्या हालचालींना रोखण्यासाठी मजबूत करते. चीनच्या वाढत्या सागरी उपस्थितीला आणि पाकिस्तानच्या विस्तारत असलेल्या पाणबुडी ताफ्याला तोंड देण्यासाठी, ‘अजेय’ सारखी स्वदेशी जहाजे भारताच्या सागरी संरक्षणातील धोरणात्मक ताकद आणि कार्यक्षमता यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

– हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleस्वदेशी डाइविंग सपोर्ट वेसल INS Nistar भारतीय नौदलात सामिल
Next articleब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाकडून बोल्सोनारोविरुद्ध वॉरंट जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here